Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हार्ट ॲटॅक टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी स्वतःला द्या फक्त ५ मिनिट! हृदय आणि मेंदू राहील सुपरफिट - राहाल कायम ठणठणीत...

हार्ट ॲटॅक टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी स्वतःला द्या फक्त ५ मिनिट! हृदय आणि मेंदू राहील सुपरफिट - राहाल कायम ठणठणीत...

daily habits to prevent heart attack : healthy heart habits before bed : 5 minute habits for heart health : रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त ४ गोष्टी, हृदय हेल्दी राहून होईल हार्ट ॲटॅकचा धोका कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 15:50 IST2026-05-18T15:34:00+5:302026-05-18T15:50:26+5:30

daily habits to prevent heart attack : healthy heart habits before bed : 5 minute habits for heart health : रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त ४ गोष्टी, हृदय हेल्दी राहून होईल हार्ट ॲटॅकचा धोका कमी...

daily habits to prevent heart attack healthy heart habits before bed 5 minute habits for heart health | हार्ट ॲटॅक टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी स्वतःला द्या फक्त ५ मिनिट! हृदय आणि मेंदू राहील सुपरफिट - राहाल कायम ठणठणीत...

हार्ट ॲटॅक टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी स्वतःला द्या फक्त ५ मिनिट! हृदय आणि मेंदू राहील सुपरफिट - राहाल कायम ठणठणीत...

"हार्ट ॲटॅक" कधीकाळी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर ऐकू येणारा हा शब्द आज वयाच्या विशी-तिशीतील तरुणांच्या बाबतीतही सर्रास ऐकू येत आहे. आजकालची आपली धावपळीची आणि सतत बदलती लाईफस्टाईल आपल्या शरीराला आतून पोखरत चालली आहे. ना झोपण्याची वेळ निश्चित असते, ना खाण्यापिण्याची! सोबतीला रोज खाल्लं जाणारं चमचमीत जंक फूड आणि त्यातच कामाचा मानसिक ताण आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे. आपल्या रोजच्या अशा काही नकळत होणाऱ्या सवयी आहेत, ज्यांचा थेट आणि भयंकर परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. जर वेळेवर या सवयी सुधारल्या नाहीत, तर हार्ट ॲटॅकचा धोका दुपटीने वाढतो(daily habits to prevent heart attack).

खरंतरं, अशावेळी या जीवघेण्या धोक्यापासून वाचण्याचा एक अत्यंत सोपा घरगुती उपाय आपण अगदी सहज सगळेच करु शकतो. कार्डिओलॉजिस्टचे असे म्हणणे आहे की, जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे स्वतःसाठी दिली, तर यामुळे हृदय आणि मेंदू दोन्हीचे आरोग्य उत्तम राहू शकते. आपल्या डेली रुटीन मध्ये काही छोटे (5 minute habits for heart health) बदल केले, तर हृदय आणि मेंदू दोन्हीचे आरोग्य १००% सुदृढ राहू शकते. अशा नेमक्या कोणत्या साध्या पण अत्यंत फायदेशीर सवयी आहेत, ज्या रात्री झोपण्यापूर्वी फॉलो केल्यास हार्ट ॲटॅक धोका थेट कमी होऊ शकतो. 

xmaslen01 या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे सांगितले आहे की,  प्रसिद्ध 'क्लीव्हलँड क्लिनिक'ने (Cleveland Clinic) हार्ट ॲटॅक येऊन गेलेल्या अशा ३४० रुग्णांवर सलग ६ महिने एक प्रयोग केला. हे सर्व रुग्ण रात्री झोपण्यापूर्वी फक्त ५ मिनिटांसाठी एक अत्यंत साधी गोष्ट करायचे. अवघ्या ६ महिन्यांनंतर समोर आलेला रिझल्ट पाहून डॉक्टरही चकीत झाले; ही साधी गोष्ट न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत, झोपण्यापूर्वी ४ गोष्टी करणाऱ्या लोकांच्या   हृदयाची पंपिंग कार्यक्षमता तब्बल १८% पेक्षा जास्त सुधारली होती. 

जाडजूड मांड्या आणि हिप्सवरील चरबी होईल कमी! आहारात हवेच ८ पदार्थ - सुपरफूड देतील स्लिम - फिट लूक...

झोपण्यापूर्वी करा फक्त ४ गोष्टी होईल हार्ट ॲटॅकचा धोका कमी... 

१. ४-२-६ ब्रीदिंग टेक्निक :- झोपण्यापूर्वी ५ मिनिटांपर्यंत '४-२-६ ब्रीदिंग टेक्निक' वापरा. यामध्ये तुम्हाला ४ सेकंदांपर्यंत श्वास आत घ्यायचा आहे, त्यानंतर २ सेकंद श्वास रोखून धरायचा आहे आणि ६ सेकंदांपर्यंत हळूहळू श्वास बाहेर सोडायचा आहे. असे केल्याने हृदयाचे ठोके नॉर्मल होतील आणि फुफ्फुसे देखील चांगल्या पद्धतीने काम करतील. हे केल्यामुळे शरीर पूर्णपणे रिलॅक्स जाणवेल आणि 'वेगस नर्व्ह' (Vagus Nerve) ॲक्टिव्ह होईल. या टेक्निकमुळे मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे रात्री झोपही खूप छान येते.

उन्हाळ्यात भरपूर पाणी पिऊनही लघवी कमी होते कारणं...५ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका - पाहा नेमकं काय बिघडतंय...

२. अंधार करा :- झोपण्यापूर्वी किमान १० मिनिटे आधी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या स्क्रीन आणि खोलीचे लाईट्स बंद करा. याला 'डार्कनेस विंडो' म्हटले जाते. सतत लाईट किंवा स्क्रीन पाहिल्यामुळे शरीरात 'कॉर्टिसोल' (Cortisol) नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे मेंदू सतत ॲक्टिव्ह राहतो आणि झोप कमी होते. जेव्हा आपण स्क्रीनपासून स्वतःला दूर ठेवतो. तेव्हा शरीर आपोआप रिलॅक्स मोडमध्ये जाते आणि रक्त वाहिन्यांनाही आराम मिळतो.

३. चेस्ट रिलॅक्स करा :- रात्री २ मिनिटांसाठी आपले दोन्ही हात छातीवर (हृदयावर) ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या व सोडा. ही पद्धत तुमचे हृदय आणि मेंदू शांत करण्यास मदत करेल. असे केल्याने नर्व्हस सिस्टमला खूप आराम मिळेल आणि हृदयाचे ठोके देखील बॅलन्स होईल. हे करून आपला स्ट्रेस आणि ॲन्झायटी  देखील कमी करू शकता.

२१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट... 

४. कोमट पाणी प्या :- झोपण्यापूर्वी साधारण ३० मिनिटे आधी हळूहळू कोमट पाणी प्या. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि शरीराला रिलॅक्स जाणवून देते. कोमट पाणी पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे रात्री शरीराला अधिक आराम मिळतो. आपल्याला हवे असल्यास आपण कोमट दूध देखील पिऊ शकता, पण पाणी हा जास्त चांगला पर्याय आहे.

Web Title : हार्ट अटैक से बचाव: सोने से पहले 5 मिनट, हृदय रहेगा स्वस्थ

Web Summary : रोजमर्रा की आदतें हृदय स्वास्थ्य को प्रभावित करती हैं। विशेषज्ञों का सुझाव है कि सोने से पहले 5 मिनट हृदय क्रिया में सुधार कर सकते हैं। सांस लेने के व्यायाम, अंधेरा, छाती को आराम और गर्म पानी जैसे सरल उपाय हृदयघात के खतरे को कम कर सकते हैं। क्लीवलैंड क्लिनिक के अध्ययन में हृदय की पंपिंग क्षमता में सुधार दिखा।

Web Title : Prevent Heart Attack: 5 Minutes Before Sleep for a Healthy Heart

Web Summary : Daily habits impact heart health. Experts suggest 5 minutes before bed can significantly improve heart function. Simple techniques like breathing exercises, darkness, chest relaxation, and warm water intake can reduce heart attack risk. Cleveland Clinic study shows improvement in heart pumping efficiency.