Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पायांवर सूज, नखांमध्ये बदल दिसला तर वेळीच व्हा सावध, 'ही' आहेत लिव्हरमध्ये गडबड असल्याची लक्षणं..

पायांवर सूज, नखांमध्ये बदल दिसला तर वेळीच व्हा सावध, 'ही' आहेत लिव्हरमध्ये गडबड असल्याची लक्षणं..

Fatty Liver Signs : लिव्हरची समस्या वाढली तर पुढे जाऊन लिव्हर कॅन्सर, सिरोसिस, लिव्हर डॅमेजचा धोकाही असतो. अशात लिव्हरसंबंधी समस्यांच्या शरीरात दिसणाऱ्या लक्षणांना वेळीच ओळखणं महत्वाचं ठरतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 15:19 IST2025-05-23T11:32:26+5:302025-05-23T15:19:31+5:30

Fatty Liver Signs : लिव्हरची समस्या वाढली तर पुढे जाऊन लिव्हर कॅन्सर, सिरोसिस, लिव्हर डॅमेजचा धोकाही असतो. अशात लिव्हरसंबंधी समस्यांच्या शरीरात दिसणाऱ्या लक्षणांना वेळीच ओळखणं महत्वाचं ठरतं.

Swelling in these body parts means fatty liver is turning into cirrhosis, know the signs | पायांवर सूज, नखांमध्ये बदल दिसला तर वेळीच व्हा सावध, 'ही' आहेत लिव्हरमध्ये गडबड असल्याची लक्षणं..

पायांवर सूज, नखांमध्ये बदल दिसला तर वेळीच व्हा सावध, 'ही' आहेत लिव्हरमध्ये गडबड असल्याची लक्षणं..

Fatty Liver Signs :  रक्त फिल्टर करण्यासोबतच फॅट कमी करणे आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणे अशी कितीतरी महत्वाची कामं करण्यात लिव्हरची महत्वाची भूमिका असते. पण काही चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे लिव्हरसंबंधी अनेक समस्या आजकाल खूप वाढल्या आहेत. जर लिव्हरसंबंधी काही समस्या झाली तर शरीर योग्यपणे काम करत नाही. इतकंच नाही तर इतरही गंभीर आजारांचा धोका वाढतो. लिव्हरची समस्या वाढली तर पुढे जाऊन लिव्हर कॅन्सर, सिरोसिस, लिव्हर डॅमेजचा धोकाही असतो. अशात लिव्हरसंबंधी समस्यांच्या शरीरात दिसणाऱ्या लक्षणांना वेळीच ओळखणं महत्वाचं ठरतं.

पायांवर सूज

फॅटी लिव्हरची समस्या आजकाल सगळ्यात जास्त होते. जर तुमच्या लिव्हरवर फॅट जमा झालं असेल तर याची लक्षणं पायांवरही दिसून येतात. पायांच्या आजूबाजूला सूज दिसू लागते. हे लक्षण दिसलं की, लगेच डॉक्टरांना भेटा.

पोटात पाणी जमा होतं

लिव्हरची समस्या अधिक वाढली असेल तर पोटात पाणी जमा होऊ लागतं. ज्यामुळे पोट फुगतं. डंबारल्यासारखं वाटतं. हेच सिरोसिस आणि कॅन्सरचं देखील मानलं जातं. 

तळपायांवर एडिमा

पाय आणि टाचांवर सूज येण्याशिवाय जेव्हा फॅटी लिव्हरची समस्या वाढलेली असते तेव्हा तळपायांमध्ये एडिमा होऊ शकतो. त्याशिवाय गंभीर स्थितीत चेहऱ्यावर सूज आणि हातांवर सूजही येऊ शकते.

नखांमध्ये होतो बदल

जर लिव्हर खराब होत असेल तर याचे काही संकेत तुम्हाला तुमच्या नखांवर बघायला मिळतात. लिव्हरमध्ये काही गडबड झाली तर नखांचा रंग बदलू लागतो. नखांचा रंग हलका पिवळा होऊ लागतो. सोबतच नखांचा पांढरा भाग पूर्णपणे नाहीसा होतो. हेल्दी नखांवर कोणताही डार्क लाइन नसते. पण जेव्हा लिव्हर खराब होऊ लागतं तेव्हा नखांवर काही लाल-भुरक्या किंवा पिवळ्या रंगाच्या जाडसर लाइन दिसू लागतात. तसेच नखांचा शेपही बिघडतो.

जिभेवरही दिसतात लक्षणं

लिव्हरमध्ये काहीतरी गडबड असण्याची लक्षणं जिभेवरही दिसू लागतात.  जिभेवर जर भेगा दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. जर तुम्ही भरपूर पाणी पित असाल तरीही तुमच्या जिभेवर ड्रायनेस राहत असेल तर ही समस्या फॅटी लिव्हर डिजीजचं एक लक्षण असू शकतं. जिभेवर सतत पुरळ येणं सुद्ध लिव्हरच्या समस्येचं लक्षण आहे. 

काय कराल उपाय?

जर तुम्हाला फॅटी लिव्हरच्या गंभीर परिणामांपासून बचाव करायचा असेल तर वजन कंट्रोल करा. यासाठी रोज किमान 30 मिनिटं व्यायाम करा. फॅट कमी असलेले पदार्थ खा. कार्बोहायड्रेट जास्त असलेले फूड्स जसे की, पांढरा भात, बटाटे, पांढरे ब्रेड कमी खा. मद्यसेवन आणि धूम्रपान बंद करा.

Web Title: Swelling in these body parts means fatty liver is turning into cirrhosis, know the signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.