Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > टूथपेस्टच्या खालच्या बाजूला असलेल्या रंगीत खूणा कशासाठी असतात? अनेकांना वाटतो तसा त्यांचा अर्थ नाहीच...

टूथपेस्टच्या खालच्या बाजूला असलेल्या रंगीत खूणा कशासाठी असतात? अनेकांना वाटतो तसा त्यांचा अर्थ नाहीच...

Toothpaste Facts : टूथपेस्टच्या ट्यूबच्या खाली असलेल्या छोट्या रंगीत चौकोनाकडे लक्ष दिलं आहे का? त्यांचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर आता जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 12:19 IST2026-05-10T12:19:10+5:302026-05-10T12:19:46+5:30

Toothpaste Facts : टूथपेस्टच्या ट्यूबच्या खाली असलेल्या छोट्या रंगीत चौकोनाकडे लक्ष दिलं आहे का? त्यांचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर आता जाणून घ्या.

What is the meaning of colour code on your toothpaste tube? know the meaning | टूथपेस्टच्या खालच्या बाजूला असलेल्या रंगीत खूणा कशासाठी असतात? अनेकांना वाटतो तसा त्यांचा अर्थ नाहीच...

टूथपेस्टच्या खालच्या बाजूला असलेल्या रंगीत खूणा कशासाठी असतात? अनेकांना वाटतो तसा त्यांचा अर्थ नाहीच...

Toothpaste Facts : सकाळी झोपेतून उठल्यावर बहुतेक लोक सगळ्यात आधी टूथब्रश करतात. रोज सकाळी ब्रश करणं तोंडाच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. पण तुम्ही कधी टूथपेस्टच्या ट्यूबच्या खाली असलेल्या छोट्या रंगीत चौकोनाकडे लक्ष दिलं आहे का? सोशल मीडियावर अनेक वर्षांपासून असा दावा केला जातो की हिरवा रंग म्हणजे पूर्णपणे हर्बल टूथपेस्ट, काळा म्हणजे जास्त केमिकल्स असलेला, लाल म्हणजे नैसर्गिक आणि केमिकल्सचे मिश्रण, तर निळा म्हणजे मेडिकेटेड टूथपेस्ट. त्यामुळे अनेक लोक टूथपेस्ट खरेदी करताना या रंगांवरून निर्णय घेऊ लागले आहेत. मात्र, यामागचं खरं कारण वेगळंच आहे.

The Times of India च्या रिपोर्टनुसार, टूथपेस्टच्या ट्यूबखाली दिसणाऱ्या त्या छोट्या रंगीत चिन्हाला टेक्नीकल भाषेत “आय मार्क” म्हटलं जातं. याचा वापर फॅक्टरीमधील मशीनसाठी केला जातो.

या रंगीत चिन्हाचा नेमका उपयोग काय?

टूथपेस्टची ट्यूब तयार होत असताना मशीन हे चिन्ह ओळखते आणि त्यानुसार ट्यूब योग्य ठिकाणी कापून सील करते. म्हणजेच या रंगांचा टूथपेस्टमधील तत्व किंवा गुणवत्तेशी थेट काहीही संबंध नसतो. वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या पॅकेजिंग डिझाइननुसार वेगवेगळे रंग वापरतात. त्यामुळे फक्त रंग पाहून टूथपेस्ट पूर्णपणे हर्बल आहे की नाही, हे ठरवणे चुकीचे मानले जाते.

मग टूथपेस्ट निवडताना काय पाहावे?

योग्य टूथपेस्ट निवडताना सर्वात आधी त्यावरील तत्व वाचणे महत्त्वाचे आहे.

फ्लोराइड असलेली टूथपेस्ट दातांना कॅव्हिटीपासून वाचवण्यास मदत करू शकते.

लहान मुलांसाठी फ्लोराइडचे प्रमाण मर्यादित असणे आवश्यक असते.

काही व्हाइटनिंग टूथपेस्टमध्ये जास्त एब्रॅसिव्ह तत्व असतात, जे दीर्घकाळ वापरल्यास दातांच्या वरच्या थराला नुकसान पोहोचवू शकतात.

संवेदनशील दात असलेल्या लोकांनी सेंसिटिव्हिटीसाठी बनवलेली टूथपेस्ट वापरण्याचा सल्ला दिला जातो.

हर्बल टूथपेस्ट खरोखर चांगली असते का?

आजकाल कडूनिंब, लवंग, तुळस आणि बाभूळ यांसारख्या घटकांनी बनलेली हर्बल टूथपेस्ट खूप लोकप्रिय झाली आहे. ती हिरड्या आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर मानली जाते. मात्र, प्रत्येक हर्बल टूथपेस्ट प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असेलच असे नाही. काही लोकांना तीव्र फ्लेवर किंवा काही घटकांमुळे अॅलर्जी होऊ शकते. म्हणून फक्त “हर्बल” लिहिलं आहे म्हणून कोणतीही टूथपेस्ट निवडण्यापेक्षा, आपल्या दातांच्या गरजेनुसार आणि समस्येनुसार योग्य टूथपेस्ट निवडणे अधिक महत्त्वाचे आहे.

Web Title : टूथपेस्ट ट्यूब पर रंगीन निशानों का सच; वो नहीं जो आप सोचते हैं।

Web Summary : टूथपेस्ट ट्यूब पर रंगीन निशान सामग्री के लिए नहीं, बल्कि फैक्टरी मशीनों के लिए होते हैं। कैविटी से सुरक्षा के लिए फ्लोराइड जैसे तत्वों के आधार पर टूथपेस्ट चुनें। हर्बल विकल्प मौजूद हैं, पर व्यक्तिगत जरूरतों और एलर्जी पर विचार करें। सूचित निर्णय के लिए लेबल पढ़ें।

Web Title : Truth behind colored marks on toothpaste tubes revealed; not what you think.

Web Summary : Colored squares on toothpaste tubes are for factory machines, not ingredients. Choose toothpaste based on ingredients like fluoride for cavity protection. Herbal options exist, but consider individual needs and potential allergies. Read labels for informed decisions.