आपल्याकडे तुळशीच्या रोपाला फार मोठं स्थान आहे. भारतीय घरांमध्ये 'तुळशीच्या रोपाला' अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशीचे रोप केवळ धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर ते उत्तम औषधी गुणांनी समृद्ध आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवणारे मानले जाते. म्हणूनच आपल्या सगळ्यांच्याच घरात, अंगणात किंवा बाल्कनीमध्ये एक तरी तुळशीचं रोप असतंच. आपण त्याची रोज पूजा करतो, पाणी घालतो आणि ते छान हिरवेगार राहावे म्हणून सर्वतोपरी काळजी घेतो. पण अनेकदा जागेच्या कमतरतेमुळे किंवा बाल्कनी सजवण्याच्या नादात आपण तुळशीच्या कुंडी शेजारीच इतर अनेक प्रकारची रोपे ठेवून देतो(plants not to grow near Tulsi plant).
तुळशीच्या कुंडीजवळ इतर काही रोपं लावल्याने ज्याचा थेट परिणाम तुळशीच्या रोपाच्या (plants never grow next to Tulsi) वाढीवर होऊ शकतो. आपली हीच एक छोटीशी चूक तुळशीच्या रोपासाठी हानिकारक ठरू शकते. निसर्गात अशी काही झाडे आणि वनस्पती आहेत, ज्यांची प्रवृत्ती आणि ऊर्जा तुळशीच्या अगदी विरुद्ध असते. ही रोपे जर तुळशीच्या अगदी शेजारी किंवा एकाच कुंडीत ठेवली, तर तुळशीच्या रोपाची वाढ पूर्णपणे खुंटते, तिची पाने काळी पडू लागतात आणि काही दिवसांतच (plants harmful for Tulsi growth) हिरवेगार रोप सुकून जाते. यासाठीच, तुळशीचं रोप निरोगी, हिरवंगार आणि भरभरून (plants to avoid near holy Tulsi) वाढण्यासाठी रोपाच्या आसपास कोणती रोपं चुकूनही लावू नयेत, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
तुळशीच्या रोपाच्या बाजूला कोण - कोणती रोपं चुकूनही ठेवू नयेत...
निसर्गातील प्रत्येक रोपाची गरज आणि प्रकृती पूर्णपणे वेगवेगळी असते. काही वनस्पतींना खूप जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते, तर काही वनस्पती कोरड्या किंवा कमी ओलसर असलेल्या मातीत चांगल्या प्रकारे वाढतात. हेच मुख्य कारण आहे की, जर आपण तुळशीच्या रोपाशेजारी चुकीची झाडे किंवा रोपं लावली, तर त्याचा थेट परिणाम तुळशीच्या वाढीवर होऊ शकतो.
१. सेज (Sage) आणि थाईम (Thymus/Thyme) :- सेज आणि थाईम सारख्या वनस्पतींना अतिशय कमी पाण्याची आवश्यकता असते, याउलट तुळशीच्या रोपाला मातीमध्ये नेहमी हलका ओलसरपणा असणे फारच गरजेचे असते. जर तुम्ही ही दोन्ही रोपे एकत्र किंवा शेजारी लावली, तर पाण्याच्या वेगवेगळ्या प्रमाणामुळे दोन्हीपैकी एका रोपाची वाढ पूर्णपणे कमजोर पडू शकते.
२. काकडी (Cucumber) :- काकडी आणि तुळस ही दोन्ही रोपं मातीमधील पोषक तत्वे अत्यंत वेगाने शोषून घेतात. त्यामुळे जर ही दोन्ही रोपे शेजारी असतील, तर मातीतील पोषण मिळवण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू होते, ज्याचा परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होतो.
गॅस शेगडीजवळ कधीच ठेवू नका 'या' ८ गोष्टी, पश्चाताप करण्यापेक्षा आजच सवय बदला-सुरक्षित राहा...
३. कोरफड (Aloe Vera) :- आजकाल अनेक जण एकाच बाल्कनीत तुळस आणि कोरफड शेजारी ठेवतात. परंतु, कोरफडीला अतिशय कमी पाणी लागते आणि ती कोरड्या हवेत वाढते, तर तुळशीला चांगली आर्द्रता आणि पाणी लागते. कोरफडीच्या अति-उष्ण प्रवृत्तीमुळे तुळशीची पाने सुकू लागतात. यासाठीच तुळशीच्या रोपाच्या शेजारी कोरफड चुकूनही लावू नये.
४. मनी प्लांट (Money Plant) :- मनी प्लांट हा वेलीचा प्रकार आहे आणि तो आजूबाजूची जागा आणि मातीतील पोषक तत्वे खूप वेगाने शोषून घेतो. जर मनी प्लांट तुळशीच्या खूप जवळ असेल, तर तुळशीला पुरेसे ऊन आणि पोषण मिळत नाही.
५. मोठ्या पानांची किंवा सावली देणारी झाडे :- तुळशीच्या रोपाला दिवसातून किमान ६ ते ८ तास थेट सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. जर तुम्ही तिच्या शेजारी एखादे मोठे किंवा घनदाट झाड ठेवले ज्याची सावली तुळशीवर पडेल, तर सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तुळशीला बुरशी लागते आणि ती लवकर कोमेजून जाते.
६. बडीशेपचे रोप (Fennel Plant) :- बडीशेप ही अशी वनस्पती आहे जी स्वतःच्या चांगल्या वाढीसाठी आजूबाजूच्या इतर रोपांची वाढ पूर्णपणे मंद करते. बडीशेप मातीतील पोषक तत्वे स्वतःकडे खेचून घेते, ज्यामुळे शेजारी असलेल्या वनस्पतींना पोषण मिळत नाही. म्हणूनच, तुळशीचे रोप हिरवेगार आणि निरोगी ठेवायचे असेल, तर बडीशेपचे रोप तुळशीपासून लांब ठेवणेच सर्वात उत्तम मानले जाते.
७. कोबी आणि केल (Cabbage and Kale) :- कोबी (Cabbage) आणि केल (Kale) सारख्या भाज्यांच्या रोपांची हवामानाची गरज तुळशीच्या गरजेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. तुळशीच्या रोपाला वाढण्यासाठी गरम, उष्ण आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान गरजेचे असते. याउलट, कोबी आणि केल सारख्या वनस्पती थंड वातावरणात जास्त चांगल्या प्रकारे वाढतात. दोन वेगवेगळ्या ऋतूंतील वनस्पती एकत्र ठेवल्याने तुळशीच्या आरोग्यावर आणि वाढीवर वाईट परिणाम होतो.
मग नेमकी कोणती रोपं तुळशीच्या रोपाजवळ लावावीत ?
जशी काही झाडे लावल्याने तुळशीचे नुकसान होते, तसेच काही झाडे अशीही आहेत जी तुळशीच्या शेजारी लावल्याने दोन्ही रोपे एकमेकांच्या साथीने अतिशय उत्तम प्रकारे वाढतात. ही झाडे तुळशीची वाढ तर सुधारतातच, सोबतीने तिचे किडीपासून संरक्षणही करतात. टोमॅटोच्या रोपाशेजारी तुळस लावल्याने टोमॅटोची चव अधिक चांगली आणि चवदार होते. झेंडूचे झाड तुळशीसाठी सर्वोत्तम साथीदार मानले जाते. झेंडूच्या फुलांचा एक विशिष्ट तीव्र सुवास असतो, ज्यामुळे बागेतील अनेक हानिकारक कीटक, माश्या आणि डास लांब राहतात. यामुळे तुळशीच्या रोपाला कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही आणि तुळस सुरक्षित राहते.
