सध्या आयपीएल २०२६ च्या मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळेच क्रिकेटप्रेमी आपल्या आवडल्या क्रिकेट्सला सपोर्ट करताना दिसून येत आहे. स्टेडियमधल्या किंवा पीचमधल्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. (Sakshi Dhoni)आयपीएलचं मैदान म्हटलं की चौकार, षट्कारासोबतच ग्लॅमरचा तडकाही पाहायला मिळतो. आपल्या आवडत्या संघांना पाठिंबा देताना क्रिकेट चाहत्यांमध्ये वाद होणे ही काही नवीन गोष्ट नाही.(IPL 2026)
सध्या सोशल मीडियावर क्रिकेटपट्टूच्या पत्नींच्या 'लक्झरी' स्टाईल स्टेटमेंटचीही जोरदार चर्चा रंगली आहे. (LuxuryLifestyle) यंदाच्या मोसमात क्रिकेटर्सच्या पत्नींनी कॅज्युअल कपड्यांसोबत कोट्यवधी रुपयांची घड्याळे परिधान करून फॅशनच्या जगात एक नवीन ओळख निर्माण केली आहे.(Cricket Wives)
नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये अनुष्का शर्मा २८ लाखांच्या 'पँथेर डी कार्टियर' घड्याळात दिसली, तर २३ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामन्यात साक्षी धोनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने घातलेल्या ३.१ कोटी रुपयांचे रिचर्ड मिल घड्याळ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. एका बाजूला धोनीची बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूला स्टँडमध्ये साक्षीचा हा रॉयल लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर साक्षी धोनी अत्यंत साध्या पण मोहक लुकमध्ये पाहायला मिळाली. फुलांची प्रिंट असलेला क्रीम रंगाचा सूट, डोळ्यात काजळ, हलका मेकअप तिच्या सौंदर्याला साजेसा होता. पण मनगटावर असणाऱ्या हिरव्या रंगाच्या घड्याळाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.
तिच्या हातात असणार घड्याळ हे प्रसिद्ध स्वीस ब्रँड रिचर्ड मिलचे आहे. रिचर्ड मिल RM 67-02 वेड व्हॅन निकेर्क असे या मॉडेलचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत ३,३४,००० अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ३.१ कोटी रुपये इतकी आहे.
हे घड्याळ दक्षिण आफ्रिकेचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता धावपटू 'वेड व्हॅन निकेर्क' याच्यासोबतच्या पार्टनरशीपमधून तयार करण्यात आलं आहे. खेळाडूंसाठी हे घड्याळ अत्यंत हलके (Ultra-lightweight) बनवण्यात आले आहे. यात असणारे'क्वार्टझ टीपीटी' (Quartz TPT) हे मटेरियल बीट्सना सहन करण्याची क्षमता ठेवते आणि वजनालाही खूप हलके असते. या घडळ्याचा हिरवा-पिवळा रंग दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिनिधित्व करतो. या घड्याळाची फिनिशिंग हिऱ्याने पॉलिश केलेल्या कोनांनी आणि हाताने पॉलिश केलेल्या पृष्ठभागांनी केलेली आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही बकल किंवा लॉक नाही. यात एक इलास्टिक स्ट्रॅप देण्यात आला आहे, जो आपल्या मनगटावर घट्ट आणि सुटसुटीत बसतो. साक्षी धोनीने हलकासा मेकअप , हातात महागडं घड्याळ घालून हा लूक पूर्ण केला.
