Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > उन्हाळी सुटीत माधुरी दीक्षितही आजोळी जायची, शेणाने वाडा सारवायची आणि... वाचा तिच्या खास आठवणी

उन्हाळी सुटीत माधुरी दीक्षितही आजोळी जायची, शेणाने वाडा सारवायची आणि... वाचा तिच्या खास आठवणी

Madhuri Dixit About Her Childhood Memories: तुम्ही आम्ही सुटीत जसे आजोळी जायचो तशीच माधुरी दीक्षितही लहानपणी आजोळी जायची आणि....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 14:34 IST2026-05-19T14:33:33+5:302026-05-19T14:34:31+5:30

Madhuri Dixit About Her Childhood Memories: तुम्ही आम्ही सुटीत जसे आजोळी जायचो तशीच माधुरी दीक्षितही लहानपणी आजोळी जायची आणि....

Actress Madhuri dixit reveals her memory of summer vacation, how did Madhuri dixit used to spend her summer vacations in konkan in her childhood | उन्हाळी सुटीत माधुरी दीक्षितही आजोळी जायची, शेणाने वाडा सारवायची आणि... वाचा तिच्या खास आठवणी

उन्हाळी सुटीत माधुरी दीक्षितही आजोळी जायची, शेणाने वाडा सारवायची आणि... वाचा तिच्या खास आठवणी

Highlightsआम्हाला असं मोकळं बसलेलं पाहिलं की ते आम्हाला कामालाच लावायचे. त्यामुळे सहसा आम्ही त्यांच्या समोर यायचो नाही. 

उन्हाळ्याची सुटी म्हणजे बच्चे कंपनीसाठी मोठाच आनंद. आज आपलं घर आणि मामाचं घर हे जवळपास सारखंच असतं. दोन्हींत फार फरक नसतो, पण पुर्वी मात्र मामाच्या गावाची मजाच न्यारी होती. मामे भावंड, मावस भावंड एकत्र जमायची आणि धमाल करायची... आता दस्तुरखुद्द माधुरी दीक्षितही याला अपवाद नाही. माधुरीचं आजोळ कोकणातलं. तिचे आजी, आजोबा, पणजी रत्नागिरीला असायचे. उन्हाळी सुटी लागली की माधुरीही तिच्या भावंडांसह आजोळी धूम ठोकायची आणि तिथे धमाल करायची. आज ती सेलिब्रिटी असली तरी तिच्या लहानपणी तिने शेणाने वाडा सारवण्यापासून कित्येक कामं केली आहेत. वाचा याविषयी तिने स्वत:च सांगितलेल्या काही खास आठवणी...(Madhuri Dixit About Her Childhood Memories)

माधुरी दीक्षित सांगते आम्ही आजोळी जायचो आणि....

 

माधुरी सांगते उन्हाळी सुट्टी लागली की आम्ही हमखास कोकणात जायचो.. तिथे सगळे मिळून खूप मजा यायची. आंब्याच्या झाडावर चढायचं. कैऱ्या तोडायच्या, दिवसभर खात बसायच्या... मग आमच्या वाड्यात मोठा झोपाळा असायचा..

कशाला हवेत महागडे क्रिम? ५ सोप्या गोष्टी रोज आठवणीने करा- चेहऱ्याचे सौंदर्य नेहमी खुलतच राहील

दुपारच्यावेळी आम्ही सगळे त्या झोपाळ्यावर बसून गाणी गायचो, धिंगाणा करायचो.. मग आतल्या खोलीतून आजोबांचा आवाज ऐकला की मात्र आमची पळापळ व्हायची आणि जिथून जागा मिळेल तिथून आम्ही सगळे पळून जायचो. कारण आजोबा खूप कडक शिस्तीचे होते. आम्हाला असं मोकळं बसलेलं पाहिलं की ते आम्हाला कामालाच लावायचे. त्यामुळे सहसा आम्ही त्यांच्या समोर यायचो नाही. 

 

माधुरी आजोबांकडून बरीच कामं शिकली आहे. शेण घेऊन घर कसं सारवायचं, पाण्याचं लिंपण द्यायचं, म्हशींना चारा देणं अशी कित्येक कामं तिने लहानपणी केलेली आहेत. बरं या कामांमध्ये कुचराई झालेलीही आजोबांना चालायची नाही.

पाठ काळी पडली, फोडंही खूप आहेत? 'हा' घरगुती उपाय करा, बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल

जमीन सारवताना तर ते स्वत: मागे उभे राहायचे आणि सगळी कामं करून घ्यायची... असं ती सांगते. एकंदरीतच माधुरीने तिच्या लहानपणी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, हेच मुळी तिच्या चाहत्यांना खूप आवडून गेलं आहे.. त्यामुळे ती त्यांना जास्तच आपल्यापैकी वाटू लागली आहे. कित्येक जण तिच्या त्या आठवणी ऐकून नॉस्टॅल्जिक झाले असून मनाने आपोआप मामाच्या गावी गेले आहेत. 


 

Web Title : माधुरी दीक्षित के बचपन की गर्मी की यादें: गाँव का मज़ा और काम।

Web Summary : माधुरी दीक्षित ने अपने कोंकण बचपन को याद किया, गर्मी की छुट्टियां अपने दादा-दादी के घर बिताईं। उन्हें आम के पेड़ पर चढ़ना, कच्चे आम खाना और झूला झूलना बहुत पसंद था। सख्त दादा-दादी गोबर से सफाई जैसे काम सौंपते थे। इन अनुभवों ने उन्हें अपनी जड़ों से जुड़ा हुआ महसूस कराया।

Web Title : Madhuri Dixit's childhood summer memories: Village fun and chores.

Web Summary : Madhuri Dixit recalls her Konkan childhood, spending summer vacations at her grandparents' home. She enjoyed climbing mango trees, eating raw mangoes, and swinging. Strict grandparents assigned chores like cleaning with cow dung. These experiences made her feel connected to her roots.