Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > झाडूसारख्या केसांना घरीच करा हेअर स्पा! फक्त १० रुपयांत केस होतील मऊमुलायम - पहिल्याच वापरात दिसेल फरक...

झाडूसारख्या केसांना घरीच करा हेअर स्पा! फक्त १० रुपयांत केस होतील मऊमुलायम - पहिल्याच वापरात दिसेल फरक...

homemade herbal hair spa mask : natural hair spa at home : homemade hair spa powder : hair spa for damaged hair : घरीच तयार करा हेअर स्पा पावडर, केस होतील सिल्की, चमकदार आणि लांबसडक, असा स्पेशल घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 14:39 IST2026-05-19T14:18:51+5:302026-05-19T14:39:11+5:30

homemade herbal hair spa mask : natural hair spa at home : homemade hair spa powder : hair spa for damaged hair : घरीच तयार करा हेअर स्पा पावडर, केस होतील सिल्की, चमकदार आणि लांबसडक, असा स्पेशल घरगुती उपाय...

homemade herbal hair spa mask natural hair spa at home homemade hair spa powder | झाडूसारख्या केसांना घरीच करा हेअर स्पा! फक्त १० रुपयांत केस होतील मऊमुलायम - पहिल्याच वापरात दिसेल फरक...

झाडूसारख्या केसांना घरीच करा हेअर स्पा! फक्त १० रुपयांत केस होतील मऊमुलायम - पहिल्याच वापरात दिसेल फरक...

बदलते हवामान, प्रदूषण आणि धावपळीची लाईफस्टाईल यामुळे आजकाल अनेकजणी केसांच्या वेगवेगळ्या समस्येने हैराण आहेत. केस कोरडे पडणे, निस्तेज होणे, डँड्रफ आणि प्रचंड केस गळणे या समस्या आता अगदी पाचवीलाच पुजल्यासारख्या झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून अनेकजणी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करून 'हेअर स्पा' करतात. पार्लरमधून आल्यावर दोन दिवस केस छान मऊ आणि चमकदार दिसतात खरे; पण महिन्याभराने केसांची अवस्था आधीपेक्षाही वाईट होते. शिवाय, प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करणे प्रत्येकालाच परवडणारे नसते(homemade hair spa powder).

पण विचार करा, जर पार्लरमधील महागड्या आणि केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर न करता, अगदी पार्लरसारखा 'नॅचरल हेअर स्पा' आपल्याला घरच्या घरीच करता आला तर? हे अगदी सहज शक्य आहे! आपल्या स्वयंपाकघरात असे काही नैसर्गिक पदार्थ आहेत, ज्यांच्यामध्ये केसांचा संपूर्ण लूक बदलण्याची ताकद असते. घरच्याघरीच केसांसाठी 'मॅजिकल हेअर स्पा पावडर' तयार करता येऊ शकते. पार्लरमध्ये जाऊन महागडे हेअर स्पा करण्याऐवजी घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने हेअर स्पा केल्यास केसांना अधिक चांगला फायदा मिळू शकतो. घरातील काही नैसर्गिक आणि औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांपासून (natural hair spa at home) तयार केलेली घरगुती हेअर स्पा पावडर केसांना पोषण देण्यास, केस मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करू शकते. ही पावडर तयार करण्यासाठी जास्त खर्चही लागत नाही आणि कोणत्याही केमिकलशिवाय केसांची नैसर्गिक पद्धतीने काळजी (homemade herbal hair spa mask) घेणे शक्य होते. घरच्याघरी केसांसाठी हेअर स्पा पावडर कशी तयार करायची आणि तिचा वापर कसा करायचा.

केसांसाठी नॅचरल हेअर स्पा पावडर कशी तयार करावी? 

केसांसाठी घरच्याघरीच नॅचरल हेअर स्पा पावडर तयार करण्यासाठी, आपल्याला प्रत्येकी १ कप तांदूळ आणि अळशीच्या बिया तसेच सुकलेली जास्वंदाची फुले इतकं साहित्य लागणार आहे. 

हेअर स्पा पावडर कशी तयार करावी ? 

हेअर स्पा पावडर तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यात तांदूळ, अळशीच्या बिया घालून त्या एकत्रित वाटून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. मग ही तयार पावडर एका बाऊलमध्ये काढून त्यात सुकलेली जास्वंदाची फुले घालून ती देखील वाटून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी. मग जास्वंदीच्या फुलांची बारीक पूड आणि तांदूळ, अळशीच्या बियांची पावडर असे दोन्ही जिन्नस एकत्रित मिसळून एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. 

कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या एका गोष्टीमुळे गळणारे केस थांबतील! ना केमिकल, ना खर्च तरीही केस वाढतील भराभर...

हेअर स्पा साठी या पावडर चा वापर केसांसाठी नेमका कसा करावा ? 

जेव्हा कधी आपण घरच्याघरीच हेअर स्पा करणार असाल तेव्हा सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी उकळवून त्यात केसांच्या लांबीनुसार किंवा २ टेबलस्पून हेअर स्पा पावडर घालून ती व्यवस्थित पाण्यात भिजू द्यावी. तयार आहे केसांसाठी हेअर स्पा मास्क.

याचा वापर केसांसाठी कसा करावा ? 

तयार मिश्रण केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकांपर्यंत व्यवस्थित लावून मसाज करावा. त्यानंतर तासभर केसांवर हे मिश्रण असेच लावून ठेवावे मग सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत.   

फक्त शाम्पू करण्यापूर्वी केसांना लावा 'हे' हर्बल पाणी! उन्हाळ्यात केस कोरडे - रुक्ष होण्याच्या प्रश्नच सुटेल कायमचा... 

केसांसाठी हा घरगुती हेअर स्पा कसा फायदेशीर... 

१. अळशीच्या बिया :- अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन आणि व्हिटॅमिन 'ई' भरपूर प्रमाणात असते. हे घटक केसांच्या मुळांना पोषण देऊन केस मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. अळशीमुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो तसेच केस गळण्याची समस्या कमी होण्यासही मदत मिळते.

२. तांदूळ :- तांदळामध्ये अमिनो अ‍ॅसिड आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे केसांना नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात. तांदळामुळे केस मऊ, सिल्की आणि स्मूद दिसतात. तसेच तांदळाचे पोषण केसांच्या वाढीस चालना देऊन केस अधिक हेल्दी ठेवण्यास मदत करते.

३. जास्वंदीची सुकलेली फुले :- जास्वंदीची फुले केसांसाठी अतिशय फायदेशीर मानली जातात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक पोषक घटक असतात, जे केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात. जास्वंदीमुळे केस दाट, काळेभोर आणि मजबूत होतात. तसेच डँड्रफ आणि स्काल्पच्या समस्याही कमी होण्यास मदत मिळते.


Web Title : मुलायम बालों के लिए घर पर हेयर स्पा: एक सरल DIY गाइड

Web Summary : प्राकृतिक, किफायती घरेलू हेयर स्पा के साथ बालों की समस्याओं से लड़ें। यह DIY हेयर स्पा पाउडर चावल, अलसी के बीज और हिबिस्कस फूलों का उपयोग करता है। मिश्रण को बालों की जड़ों पर लगाएं, मालिश करें, एक घंटे के लिए छोड़ दें और मुलायम, चमकदार बालों के लिए हल्के शैम्पू से धो लें।

Web Title : Homemade Hair Spa for Soft, Shiny Hair: A Simple DIY Guide

Web Summary : Combat hair problems with a natural, affordable homemade hair spa. This DIY hair spa powder uses rice, flax seeds, and hibiscus flowers. Apply the mixture to hair roots, massage, leave for an hour, and wash with mild shampoo for soft, shiny hair.