lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > ..म्हणून मी लग्न नाही केलं, वाचले! सुश्मिता सेन सांगतेय लग्न न करता, एकटीने मुलींना वाढवण्याचा प्रवास

..म्हणून मी लग्न नाही केलं, वाचले! सुश्मिता सेन सांगतेय लग्न न करता, एकटीने मुलींना वाढवण्याचा प्रवास

Sushmita Opens Up About Her Being Single: मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच तिच्या विधानांबाबत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या रिलेशनशिपबाबत (relationships of Sushmita Sen) आणि मुलींबाबत व्यक्त केलेलं मत सोशल मिडियावर चर्चेचा विषय झालं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 01:05 PM2022-07-01T13:05:00+5:302022-07-01T13:36:07+5:30

Sushmita Opens Up About Her Being Single: मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच तिच्या विधानांबाबत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या रिलेशनशिपबाबत (relationships of Sushmita Sen) आणि मुलींबाबत व्यक्त केलेलं मत सोशल मिडियावर चर्चेचा विषय झालं आहे. 

Sushmita Sen reveals the reason of not getting married, She says God saves her from....... | ..म्हणून मी लग्न नाही केलं, वाचले! सुश्मिता सेन सांगतेय लग्न न करता, एकटीने मुलींना वाढवण्याचा प्रवास

..म्हणून मी लग्न नाही केलं, वाचले! सुश्मिता सेन सांगतेय लग्न न करता, एकटीने मुलींना वाढवण्याचा प्रवास

Highlightsआता पुन्हा एकदा तिने एक खुलासा केला असून माझ्या मुली माझ्या लग्नातील अडथळा कधीच नव्हत्या असं तिनं नमूद केलं आहे.

१९९४ या वर्षीची मिस युनिव्हर्स असलेली सुश्मिता सेन बॉलीवूडमधील एक आदर्श सिंगल मदर (Sushmita Sen as a single mother) ओळखली जाते. लग्न न करताच एका मुलीला दत्तक घेऊन सुश्मिता त्यावेळी एक कौतुकाचा विषय ठरली होती. रिनी सेन ही तिने दत्तक घेतलेली पहिली मुलगी. त्यानंतर काही वर्षांनी तिने आणखी एक मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव अलिशा. रिनी आणि अलिशा या दोघीही आयुष्यात आल्या आणि त्यांनी माझं आयुष्य आणखी सुंदर केलं, असं ती नेहमीच म्हणते. आता पुन्हा एकदा तिने एक खुलासा केला असून माझ्या मुली माझ्या लग्नातील अडथळा कधीच नव्हत्या असं तिनं नमूद केलं आहे. (Sushmita Opens Up About Her Being Single)

 

''आर्या'' या वेबसिरिजद्वारे सुश्मिताने अभिनय क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं आहे. सध्या या वेबसिरिजमुळे तर ती चर्चेत आहेच, पण काही महिन्यांपूर्वी रोहमन शॉल (Rohman Shawl) याच्याशी झालेलं ब्रेकअपही तिच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्का होतं. कारण बऱ्याच वर्षांपासून रिलेशनमध्ये असणारे हे जोडपं आता लग्न करणार असं तिच्या चाहत्यांना वाटत होतं. त्यांच्या ब्रेकअपचं खरं कारण अजूनही समोर आलेलं नाही. पण याबद्दल सांगताना सुश्मिता नुकतंच म्हणाली आहे की मी खूप नशिबवान आहे कारण माझ्या आयुष्यात अनेक चांगले पुरुष आले. पण मी त्यांच्याशी लग्न केलं नाही, याचं कारण माझ्या मुली कधीही नव्हत्या. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला माझ्या मुलींनी स्वीकारलं., त्यांचा सन्मान केला. त्यामुळे मुलींमुळे माझं लग्न झालं नाही, असं नाही. तर आयुष्यात आलेले ते पुरुष निराश करणारे होते, म्हणून मी अविवाहित राहिले, असंही ती म्हणाली.

 

यापुढे बोलताना सुश्मिता असंही म्हणाली की, आजपर्यंत मी जवळपास ३ वेळा लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत आले होते, पण प्रत्येकवेळी देवाने मला ऐनवेळी वाचवले. त्यावेळी नेमके काय झाले, हे मी सांगू शकत नाही. पण देवाने मला वाचवले एवढे मात्र नक्कीच. मला कोणत्याही मेसी रिलेशनशिपमध्ये न अडकवून देव माझ्या दोन मुलींचही रक्षण करतो आहे, असंही सुश्मिता म्हणाली. 

 

Web Title: Sushmita Sen reveals the reason of not getting married, She says God saves her from.......

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.