Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > पाठ काळी पडली, फोडंही खूप आहेत? 'हा' घरगुती उपाय करा, बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल

पाठ काळी पडली, फोडंही खूप आहेत? 'हा' घरगुती उपाय करा, बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल

Skin Care Tips: पाठीचा काळेपणा कमी करण्यासाठी पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा..(home made body scrub for body polishing)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 12:45 IST2026-05-19T12:44:20+5:302026-05-19T12:45:00+5:30

Skin Care Tips: पाठीचा काळेपणा कमी करण्यासाठी पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा..(home made body scrub for body polishing)

home made body scrub for body polishing, how to make home made body scrub to clan back and neck tanning | पाठ काळी पडली, फोडंही खूप आहेत? 'हा' घरगुती उपाय करा, बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल

पाठ काळी पडली, फोडंही खूप आहेत? 'हा' घरगुती उपाय करा, बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल

Highlightsचांगला इफेक्ट मिळण्यासाठी दोन ते तीन आठवडे सलग आठवड्यातून दोन- तीन वेळा हा उपाय करा. 

चेहऱ्याची तर आपण काळजी घेतोच, पण त्याचप्रमाणे हात, पाय, मान अशा अवयवांचीही काळजी घेतो. पण पाठीकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं. कारण पाठ घासण्याचं काम थोडं अवघड आहे. आणि रोजच्या रोज आपल्या मागे कामांची एवढी यादी असते की त्यातून वेळ काढून पाठीची स्वच्छता करणं होत नाही. यामुळे मग पाठ काळवंडून जाते. शिवाय अनेक जणींना पाठीवर कायमच फोडं, पुरळं असतात. याचं कारण म्हणजे केसांमधली घाण, डोक्यातला कोंडा पाठीवर पडतो आणि पाठीवर इन्फेक्शन होतं (home made body scrub for body polishing). अशा पद्धतीच्या पाठीच्या कोणत्याही तक्रारी दूर करून पाठीवरचं टॅनिंग कमी करायचं असेल तर त्यासाठी पुढे सांगितलेला एक अगदी सोपा उपाय करून बघा. 

 

काळी झालेली पाठ कशी स्वच्छ करावी?

हा सोपा उपाय केल्याने तुम्हाला लगेचच पाठीच्या त्वचेमध्ये चांगला फरक पडलेला दिसून येईल. काळवंडलेली पाठ अगदी बॉडी पॉलिशिंग केल्याप्रमाणे चकाचक होईल.

चमचा मसाज ऐकलाय? 'या' पद्धतीने रोज सकाळी २ चमचे चेहऱ्यावरून फिरवा-इन्स्टंट ग्लो-चेहरा चमकेल

त्यासाठी सगळ्यात आधी तर २ टेबलस्पून हळद घ्या. गॅसवर एक कढई किंवा तवा गरम करायला ठेवा. त्यावर हळद भाजून घ्या. हळदीचा रंग लालसर चॉकलेटी झाला की गॅस बंद करा. भाजून घेतलेली हळद थंड झाल्यानंतर तिच्यात २ टेबलस्पून कॉफी पावडर, १ चमचा खोबरेल तेल आणि १ चमचा मध घाला. 

 

सगळे पदार्थ कालवून त्याचा लेप तयार करा आणि तो पाठीवर लावून घ्या. लेप लावलेला असतानाच स्क्रबर वापरून पाठ घासून काढा. त्यानंतर साधारण १० मिनिटांनी पाठ स्वच्छ धुऊन टाका.

तुमच्याकडे फक्त ३ गुण हवेत, आयुष्यात कधीच एकेकटं वाटणार नाही-खूप माणसं कमवाल..

एकदा जरी हा उपाय केला तरी पाठीचा काळवंडलेपणा बराच कमी होईल. आणखी चांगला इफेक्ट मिळण्यासाठी दोन ते तीन आठवडे सलग आठवड्यातून दोन- तीन वेळा हा उपाय करा. 


 

Web Title : पीठ पर कालापन और पिंपल्स? बॉडी पॉलिशिंग के लिए यह घरेलू उपाय आजमाएं।

Web Summary : पीठ की देखभाल की उपेक्षा से कालापन और पिंपल्स हो जाते हैं। हल्दी, कॉफी, नारियल तेल और शहद का यह सरल घरेलू उपाय त्वचा को एक्सफोलिएट और चमकदार बनाने में मदद करता है, जिससे बॉडी पॉलिशिंग जैसा प्रभाव मिलता है। सर्वोत्तम परिणामों के लिए नियमित रूप से उपयोग करें।

Web Title : Dark back with pimples? Try this home remedy for polishing effect.

Web Summary : Neglecting back care leads to darkening and pimples. This simple home remedy using turmeric, coffee, coconut oil, and honey helps exfoliate and brighten the skin, providing a body polishing-like effect. Use regularly for best results.