Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > तरुणीनं मिटक्या मारत खाल्ली फ्राय केलेली पाल, कुणी कौतुक केलं तर कुणी घेतली शाळा

तरुणीनं मिटक्या मारत खाल्ली फ्राय केलेली पाल, कुणी कौतुक केलं तर कुणी घेतली शाळा

Japanese Girl Fried Lizard Video: हा व्हिडीओ चीनमधील नाही तर जपानमधील आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण यात एक सुंदर तरूणी चक्क फ्राय केलेल्या पालीचा आनंद घेताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:59 IST2025-06-11T11:08:21+5:302025-06-11T13:59:41+5:30

Japanese Girl Fried Lizard Video: हा व्हिडीओ चीनमधील नाही तर जपानमधील आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण यात एक सुंदर तरूणी चक्क फ्राय केलेल्या पालीचा आनंद घेताना दिसत आहे.

Japanese girl eats fried lizard weird video goes viral | तरुणीनं मिटक्या मारत खाल्ली फ्राय केलेली पाल, कुणी कौतुक केलं तर कुणी घेतली शाळा

तरुणीनं मिटक्या मारत खाल्ली फ्राय केलेली पाल, कुणी कौतुक केलं तर कुणी घेतली शाळा

Japanese Girl Fried Lizard Video:  विचित्र खाद्य पदार्थांसाठी चीन नेहमीच चर्चेत असतो. इथे लोक काय खातील काही भरोसा नाही. येथील लोक अशा अशा डिश खातात ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हे पदार्थ खातानाचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे बघून किळस येते. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ चीनमधील नाही तर जपानमधील आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण यात एक सुंदर तरूणी चक्क फ्राय केलेल्या पालीचा आनंद घेताना दिसत आहे.

जपानमधील या तरूणीनं फूड ब्लॉगिंगच्या नादात असं काही केसं जे बघून लोक चक्रावून गेलेत. व्हिडिओत ही तरूणी जपानच्या योकोहामा येथील एका रेस्टॉरंटमध्ये फ्राय पाल पकोडा खाताना दिसत आहे. हा पकोडा कुरकुरीत असल्याचं ती सांगते. हा व्हिडीओ बघून अनेकांना तर उलटीही आली असेल.

हा व्हिडीओ Noge Chinjuya नावाच्या रेस्टॉरंटमधील आहे आणि वादग्रस्त मेन्यूसाठी फेमस आहे. इथे पाल, मगरीचे पाय, सलामॅंडर आणि वेगवेगळ्या कीटकांचे वेगवेगळे पदार्थ मिळतात. जपानी फूड ब्लॉगर या व्हिडिओत पालीचा पकोडा खाताना दिसत आहे. तसेच तिचे हावभाव पाहून तर हेच वाटत आहे की, तिला हा पकोडा चांगलाच आवडला आहे. 

या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, "हा व्हिडीओ पाहून माझं पोट बिघडलं". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "जपानी लोकांच्या हिंमतीला सलाम. मी तर याला स्पर्शही करू शकणार नाही". तर काही यूजर्स याला सांस्कृतिक विविधता असं म्हणत आहेत. तर काहींनी हा व्हिडीओ किळसवाणा असल्याचं म्हटलं आहे. 
 

Web Title: Japanese girl eats fried lizard weird video goes viral