मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळू नका, पाहा दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ-हाडं करतात बळकट

Updated:December 17, 2025 19:11 IST2025-12-17T15:17:20+5:302025-12-17T19:11:16+5:30

मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळू नका, पाहा दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ-हाडं करतात बळकट

शरीरातलं कॅल्शियम वाढवून हाडं बळकट ठेवायची असतील तर दूध प्यायलाच हवं असं आपण ऐकलेलं असतं. काही जणांना दुधाची चव अजिबात आवडत नाही. पण तरीही फक्त त्यातून कॅल्शियम मिळतं म्हणून ती दूध पितात.(5 food that gives more calcium than milk)

मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळू नका, पाहा दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ-हाडं करतात बळकट

आपल्या मुलांनी दूध प्यायलं नाही तर त्यांना कॅल्शियम मिळणार कसं ही चिंताही अनेक आईंना असते. म्हणून त्या बळजबरीने मुलांना दूध देतात.(calcium rich food)

मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळू नका, पाहा दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ-हाडं करतात बळकट

पण फक्त कॅल्शियम मिळविण्यासाठीच दूध पिण्याचा आग्रह तुम्ही करत असाल तर तो थांबवा (superfood for calcium). कारण असे इतर काही पदार्थही आहेत ज्यांच्यामधून दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम मिळतं.(best food for bones)

मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळू नका, पाहा दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ-हाडं करतात बळकट

त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे तीळ. तीळामधून चांगल्या प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन ई मिळतं. केस आणि त्वचा उत्तम ठेवण्यासाठीही तीळ उपयुक्त ठरतात.

मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळू नका, पाहा दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ-हाडं करतात बळकट

शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच शेवग्याच्या पानांमधूनही कॅल्शियम मिळते. त्यासोबतच त्यातून प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन सी देखील मिळते.

मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळू नका, पाहा दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ-हाडं करतात बळकट

भरपूर कॅल्शियम देणारा तिसरा पदार्थ आहे नाचणी. हाडांना बळकटी देण्यासाठी नाचणी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ अधूनमधून अवश्य खायला हवे.

मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळू नका, पाहा दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ-हाडं करतात बळकट

राजगिऱ्यामधून कॅल्शियम आणि प्रोटीन्स हे दोन्हीही चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे फक्त उपवासाच्या दिवशीच राजगिरा न खाता तो एरवीही नेहमीच खायला हवा.

मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळू नका, पाहा दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ-हाडं करतात बळकट

सुके अंजीर रात्री झोपण्यापुर्वी पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपाशीपोटी खा. यामुळे संधीवाताचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.