परीक्षा- इंटरव्ह्यूचं टेन्शन, छातीत धडधडते? ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस गायब करणारा पाहा उपाय

Updated:June 25, 2025 18:13 IST2025-06-25T09:15:57+5:302025-06-25T18:13:08+5:30

परीक्षा- इंटरव्ह्यूचं टेन्शन, छातीत धडधडते? ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस गायब करणारा पाहा उपाय

परीक्षा, इंटरव्ह्यू अशा महत्त्वाच्या गोष्टींच्यावेळी अनेकांना टेन्शन येतं. त्या टेन्शनपायी मग जे येतं ते ही सगळं आपण विसरून जातो.(how to get relief from stress?)

परीक्षा- इंटरव्ह्यूचं टेन्शन, छातीत धडधडते? ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस गायब करणारा पाहा उपाय

बऱ्याच व्यक्ती अशा असतात ज्यांना लहान-सहान गोष्टींचाही खूप ताण येतो. एन्झायटी वाढून मग लगेच अस्वस्थ होतं. असं होऊ नये म्हणून मनातला सगळा ताणतणाव एकदम घालवून टाकण्यासाठी हा एक सोपा उपाय करा.(simple trick to reduce stress and anxiety)

परीक्षा- इंटरव्ह्यूचं टेन्शन, छातीत धडधडते? ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस गायब करणारा पाहा उपाय

हा उपाय केल्याने तुम्हाला काही मिनिटांतच खूप रिलॅक्स शांत वाटू लागेल. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयीची माहिती naagruvikaas या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

परीक्षा- इंटरव्ह्यूचं टेन्शन, छातीत धडधडते? ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस गायब करणारा पाहा उपाय

यामध्ये ते सांगतात की सगळ्यात आधी भुवयांच्या वरचा जो भाग आहे त्या भागावर दोन्ही बोटांच्या टोकांनी हळूवारपणे दाब देत मसाज करा. असं ३ वेळा करावं.

परीक्षा- इंटरव्ह्यूचं टेन्शन, छातीत धडधडते? ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस गायब करणारा पाहा उपाय

त्यानंतर अंगठा आणि दोन बोटं यांच्या चिमटीमध्ये भुवई पकडा आणि हळूवारपणे दाबत संपूर्ण भुवईला मसाज करा.

परीक्षा- इंटरव्ह्यूचं टेन्शन, छातीत धडधडते? ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस गायब करणारा पाहा उपाय

आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे डोळ्यांच्याखाली जे हाड असतं त्यावर बोटांनी टॅपिंग करत अर्धा ते एक मिनिटासाठी मसाज करणं.

परीक्षा- इंटरव्ह्यूचं टेन्शन, छातीत धडधडते? ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस गायब करणारा पाहा उपाय

या तीन स्टेप तुम्ही केल्या तर काही वेळातच तुम्हाला मन शांत झाल्यासारखं वाटेल. ताण कमी होईल.