Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गॅस - ब्लोटिंग होऊन पोट होतं डब्ब? जेवणापूर्वी १० मिनिटे 'हे' २ पदार्थ मिसळून खा त्रास होईल मिनिटांत दूर...

गॅस - ब्लोटिंग होऊन पोट होतं डब्ब? जेवणापूर्वी १० मिनिटे 'हे' २ पदार्थ मिसळून खा त्रास होईल मिनिटांत दूर...

ginger for gas and bloating relief : how to reduce bloating naturally with ginger : how to use ginger to reduce gas bloating and constipation : गॅस-ब्लोटिंगला क्षणांत पळवण्यासाठी फक्त १० मिनिटांचा हा 'देसी उपाय' एकदा नक्की पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 16:34 IST2026-04-24T16:17:13+5:302026-04-24T16:34:39+5:30

ginger for gas and bloating relief : how to reduce bloating naturally with ginger : how to use ginger to reduce gas bloating and constipation : गॅस-ब्लोटिंगला क्षणांत पळवण्यासाठी फक्त १० मिनिटांचा हा 'देसी उपाय' एकदा नक्की पाहा...

ginger for gas and bloating relief how to reduce bloating naturally with ginger | गॅस - ब्लोटिंग होऊन पोट होतं डब्ब? जेवणापूर्वी १० मिनिटे 'हे' २ पदार्थ मिसळून खा त्रास होईल मिनिटांत दूर...

गॅस - ब्लोटिंग होऊन पोट होतं डब्ब? जेवणापूर्वी १० मिनिटे 'हे' २ पदार्थ मिसळून खा त्रास होईल मिनिटांत दूर...

जेवण कितीही चविष्ट असलं तरी, त्यानंतर होणारा गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास संपूर्ण चविष्ट जेवणाचा आनंद खराब करतो. पोट फुगणे, अस्वस्थ वाटणे आणि जीव कासावीस होणे या समस्या आजकाल प्रत्येकालाच सतावतात. पोटात गॅस होणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे ही समस्या दिसायला छोटी वाटली तरी ती माणसाला खूप अस्वस्थ करते. अनेकदा बाहेरचे खाणे किंवा बिझी लाईफस्टाईलमुळे हा त्रास वारंवार जाणवतो(ginger for gas and bloating relief).

गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास हा केवळ अस्वस्थताच (chew ginger before meals benefits) निर्माण करत नाही, तर कधी खूप त्रासदायकही ठरतो. विशेषतः जेवणानंतर हा त्रास अधिक जाणवतो. अशावेळी काही नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय करून पाहिले, तर ते अधिक फायदेशीर ठरू शकतात. बॉलिवूड सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांनी एक सोपा आणि घरच्या (how to reduce bloating naturally with ginger) घरी करता येणारा उपाय सांगितला आहे, जो पचनक्रिया सुधारतो आणि गॅस- ब्लोटिंग कमी करण्यास मदत करतो. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा हिने याच त्रासातून सुटका (how to use ginger to reduce gas bloating and constipation) मिळवण्यासाठी एक 'मॅजिकल' घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय नेमका काय आहे आणि तो कसा काम करतो ते पाहूयात. 

न्यूट्रिशनिस्टने शेअर केला १ खास 'देसी उपाय'... 

प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी गॅस, ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी तसेच जठराग्नी वाढवण्यासाठी एक खास घरगुती उपाय शेअर केला आहे. आयुर्वेदानुसार, हा उपाय केल्याने अन्नाचे पचन करणारी जठराग्नी प्रदीप्त होते आणि अन्न सहजपणे पचू लागते. जे लोक खूप बिझी लाईफस्टाईल  जगतात आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत कोणताही विशिष्ट 'रुटिन' फॉलो करू शकत नाहीत, त्यांनी हा उपाय नक्कीच ट्राय करायला हवा.

माठातलं पाणी प्रत्येकवेळी आरोग्यासाठी अमृत नसतं! 'या' ८ लोकांनी चुकूनही पिऊ नये - मिळेल आजारांना निमंत्रण... 

जेवणापूर्वी हा पदार्थ चावून खा... 

हा उपाय अत्यंत साधा आहे, जो तुम्ही घर किंवा ऑफिस अशा कुठेही सहजपणे फॉलो करू शकता.

उपाय नेमका काय आहे ? 

१. ताज्या आल्याचा साधारण २ इंच मोठा तुकडा घ्या.
२. तो स्वच्छ धुवून सोलून घ्या आणि त्यावर एक चिमूट काळे मीठ घाला. 
३. आता हा आल्याचा तुकडा चावून खा.

ब्रेसियरमध्ये एकापुढे एक तीनच हुक का असतात? महिलांना माहीतच नसते खरे कारण... 

कधी करावा हा उपाय ? 

तुम्ही जेव्हाही जेवण करणार असाल, त्याच्याबरोबर १० मिनिटे आधी हे आले चावून खावे.

हे आलं खाल्ल्याने पोटातील जठराग्नी ॲक्टिव्ह करण्यास मदत करते. यामुळे 'बाईल ज्यूस' आणि 'पॅन्क्रीॲटिक ज्यूस' ॲक्टिव्ह होतात, ज्यामुळे अन्नाचे पचन वेगाने आणि सुलभतेने होते. रोज जेवणापूर्वी आले चावल्याने पचन सुधारते आणि जेवणानंतर होणारा गॅस व ब्लोटिंगचा त्रास दूर होतो.

आलं गॅस आणि ब्लोटिंग दूर करण्यासाठी कसं मदत करतं?

गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास प्रामुख्याने तेव्हा होतो, जेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही. आलं चावून खाल्यामुळे त्यातील 'जिंजरॉल' नावाचा ॲक्टिव्ह घटक कार्यरत होतो. हा घटक अन्न वेगाने आतड्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो आणि तिथे पाचक रसांना ॲक्टिव्ह करून पचनशक्ती वाढवतो. यामुळे गॅस होणे, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. इतकेच नाही तर, आयुर्वेदानुसार ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांना आलं खाल्ल्यामुळे भूक वाढण्यास मदत होते. सोबतच, आल्यामुळे मळमळण्याच्या त्रासापासूनही आराम मिळतो.

Web Title : गैस और ब्लोटिंग से पाएं छुटकारा: भोजन से पहले अदरक का जादू।

Web Summary : गैस और ब्लोटिंग भोजन का मजा किरकिरा कर देते हैं। पोषण विशेषज्ञ श्वेता शाह भोजन से पहले अदरक और काला नमक खाने की सलाह देती हैं। यह आयुर्वेदिक उपाय पाचन को बढ़ावा देता है, गैस कम करता है और पाचन रस को सक्रिय करता है।

Web Title : Beat gas & bloating: Ginger trick before meals for instant relief.

Web Summary : Gas and bloating ruin meals. Nutritionist Shweta Shah suggests ginger with black salt before meals. This Ayurvedic remedy boosts digestion, reduces gas, and eases bloating by activating digestive juices and enzymes.