केस पांढरे झाले-डाय लावायचा नाहीये? 'या' पद्धतीनं साधी मेहेंदी लावा-मस्त काळेभोर होतील केस
Updated:January 30, 2026 19:09 IST2026-01-30T18:45:13+5:302026-01-30T19:09:57+5:30
Right Way To Apply Mehendi On Hairs : मेहेंदी लावण्यापूर्वी केस शॅम्पूनं धुवावेत. केसांमध्ये तेल असल्यास मेहेंदीचा रंग व्यवस्थित चढत नाही.

केसांना नैसर्गिकरित्या सुंदर रंग आणि चमक मिळण्यासाठी मेहेंदी लावताना खालील पद्धत अवलंबावी. (Right Way To Apply Mehendi On Hairs)
मेहेंदी भिजवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा. त्याच चहाची पावडर, थोडा लिंबू आणि आवळा पावडर मिसळा. हे मिश्रण रात्रभर किंवा किमान ५ ते ६ तास तसंच ठेवा. (Easiest Way To Apply Mehendi On Hairs)
मेहेंदी लावण्यापूर्वी केस शॅम्पूनं धुवावेत. केसांमध्ये तेल असल्यास मेहेंदीचा रंग व्यवस्थित चढत नाही.
केसांचे छोटे छोटे भाग करून मुळांपासून टोकापर्यंत मेहेंदी लावावी पूर्ण केसांना मेहेंदी लावल्यानंतर प्लास्टीक कॅप किंवा शॉवर कॅप घालावी. जेणेकरून मेहेंदी सुकणार नाही आणि रंग गडद येईल.
मेहेंदी किमान २ ते ३ तास केसांवर राहू द्यावी. त्यानंतर केस फक्त साध्या पाण्यानं धुवावेत. शॅम्पूचा वापर करू नये.
केस धुतल्यानंतर पूर्णपणे सुकवा आणि रात्री केसांना भरपूर तेल लावून मालिश करा. दुसऱ्या दिवशी शॅम्पूनं केस धुतल्यास खूप छान गडद रंग आणि चमक येते.
मेहेंदी मिसळण्यासाठी काही नैसर्गिक घटक जसं की बीटाचा रस, कॉफी, आवळा पावडर वापरा.