उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन म्हणजेच सुती कपड्यांना आपण सर्वाधिक पसंती देतो. सुती कपडे दिसायला जितके क्लासी आणि अंगाला आरामदायक असतात पण त्याची काळजी घेणे कठीण असते.(How to stop cotton clothes from fading) अनेकदा आपण मोठ्या आवडीने महागडे सुती ड्रेस किंवा साड्या खरेदी करतो, पण अवघ्या दोन- तीन धुण्यांतच त्यांचा रंग फिका पडू लागतो. एकदा का कपड्यांचा रंग गेला की ते जुने आणि निस्तेज दिसू लागतात, मग ते कितीही महागडे का असेनात. (Natural color fixers for cotton fabric)
सुती कपड्यांचे तंतू नैसर्गिक असतात, त्यामुळे रासायनिक डिटर्जंटचा त्यांच्यावर लवकर परिणाम होतो. जर आपणही आपल्या आवडत्या सुती कपड्यांच्या रंगाबाबत चिंतेत असाल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. महागडे ड्राय-क्लीनिंग टाळून आपण घरीच काही सोप्या टिप्स वापरून कपड्यांची चमक टिकवून ठेवू शकतो.(Home remedies to fix color bleeding in clothes) कपडे धुतानाही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास कपड्यांचा रंग लॉक होतो. अशा ५ गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत, ज्या पाण्यात मिसळल्यास आपले कपडे वर्षानुवर्षे नव्यासारखे चमकत राहतील.
1. नव्या कोऱ्या सुती कपड्यांचा रंग पहिल्यांदा धुताना जाण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी कपडे धुण्याच्या पाण्यात २ ते ३ चमचे मीठ मिसळा. मीठामुळे कापडातील रंग पक्का होण्यास मदत होते. कपडे अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत घाला नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे रंग बाहेर पडण्याची प्रक्रिया थांबते.
2. व्हिनेगर हे केवळ स्वयंपाकासाठी नाही, तर कपड्यांची चमक टिकवण्यासाठीही उत्तम आहे. डिटर्जंटमध्ये थोडे व्हिनेगर मिसळल्यास कपड्यांवरील साबणाचे थर निघून जातात आणि कपड्यांचा रंग अधिक डार्क दिसू लागतो. तसेच व्हिनेगरमुळे कापड मऊ (Soft) राहते.
3. आपल्या कपड्यांचा रंग खूप कच्चा असेल आणि तो सारखा निघत असेल तर तुरटीचा वापर करा. बादलीभर पाण्यात थोडी तुरटी फिरवा किंवा तिची पूड मिसळा. या पाण्यात कपडे काही वेळ भिजवून ठेवल्यास रंग कापडाला घट्ट चिकटून राहतो.
4. पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या सुती कपड्यांसाठी लिंबाचा रस बेस्ट आहे. उन्हाळ्यामुळे कपड्यांवर येणारे घामाचे डाग आणि पिवळेपणा घालवण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात टाकू कपडे धुवावेत. यामुळे कपड्यांना चमक येते आणि दुर्गंधी निघून जाते.
5. कपडे धुताना आपण जितकी काळजी घेतो तितकीच काळजी वाळवताना घ्यायला हवी. सुती कपडे कधीही कडक उन्हात वाळवू नका, सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे रंगाचे रेणू तुटतात आणि कापड फिके पडते. कपडे नेहमी सावलीत सुकवावे.
6. कपडे नेहमी उलटे करून धुतल्यास बाहेरील भागावर डिटर्जंटचा थेट परिणाम होत नाही. गरम पाणी कापडाचे तंतू सैल करते, ज्यामुळे रंग लवकर निघतो. सुती कपड्यांसाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा.
