अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

Updated:June 8, 2025 16:20 IST2025-06-08T16:15:55+5:302025-06-08T16:20:55+5:30

There are many benefits of walking barefoot on green grass, the mind will be calm : अनवाणी पायंनी गवतावर चालणे आरोग्यासाठी ठरेल अगदी फायद्याचे. पाहा किती उपयोग आहेत.

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

काही अगदी साध्या कृती असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. शरीराला फायदा देणार्‍या काही सवयींपैकी एक म्हणजे गवतावर अनवाणी चालणे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असे चालणे फार चांगले ठरते.

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

हिरव्यागार गवतावर चालण्याचा फायदा होतो. कोणत्याही गवतावर चालू नका. फक्त कोवळ्या छान हिरवळीवर चालायचे. अनवाणी गवतावर चालण्याला 'ग्राउंडिंग' किंवा 'अर्थिंग' असेही म्हणतात.

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

अनवाणी चालल्याने पायातील स्नायू आणि सांधे जास्त कार्यशील होतात. त्यामुळे त्यांची ताकद आणि लवचिकता वाढते. चालण्यातही नैसर्गिक पद्धतीत सुधारणा होते आणि पायाचे विविध रोग टाळता येतात.

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

पायाच्या तळव्यांमधील संवेदनशील नसा जास्त कार्यशील होतात. त्यामुळे शरीराचे संतुलन चांगले राहते आणि पायांची स्थिती सुधारते.

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

गवतावर चालणे पाण्यातून चालणे अशा कृतींमुळे मानसिक आरोग्य छान राहण्यास मदत होते. गवतावर चालल्याने मनःशांती मिळते तसेच ताण कमी होतो. मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढते, ज्यामुळे विचारांमध्ये सुधारणा होते.

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

छान ताज्या गवतावर अनवाणी पायांनी फेऱ्या मारायच्या. असे केल्याने झोप फार छान लागते. गवतावर चालल्यावर शरीरातील सर्केडियन संतुलित होतो त्यामुळे झोप सुधारते.

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

अनवाणी चालल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे संतुलन सुधारते आणि पायांच्या नैसर्गिक हालचालींना चालना मिळते. पायांच्या हालचाली जास्त चांगल्या होतात.

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

गवतावर चालल्यावर पायाच्या बोटांवर दाब येतो. दाब आल्याने डोळ्यांचे मज्जातंतू सक्रिय होतात. ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.