उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची आपल्याला भरपूर गरज असते. अशावेळी आपण पाणी साठवून ठेवण्यासाठी पाण्याच्या टाक्या किंवा ड्रमचा वापर करतो. स्वयंपाक, आंघोळ, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी आपण याच पाण्याच्या टाकीवर अवलंबून असतो.(Step by step water tank cleaning guide) पण अनेकदा आपण घराच्या कानाकोपऱ्याची स्वच्छता करतो, पण छतावर असलेल्या या टाकीकडे दुर्लक्ष करतो. हवेतील धूळ, कचरा आणि पाण्याच्या साठ्यामुळे टाकीच्या तळाशी गाळ साचू लागतो. काही काळानंतर या पाण्यात शेवाळ, कीटक आणि हानिकारक जीवाणूंची वाढ होऊ लागते. हे अशुद्ध पाणी वापरल्याने त्वचाविकार, पोटाचे विकार आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते.(Water tank sludge removal hacks)
अनेकांना टाकी साफ करणे हे खूप मोठे आणि कष्टाचे काम वाटते, त्यामुळे ते टाळले जाते. टाकी नेमकी किती दिवसांनी साफ करावी आणि ती झटपट स्वच्छ करण्याची 'सुपर टेक्निक' काय आहे पाहूया. वेळेवर केलेली स्वच्छता केवळ पाणी शुद्ध ठेवत नाही, तर तुमच्या कुटुंबाचे आरोग्यही सुरक्षित ठेवते.
साडी १ - ड्रेस ७, जुन्या खणाच्या साडीतून शिवा ७ डिझायनर इंडो-वेस्टन ड्रेस, कमी बजेट- लूक स्टायलिश
आरोग्य तज्ज्ञांच्या मते पाण्याची टाकी किमान ३ ते ६ महिन्यांनी पूर्णपणे साफ करावी. आपल्या भागात येणारे पाणी गढूळ असेल किंवा त्यात जास्त प्रमाणात क्षार असेल तर दर ३ महिन्यांनी स्वच्छता करणे गरजेचे आहे. जर टाकीचे झाकण नीट लावले नसेल तर बाहेरील कचरा आत जाण्याची शक्यता जास्त असते. साचलेल्या पाण्यात जंत साचतात. टाकीच्या भिंतींवर शेवाळ साचल्याने पाण्याला घाण वासही येतो. टाकीतील गाळ नळाच्या पाईपमध्ये अडकून पाण्याचा प्रवाह कमी होतो. खराब पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा आणि त्वचेला खाज सुटणे यांसारखे त्रास वाढतात.
२ मिनिटांत टाकी कशी साफ करावी?
टाकी स्वच्छ करताना त्यातील सगळं पाणी बाहेर काढणं पुरेसं नाही. यासाठी ती आतून देखील स्वच्छ असणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी टाकी पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर ब्रशने आतील भिंती आणि तळ घासा. त्यानंतर त्यात ब्लीचिंग पावडर किंवा क्लोरीन द्रावण वापरा. यामुळे आतील जीवाणू आणि जंतू मरतील. टाकी पाण्याने स्वच्छ धुवा, त्यानंतर टाकी पुन्हा पाण्याने भरा.
टाकी साफ केल्यानंतर त्यात थोड्या प्रमाणात पोटॅशियम परमँगनेट टाकल्याने पाण्याचे निर्जंतुकीकरण होते. टाकीचे झाकण नेहमी घट्ट लावा, जेणेकरून सूर्यप्रकाश आत जाणार नाही. कारण सूर्यप्रकाशामुळे शेवाळ लवकर वाढते.
