Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > टरबूज खाल्लं की पोट फुगल्यासारखं वाटतं- जड होतं? बघा नेमकं काय चुकतं, काय बिघडतं

टरबूज खाल्लं की पोट फुगल्यासारखं वाटतं- जड होतं? बघा नेमकं काय चुकतं, काय बिघडतं

Can Watermelon Consumption Causes Bloating and Indigestion?: टरबूज खाल्ल्यानंतर तुम्हालाही ब्लोटिंग, ॲसिडीटी, अपचन असे त्रास होत असतील तर तुम्हीही टरबूज खाताना एक मोठी चूक करत आहात...(correct method and timing for eating watermelon)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2026 17:19 IST2026-04-28T17:17:59+5:302026-04-28T17:19:19+5:30

Can Watermelon Consumption Causes Bloating and Indigestion?: टरबूज खाल्ल्यानंतर तुम्हालाही ब्लोटिंग, ॲसिडीटी, अपचन असे त्रास होत असतील तर तुम्हीही टरबूज खाताना एक मोठी चूक करत आहात...(correct method and timing for eating watermelon)

can watermelon consumption causes bloating and indigestion? correct method and timing for eating watermelon  | टरबूज खाल्लं की पोट फुगल्यासारखं वाटतं- जड होतं? बघा नेमकं काय चुकतं, काय बिघडतं

टरबूज खाल्लं की पोट फुगल्यासारखं वाटतं- जड होतं? बघा नेमकं काय चुकतं, काय बिघडतं

Highlightsकाही जणांना असा अनुभव येतो की टरबूज खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं होतं. जड वाटायला लागतं.

टरबूज हे एक अतिशय लोकप्रिय असणारं उन्हाळी फळं. हल्ली बऱ्याच भागांमध्ये वर्षभर टरबूज मिळतं. पण ते प्रामुख्याने उन्हाळ्यातच खाल्लं जातं. अगदी आंब्यापेक्षाही टरबूज जास्त आवडीने खाणारेही कित्येक जणं आहेत. शिवाय टरबूज खाण्याचे फायदेही भरपूर आहेत. त्यामुळे कित्येक घरांमध्ये अगदी रोजच किंवा एक दिवसाआड तरी टरबूज खाल्लंच जातं. पण काही जणांना असा अनुभव येतो की टरबूज खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं होतं. जड वाटायला लागतं. अपचनाचा त्रासही वाढतो. हा त्रास नेमका टरबुजामुळे होतो की ते खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आणि वेळेमुळे? (Can Watermelon Consumption Causes Bloating and Indigestion?)

 

डॉ. अनुकल्प प्रकाश यांनी दिलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे. यामध्ये डाॅक्टर असं सांगतात की उन्हाळ्यात पचनक्रिया हळुवार झालेली असते. डिहायड्रेशनचा त्रास वाढतो. त्यामुळे अनेकांना या दिवसांत पोट फुगल्यासारखं वाटतंच.

उन्हाळ्यात दही खावं का? कुणी-किती आणि कधी खावं, आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला दही जरा जपून..

आणि त्यात जर ते चुकीच्या वेळेला चुकीच्या प्रमाणात टरबूज खात असतील तर हा त्रास आणखी वाढतो. टरबुजामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणात असते. जेव्हा तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर असं भरपूर पाणी असणारं फळं खातात तेव्हा अन्नपचन करण्यासाठी तुमच्या शरीरात जे काही पाचक रस तयार झालेले असतात त्यांच्यावर परिणाम होतो आणि मग अपचन होते. पोट जड पडल्यासारखे वाटते, फुगल्यासारखे वाटते. 

 

त्यामुळे टरबूज कधीही जेवणाच्या नंतर लगेचच खाऊ नये. दोन जेवणांच्या मधला जो काळ असतो त्यावेळी टरबूज खाणे सगळ्यात चांगले. शिवाय टरबूज खूप जास्त प्रमाणात खाणंही टाळा.

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

त्यानेही अपचन होऊ शकतं. नेहमी मर्यादित प्रमाणातच टरबूज खायला हवे. ज्या लोकांना आयबीएस म्हणजेच irritable bowel syndrome त्रास असतो, त्या लोकांनी टरबूज नेहमी कमी प्रमाणात आणि दोन जेवणांच्या मधल्या वेळेतच खायला हवे. 

 

Web Title : तरबूज खाने से पेट फूलता है? खाने का सही तरीका और समय जानें।

Web Summary : तरबूज स्वस्थ होने के बावजूद, गलत तरीके से खाने पर पेट फूल सकता है। गर्मी में पाचन धीमा हो जाता है, जिससे परेशानी बढ़ जाती है। भोजन के तुरंत बाद इसे खाने से बचें। सबसे अच्छा समय भोजन के बीच में, सीमित मात्रा में, खासकर आईबीएस वालों के लिए है।

Web Title : Watermelon causes bloating? Know the right way and time to eat.

Web Summary : Watermelon, though healthy, can cause bloating if eaten incorrectly. Digestion slows in summer, increasing discomfort. Avoid eating it immediately after meals. The best time is between meals, in moderation, especially for those with IBS.