lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > ‘माझ्याकडे असं डिटर्मिनेशन असतं तर..’ टाइट ड्रेस घालून चालूही न शकणारी किम कार्दाशियन पाहून हॉट मिम्सचा पाऊस

‘माझ्याकडे असं डिटर्मिनेशन असतं तर..’ टाइट ड्रेस घालून चालूही न शकणारी किम कार्दाशियन पाहून हॉट मिम्सचा पाऊस

Kim Kardashian Sexy Silver Gown Viral Video Struggling to Climb Steps : या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत लोकांनी तिची खूप खिल्ली उडवली, इतकंच नाही तर तिला खूप ट्रोलही करण्यात आलं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 05:03 PM2022-09-28T17:03:27+5:302022-09-28T17:22:03+5:30

Kim Kardashian Sexy Silver Gown Viral Video Struggling to Climb Steps : या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत लोकांनी तिची खूप खिल्ली उडवली, इतकंच नाही तर तिला खूप ट्रोलही करण्यात आलं.

Kim Kardashian Sexy Silver Gown Viral Video Struggling to Climb Steps : 'If only I had such determination..' Rain of hot memes after seeing Kim Kardashian who can't even walk in a tight dress | ‘माझ्याकडे असं डिटर्मिनेशन असतं तर..’ टाइट ड्रेस घालून चालूही न शकणारी किम कार्दाशियन पाहून हॉट मिम्सचा पाऊस

‘माझ्याकडे असं डिटर्मिनेशन असतं तर..’ टाइट ड्रेस घालून चालूही न शकणारी किम कार्दाशियन पाहून हॉट मिम्सचा पाऊस

Highlightsअशाप्रकारच्या गाऊनची निर्मितीच का करतात असा प्रश्नही एकाने विचारला आहे. नेटीझन्सच्या सल्ले देणाऱ्या आणि चेष्टा करणाऱ्या प्रतिक्रिया वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य


आपलं दिसणं कायम युनिक आणि सगळ्यांच्या नजरेत भरणारं असावं असं प्रत्येक तरुणीला वाटते. अभिनेत्रींमध्ये तर यासाठी भलतीच चढाओढ चाललेली असते. आपण करत असलेला मेकअप, फॅशन याची इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांमध्ये चर्चा व्हावी यासाठी अभिनेत्री अनेकदा काहीतरी हटके फॅशन कॅरी करताना दिसतात. पण ही फॅशन कॅरी करणे आपल्याला वाटते तितके सोपे नक्कीच नसते. अनेकदा वेगवेगळ्या तऱ्हेच्या कपड्यांमध्ये त्यांची पुरती वाट लागते. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम कार्दाशियनची फजिती झाल्याचे दिसून आले आहे. तिच्या स्टायलिश ड्रेसमुळे तिची उडालेली तारांबळ कॅमेरात तर कैद झालीच पण ती सोशल मीडियावरही व्हायरल झाली, ज्यामुळे किमला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला (Kim Kardashian Sexy Silver Gown Viral Video Struggling to Climb Steps). 

किम कार्दाशियन नुकतीच एका फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. या फॅशन वीकसाठी किमनं स्पार्कलिंग सिल्व्हर बॉडीकॉन गाऊन आणि हाय हिल्स असा लूक केला होता. हा ड्रेस इतका जास्त टाईट होता की त्यामुळे किमला पायऱ्या चढता येणेही शक्य नव्हते. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटीझन्सनी त्यावर एकाहून एक प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. या ड्रेसमुळे किमवर खरंच उड्या मारत पायऱ्या चढण्याची वेळ आली होती. आपला हा व्हिडिओ किमने स्वत:ला आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत लोकांनी तिची खूप खिल्ली उडवली, इतकंच नाही तर तिला खूप ट्रोलही करण्यात आलं. 

त्यातही तिने अतिशय उंच अशा पेन्सिल हिल्स घातल्याने तिची आणखीनच फजिती झाली. काहींनी तिला सल्ले दिले तर काहींनी तिची खिल्ली उडवली. तू चप्पलच घालू नको असे एकाने म्हटले, तर बऱ्याच जणांनी तिला सोबत असिस्टंट का नाही ठेवत असेही विचारले. ती इतकी श्रीमंत आहे तर तिला सोबत कोणाला आणता आले नाही का, ज्याने तिला जीने चढायला मदत केली असती असेही एकाने म्हटले आहे. तिच्या या ड्रेसला काही प्रमाणात इलॅस्टीक हवे होते म्हणजे तिला नीट चढता आणि चालता आले असते असे मतही एकाने व्यक्त केले. तर याला झिपरसारखी चेन केली असती तर या ड्रेसमध्ये वावरणे आणखी सोपे झाले असते असाही तर्क लोकांनी लावला आहे. अशाप्रकारच्या गाऊनची निर्मितीच का करतात असा प्रश्नही एकाने विचारला आहे. दुर्दैवाने या ड्रेसमध्ये किम अजिबात चांगली दिसत नसल्याचे मतही एकाने व्यक्त केले.  

Web Title: Kim Kardashian Sexy Silver Gown Viral Video Struggling to Climb Steps : 'If only I had such determination..' Rain of hot memes after seeing Kim Kardashian who can't even walk in a tight dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.