हल्ली नवरा- बायको या दोघांनी नोकरी करणे ही काळाची गरज झालेली आहे. पुरुष मंडळी जेव्हा नोकरी करतात तेव्हा त्यांनी घर सांभाळणं, मुलांकडे लक्ष देणं हे अपेक्षित नसतं. पण महिलांच्या बाबतीत मात्र असं होत नाही. त्यांना नोकरीसोबतच घरातही तेवढेच लक्ष द्यावे लागते. अशावेळी ओढाताण होते आणि जर मुलंही असतील तर बऱ्याचदा मुलांकडे दुर्लक्षही होतं. आपण मुलांना वेळ देत नाही त्यांच्या गरजेच्या वेळी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध नसतो, अशी भावना सतत छळत राहते (How to Balance Job and Kids Without Feeling Guilty?). मनातला हा गिल्ट कमी करण्यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.(3 tips to reduce mom's guilt in working women)
वर्किंग वुमनने मनातला गिल्ट कसा कमी करावा?
१. या एका गोष्टीची सतत जाणीव ठेवा की आपण जे काही करतो आहे ते मुलांच्या उज्वल भविष्यासाठीच करतो आहे. जर आपण आज पैसा कमावला तर आपण मुलांना नक्कीच अधिक चांगले आयुष्य, आणखी चांगले शिक्षण देऊ शकतो, हा विचार डोक्यात ठेवला तर मनावरचं बरंच ओझं कमी होतं.
२. मुलांना तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत असणं अपेक्षित नसतं. तुम्ही त्यांना थोडाच वेळ द्या, पण तो वेळ क्वालिटी टाईम असावा याकडे लक्ष ठेवा. यामध्ये पूर्णतः मुलांवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या गरजा समजून घ्या.
३. नोकरीही करायची, घरातली सगळी कामही करायची, मुलांची जबाबदारीही घ्यायची असं सगळंच स्वतःवर ओढवून घेऊ नका. सुपर वुमन बनण्याचा प्रयत्न करताना तुम्ही कधी थकून जाल हे कळणारही नाही.
आठवड्यातून २ वेळा चेहऱ्याला लावा 'हा' लेप, सुरकुत्या न येता पन्नाशीतही त्वचा राहील टाईट, सुंदर
काही कामं जर तुम्ही दुसऱ्यांवर सोपवली तर तुम्हाला दिवसभरातून थोडा वेळ मुलांसाठी देणं शक्य होईल. त्यामुळे मनातला अपराधीभावही कमी होईल. करून पाहा.
