Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > सलमान खानच्या ‘चुनरी चुनरी' गाण्यावर विदेशी कपलचा जबरदस्त ठेका! डान्स स्टेपवर नेटकरी फिदा...

सलमान खानच्या ‘चुनरी चुनरी' गाण्यावर विदेशी कपलचा जबरदस्त ठेका! डान्स स्टेपवर नेटकरी फिदा...

Swedish Dancer Karl Svanberg Dances On Salman Khan Chunnari Chunnari Song Bollywood Viral Video : viral video swedish man recreates salman khans chunnari chunnari : स्वीडिश डान्सर कार्ल स्वानबर्गने केला भाईजानच्या गाण्यावर भन्नाट डान्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2026 16:59 IST2026-05-12T16:58:34+5:302026-05-12T16:59:46+5:30

Swedish Dancer Karl Svanberg Dances On Salman Khan Chunnari Chunnari Song Bollywood Viral Video : viral video swedish man recreates salman khans chunnari chunnari : स्वीडिश डान्सर कार्ल स्वानबर्गने केला भाईजानच्या गाण्यावर भन्नाट डान्स...

viral video swedish man recreates salman khans chunnari chunnari Swedish Dancer Karl Svanberg Dances On Salman Khan Chunnari Chunnari Song Bollywood Viral Video | सलमान खानच्या ‘चुनरी चुनरी' गाण्यावर विदेशी कपलचा जबरदस्त ठेका! डान्स स्टेपवर नेटकरी फिदा...

सलमान खानच्या ‘चुनरी चुनरी' गाण्यावर विदेशी कपलचा जबरदस्त ठेका! डान्स स्टेपवर नेटकरी फिदा...

बॉलिवूडची जुनी गाणी आजही जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट गाण्यांची जादू अशी आहे की, वर्षानुवर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली दिसत नाही. सोशल मिडियावर रोज वेगवेगळ्या देशांतील अनेकजण हिंदी बॉलिवूड  गाण्यांवर डान्स करताना दिसतात आणि असे व्हिडिओ क्षणार्धात प्रचंड व्हायरलही होतात. बॉलिवूडची गाणी आणि त्यांच क्रेझ फक्त भारतातच नाही, तर सातासमुद्रापार फार मोठ्या प्रमाणांत पसरली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय!(Swedish Dancer Karl Svanberg Dances On Salman Khan Chunnari Chunnari Song Bollywood Viral Video).

सलमान खान आणि सुष्मिता सेन यांचं अजरामर गाणं ‘चुनरी चुनरी’ आजही लग्नसमारंभात किंवा पार्टीत वाजलं की पाय आपोआप थिरकायला लागतात. पण सध्या सोशल मिडियावर एका अशा व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. एका स्वीडिश डान्सरने आपल्या पत्नीसोबत याच गाण्यावर असा काही जबरदस्त डान्स केला आहे की, चक्क सलमान खानचे फॅन्सही चकित झाले आहेत. या विदेशी जोडीने गाण्यातील हुक-स्टेप्स ज्या सफाईदारपणे केल्या आहेत, ते पाहून परदेशातही 'बॉलिवूडचा फिव्हर' किती तगडा आहे हे स्पष्ट होतंय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये फक्त डान्सच नाही, तर या जोडीची (viral video swedish man recreates salman khans chunnari chunnari) केमिस्ट्री आणि त्यांचे एक्सप्रेशन्स पाहून नेटकरी त्यांच्या प्रेमात पडले आहेत.

कार्ल स्वानबर्ग हा एक व्यावसायिक डान्सर असून त्याने स्वीडनमधील एका निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर हा व्हिडिओ शूट केला आहे. निळेशार आकाश आणि अथांग समुद्र किनारी, काळ्या रंगाचा स्टायलिश कोट आणि पांढऱ्या स्नीकर्समध्ये कार्लचा उत्साह पाहण्याजोगा आहे. या गाण्यातील मूळ शब्द 'चुनरी चुनरी' असे आहेत या शब्दांच्या थीमला परफेक्ट मॅच होण्यासाठी त्याने खास लाल रंगाचा दुपट्टा वापरला असून, सलमान खानच्या त्या आयकॉनिक हुक - स्टेप्स त्याने ज्या सफाईदारपणे केल्या आहेत ते पाहून नेटकरी चकित झाले आहेत. 

चहा आणि कॉफीने पांढरे केस काळे करण्याचा ‘हा’ घ्या फुकट उपाय - तुमच्या मैत्रिणीही विचारतील सिक्रेट काय ?

सोमवारी ऑफिस म्हणून रविवार सायंकाळपासून छातीत धडधडतं-उदास वाटतं? पाहा ‘या’ आजाराला काय म्हणतात, करायचं काय..

व्हिडिओमध्ये कार्ल फक्त डान्सच करत नाही, तर तो उत्तम लिप-सिंक आणि ड्रॅमॅटिक एक्सप्रेशन्स देतानाही दिसतोय. जुन्या हिंदी चित्रपटांमधील गाण्यांमध्ये ज्याप्रमाणे हावभाव असायचे, तसेच त्याने आपल्या डान्समध्ये अगदी तंतोतंत केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना कार्लने कॅप्शनमध्ये "Bollywood nostalgia at its best" असे म्हटले आहे. त्याने हा व्हिडिओ त्याच्या पत्नीसोबत मिळून तयार केला आहे. या गाण्यावर डान्स करताना आनंद मिळाल्याचं ही त्याने म्हटलं आहे. 

नेटकरी म्हणतात किती अप्रतिम डान्स, केलं कौतुक... 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी या कपल्सवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले, “सलमान खानसाठी एक लाईक तर बनतोच!” तर दुसऱ्या युजरने म्हटले की, “परदेशी असूनही तुम्ही बॉलिवूडच्या इतक्या जुन्या गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे.” अनेक चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहून जुन्या हिंदी गाण्यांचा सुवर्णकाळ आठवल्याची भावना व्यक्त केली. काही युजर्सनी कार्लच्या एनर्जीचे आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले, तर काहींनी म्हटले की बॉलिवूडची क्रेझ आता खरोखरच जगभर पसरली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक तो वारंवार पाहत आहेत. विशेष म्हणजे भारतीय गाण्यांबद्दलचं त्यांचं प्रेम आणि उत्साह पाहून भारतीय नेटकरीही भारावून गेले आहेत. “बॉलिवूड गाण्यांची क्रेझ जगभर आहे” अशा कमेंट्स करत अनेकजण या व्हिडिओला भरपूर प्रमाणांत लाईक्स करत आहेत. जुनी हिंदी गाणी आजही लोकांना थिरकायला भाग पाडतात, हेच या व्हायरल व्हिडिओमधून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.


Web Title : विदेशी कपल का 'चुनरी चुनरी' गाने पर ज़बरदस्त डांस, इंटरनेट पर छाया

Web Summary : सलमान खान के 'चुनरी चुनरी' गाने पर एक स्वीडिश डांसर और उनकी पत्नी का ऊर्जावान प्रदर्शन वायरल हो गया है। उनके प्रभावशाली हुक-स्टेप्स और भाव बॉलीवुड की वैश्विक अपील को उजागर करते हैं। समुद्र तट पर शूट किए गए इस वीडियो में युगल का केमिस्ट्री और बॉलीवुड के प्रति प्रेम दिख रहा है।

Web Title : Foreign couple's dance to 'Chunnari Chunnari' captivates the internet.

Web Summary : A Swedish dancer and his wife's energetic performance to Salman Khan's 'Chunnari Chunnari' has gone viral. Their impressive hook-steps and expressions highlight Bollywood's global appeal. The video, shot on a scenic beach, showcases the couple's chemistry and love for Bollywood, charming viewers worldwide.