Home Safety Gadgets : दिल्लीतील एका IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येनंतर एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. जर घरातच मुली सुरक्षित नसतील, तर सुरक्षितता कुठे आहे? त्यामुळे घरात कोणीही एकटे राहत असेल मुलगी किंवा मुलगा, तर सुरक्षिततेसाठी काही स्मार्ट उपाय करणं खूप गरजेचं आहे. बरेच असे परिवार असतात ज्यात पती-पत्नी दोघेही नोकरीसाठी दिवसभर बाहेर असतात आणि लहान मुले घरात एकटीच राहतात. सगळ्यांनाच आपल्या लेकरांची काळजी घेण्यासाठी कुणालातरी घरात ठेवणं परवडत नाही म्हणा किंवा शक्य होत नाही. अशात त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही स्मार्ट गॅजेट्स तुमच्या घराच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतात.
स्मार्ट डोअर लॉक
स्मार्ट डोअर लॉक हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे झाले आहेत. हे पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा मोबाईल अॅपने उघडता येतात. कोणी जबरदस्ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तर लगेच मोबाईलवर अलर्ट येतो. ऑटो-लॉक फीचरमुळे दरवाजा आपोआप लॉक होतो.
वायफाय CCTV कॅमेरा
लहान वायफाय CCTV कॅमेरे घराच्या एंट्री पॉइंटवर किंवा रूममध्ये लावता येतात. मोबाईलवर लाईव्ह व्हिडिओ दिसतो. हालचाल झाली की नोटिफिकेशन मिळतं. यात नाईट व्हिजन आणि टू-वे ऑडिओ सुविधा उपलब्ध असते.
डोअर आणि विंडो सेन्सर
हे छोटे डिव्हाइस दरवाजे किंवा खिडक्यांवर लावले जातात. कोणी उघडण्याचा प्रयत्न केला की अलार्म किंवा मोबाईलवर मेसेज येतो. खासकरून हे रात्री खूप उपयोगी ठरतात.
पर्सनल सेफ्टी अलार्म
हे छोटं डिव्हाइस सोबत ठेवता येतं. बटण दाबताच मोठा आवाज होतो. आसपासच्या लोकांचे लक्ष वेधतं आणि धोका टाळण्यास मदत होते.
स्मार्ट वॉच आणि SOS डिव्हाइस
अनेक स्मार्ट वॉचमध्ये SOS बटण असतं. एका क्लिकमध्ये लोकेशन कुटुंबीयांना पाठवता येतं. फोन हातात नसतानाही मदत मिळवता येते.
मोबाईल SOS फीचर
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये SOS फीचर असतं. एक बटण दाबून इमर्जन्सी अलर्ट पाठवता येतो. हे फीचर फ्री आणि अत्यंत उपयोगी असं आहे.
हिडन कॅमेरा डिटेक्टर
आजकाल लपवलेले कॅमेरे ही मोठी समस्या बनली आहे. हे डिव्हाइस खोलीत लपलेले कॅमेरे शोधण्यात मदत करतात. नवीन ठिकाणी राहताना खास उपयोगी ठरतं.
