जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या अशा काही मोजक्या व्यक्ती आहेत, ज्या केवळ आपल्या धोरणात्मक निर्णयांसाठीच नाही, तर त्यांच्या फॅशन स्टेटमेंट आणि सोशल मीडियावरील करारी उपस्थितीमुळेही चर्चेत असतात. इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे त्यापैकीच एक आघाडीचे नाव.(Indian netizens reaction on Italy PM Meloni jhumka) सध्या मेलोनी आणि भारत यांचे नाते एका वेगळ्याच उंचीवर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. निमित्त ठरलंय, त्यांचा एक नवा कोरा 'देसी' सेल्फी! (Meloni Indian jewelry fashion statement)
नुकताच जॉर्जिया मेलोनी यांनी 'X' (ट्विटर) वर एक सेल्फी शेअर केला आणि काही मिनिटांतच तो भारतात तुफान व्हायरल झाला. या फोटोमध्ये मेलोनी चक्क भारतीय धाटणीच्या मोठ्या, नक्षीदार झुमक्यांमध्ये पाहायला मिळालं. आपल्या नेहमीच्या फॉर्मल वेस्टर्न आऊटफिटवर त्यांनी ज्या आत्मविश्वासाने 'लटकन आणि घुंगरू' असलेले हे झुमके परिधान केले आहेत. "इटलीची पंतप्रधान बनली देसी गर्ल," अशा कमेंट्सचा सध्या सोशल मीडियावर पाऊस पडत आहे.
मेलोनी यांचा हा हसरा चेहरा आणि कानातील झुमके फक्त सौंदर्यासाठी नव्हते, तर त्यामागे एक धारदार राजकीय संदेशही दडलेला होता. रशियन टेलिव्हिजन होस्ट व्लादीमीर सोलोव्योव्ह यांनी मेलोनींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यांना "मानवजातीसाठी कलंक", "रानटी श्वापद" आणि "फॅसिस्ट प्राणी" असे संबोधून त्यांच्यावर मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप लावला होता.
या जहरी टीकेला मेलोनी यांनी शब्दांपेक्षा आपल्या कृतीने आणि एका खंबीर सेल्फीने उत्तर दिलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, "एखादा राजवटीचा प्रचारक आम्हाला स्वातंत्र्य किंवा सुसंगततेचे धडे देऊ शकत नाही. आमचा होकायंत्र फक्त इटलीचे हित दाखवतो." अशा तणावाच्या वातावरणातही भारतीय दागिन्यांची निवड करून त्यांनी आपला 'कूल' अंदाज जगासमोर मांडला.
भारतीय संस्कृती आणि दागिन्यांची जादू आता सातासमुद्रापार पोहोचली आहे, याचे हे उत्तम उदाहरण. झुमका हा भारतीय परंपरेत केवळ दागिना नसून ती एक ओळख आहे. मेलोनी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हे झुमके मिरवणे, ही भारतीय कारागिरीला मिळालेली जागतिक पोचपावतीच म्हणावी लागेल. यामुळे भारत आणि इटली यांच्यातील वाढत्या सांस्कृतिक आणि राजनैतिक मैत्रीचे दर्शन पुन्हा एकदा जगाला घडले आहे.
२०२३ मध्ये COP28 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या सेल्फीनंतर चर्चेत आलेला #Melodi चाहता वर्ग या 'झुमका' सेल्फीमुळे पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर यावर मजेशीर आणि कौतुकास्पद कमेंट्स येत आहेत. एका युजरने कमेंट केली असं वाटतंय की कुणीतरी तुम्हाला 'बरेलीवाला झुमका' भेट दिलाय!" तर दुसरा नेटकरी म्हणतो "हा झुमका 'ModiFied' वाटतोय!" मेलोनींच्या या एका सेल्फीने हे सिद्ध केले आहे की, राजकारण असो वा फॅशन, भारतीय टच असेल तर त्याची चर्चा जगभर होणारच!
Per sua natura, un solerte propagandista di regime non può impartire lezioni né di coerenza né di libertà.
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) April 21, 2026
Ma non saranno certo queste caricature a farci cambiare strada.
Noi, diversamente da altri, non abbiamo fili, non abbiamo padroni e non prendiamo ordini.
La nostra bussola… pic.twitter.com/UPmr22zAwO
