१ मिनिटात साडीची घडी घालण्याची खास ट्रिक! कमी जागेत परफेक्ट बसेल, इस्त्री केल्यासारखी दिसेल साडी
Updated:February 3, 2026 19:01 IST2026-02-03T16:15:45+5:302026-02-03T19:01:14+5:30
Special Trick For Folding a Saree : कपाटात कमी जागा व्यापण्यासाठी साडीची घडी अधिक लगान करून घ्या. यामुळे साडीला इस्त्री केल्यासारखा नीटनेटका आकार मिळतो.

महागड्या साड्या घेतल्यानंतर त्या वर्षानुवर्ष तशाच ठेवण्यासाठी त्या साड्यांची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. साडीची घडी करणं हे खूपच अवघड काम वाटतं. नेहमी नेहमी साड्या लॉन्ड्रीत दिल्यास बरेच पैसे यात जातात. (Special Trick For Folding a Saree)
सगळ्यात आधी साडी पूर्णपणे पसरवून घ्या आणि तिचे दोन समान भाग करण्यासाटी मधोमध एक फोल्ड करा.
साडीची लांबी कमी करण्यासाठी पुन्हा एकदा मध्यभागी घडी घाला. ज्यामुळे ती चार पदरी होईल. साडीची घडी ब्लाऊजमध्ये फोल्ड करा.
आता साडीच्या दोन्ही बाजू मध्यभागी येतील अशा प्रकारे दुमडून घ्या. साडीचा एक भाग उचलून दुसऱ्या भागावर ठेवून साडीची चौकोनी घडी तयार करा.
कपाटात कमी जागा व्यापण्यासाठी साडीची घडी अधिक लहान करून घ्या. यामुळे साडीला इस्त्री केल्यासारखा नीटनेटका आकार मिळतो.
ही पद्धत सिल्क किंवा भारी साड्या सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अशा प्रकारे घडी घातल्यानं कपाटात एकावर एक अनेक साड्या व्यवस्थित बसतात. जर ब्लाऊजला दोऱ्या अससतील तर त्यामुळे साडीला गाठ छान बसते.
कमी वेळात आणि कोणत्याही मदतीशिवाय आपण अशा पद्धतीनं सुबक घडी घालू शकता. या पद्धतीमुळे साडीसह ब्लाऊजही व्यवस्थित ठेवताा येते.