Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > हिवाळ्यात खोलीत हिटर लावत असाल तर एका वाटीत भरून ठेवा पाणी, पाहा ‘असं’ करणं का गरजेचं

हिवाळ्यात खोलीत हिटर लावत असाल तर एका वाटीत भरून ठेवा पाणी, पाहा ‘असं’ करणं का गरजेचं

Heater Using Tips in Winter : हिवाळ्यात हिटर वापरताना काय काय काळजी घ्यावी, याच्या सोप्या टिप्स.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:45 IST2025-11-05T13:43:20+5:302025-11-05T14:45:09+5:30

Heater Using Tips in Winter : हिवाळ्यात हिटर वापरताना काय काय काळजी घ्यावी, याच्या सोप्या टिप्स.

Why keep water bowl near room heater in winter to balance humidity | हिवाळ्यात खोलीत हिटर लावत असाल तर एका वाटीत भरून ठेवा पाणी, पाहा ‘असं’ करणं का गरजेचं

हिवाळ्यात खोलीत हिटर लावत असाल तर एका वाटीत भरून ठेवा पाणी, पाहा ‘असं’ करणं का गरजेचं

Heater Using Tips in Winter : हिवाळ्याची चाहूल लागली आहे आणि भारतातील अनेक भागात थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. अशात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक खोलीतील तापमान सामान्य ठेवण्यासाठी हिटर वापरतात. अनेकांना हिटर लावून झोपण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का, हिटर चालू ठेवून झोपल्याने खोलीतील आर्द्रता कमी होते आणि हवेतील ओलावा पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. रात्री गळा कोरडा पडणे, डोळ्यांत जळजळ होणे, त्वचा कोरडी पडणे, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्या उद्भवतात. मात्र, यावर एक अगदी सोपा आणि प्रभावी उपाय आहे तो म्हणजे खोलीत पाण्याचा एक बाऊल ठेवणे.

बाऊलमध्ये पाणी ठेवण्याचा फायदा

हिटर चालू असताना खोलीत एक बाऊल पाणी ठेवले, की त्या पाण्यामुळे वातावरणातील ओलावा पुन्हा संतुलित राहतो. हे पाणी हळूहळू वाफेच्या स्वरूपात हवेत मिसळतं आणि ह्यूमिडिटी टिकवून ठेवतं. त्यामुळे हवा कोरडी होत नाही आणि वातावरण आरामदायक राहतं. हा उपाय लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त उपयोगी ठरतो.

असं करण्याचे फायदे

ओठ फाटत नाहीत

गळा कोरडा पडत नाही, खरखर कमी होते

डोळ्यांत जळजळ होत नाही

रात्री चांगली झोप लागते

सकाळी उठल्यावर थकवा जाणवत नाही

काही महत्त्वाच्या काळजीच्या गोष्टी

हिटर थेट चेहरा किंवा शरीरासमोर ठेवू नका

हिटरपासून किमान 3 ते 4 फूट अंतरावर बसा किंवा झोपा

पडदे, बेड, सोफा यांसारख्या वस्तू हीटरपासून दूर ठेवा

संपूर्ण रात्र फुल पॉवरवर हिटर चालू ठेवू नका. लो मोड किंवा टायमर वापरा

थोडं व्हेंटिलेशन ठेवा खिडकी किंचित उघडी ठेवा

मुलं किंवा पाळीव प्राणी हीटरजवळ एकटे सोडू नका

योग्य पद्धतीने हिटरचा वापर केला, तर तो थंडीत फायदेशीर ठरू शकतो. पण चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच थंडीत हिटर वापरताना या छोट्या पण महत्त्वाच्या सावधगिरीच्या टिप्स लक्षात ठेवा.

Web Title : हीटर चलाते समय कमरे में पानी रखें, जानिए क्यों है ज़रूरी

Web Summary : हीटर चलाने से नमी कम होती है, जिससे सूखापन होता है। नमी बनाए रखने के लिए कमरे में पानी का कटोरा रखें, जिससे त्वचा में सूखापन, गले में खराश से बचाव होता है और आरामदायक नींद आती है। हीटर सुरक्षा युक्तियों का पालन करें।

Web Title : Combat Winter Dryness: Use a Water Bowl with Your Heater

Web Summary : Using a heater reduces humidity, causing dryness. Place a water bowl in the room to maintain moisture levels, preventing dry skin, sore throats, and ensuring comfortable sleep. Follow heater safety tips.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.