Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > उन्हाळ्यात गुलाबाचं रोप कोमेजतं-फुलचं येत नाही? कुंडीत 'हा' पदार्थ घाला, गुलाबांनी लगडेल रोप

उन्हाळ्यात गुलाबाचं रोप कोमेजतं-फुलचं येत नाही? कुंडीत 'हा' पदार्थ घाला, गुलाबांनी लगडेल रोप

How To Make Rose Plant Bloom More In Summer : किचनमध्ये ठेवलेला १ बटाटा वापरून तुम्ही  रोप फुलांनी भरगच्च भरू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:54 IST2026-05-05T14:21:15+5:302026-05-05T14:54:13+5:30

How To Make Rose Plant Bloom More In Summer : किचनमध्ये ठेवलेला १ बटाटा वापरून तुम्ही  रोप फुलांनी भरगच्च भरू शकता.

How To Make Rose Plant Bloom More In Summer Homemade Fertilizer | उन्हाळ्यात गुलाबाचं रोप कोमेजतं-फुलचं येत नाही? कुंडीत 'हा' पदार्थ घाला, गुलाबांनी लगडेल रोप

उन्हाळ्यात गुलाबाचं रोप कोमेजतं-फुलचं येत नाही? कुंडीत 'हा' पदार्थ घाला, गुलाबांनी लगडेल रोप

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या बाल्कनीतील रोपं  टवटवीत राहावीत, रोपं कोमेजू नयेत. पानं पिवळी पडू नयेत यासाठी सर्वचजण प्रयत्नात असतात. खासकरून गुलाबाचं रोप उन्हाळ्यात कोमेजू लागतं आणि पानं पिवळी पडतात. कळ्या गळून पडतात तसंच फुलं येणंसुद्धा कमी  होते. तुम्हालाही गुलाबाच्या रोपाला फुल येताना पाहायचं असेल तर महागड्या फर्टिलायझर्सची आवश्यकता नाही. किचनमध्ये ठेवलेला १ बटाटा वापरून तुम्ही  रोप फुलांनी भरगच्च भरू शकता. (How To Make Rose Plant Bloom More In Summer Homemade Fertilizer)

 उन्हाळ्याच्या दिवसांत गुलाबाचे रोप का कोमेजते?

 गुलाबाच्या रोपाला थंड आणि मध्यम तापमानाची आवश्यकता असते. थंड वातवारणात गुलाबाच्या रोपाची चांगली वाढ होते. उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र ऊन आणि मातीच्या कमतरतेमुळे रोपाची मुळं कमकुवत होतात. ज्यामुळे रोपाला व्यवस्थित पोषण मिळत नाही. म्हणूनच अशा रसायनांची आवश्यकता असत जे रोपाला गारवा देतील आणि पोषक तत्वही देतील.

बटाट्यापासून तयार करा नॅच्युरल फर्टिलायजर

बटाट्यात स्टार्च, पोटॅशियम आणि इतर मिनरल्स असतात. जी रोपांच्या वाढीसाठी उत्तम मानली जातात. यापासून तयार केलेला खत गुलाबाच्या रोपासाठी कोणत्याही टॉनिकपेक्षा कमी नसते. हे नैसर्गिक खत तयार करण्याची पद्धत खूपच वेगळी आणि सोपी आहे. सगळ्यात आधी कच्चा बटाटा घ्या आणि व्यवस्थित किसून घ्या. नंतर हा किसलेला बटाटा एक लिटर पाण्यात मिसळा. हे मिश्रण रात्रभर किंवा जवळपास १० ते १२ तासांसाठी तसंच सोडा. दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून घ्या.

या फर्टिलायजरचा योग्य परिणाम होण्यासाठी रोपांच्या मुळांशी हे फर्टीलायजर पोहोचणं खूपच गरजेचं आहे. सगळ्यात आधी गुलाबाच्या रोपाची माती हलक्या हातानं खोदून घ्या. नंतर यात तयार बटाट्याचं पाणी घाला. काही दिवसांत तुम्हाला रोप बहरलेलं दिसेल आणि नवीन कळ्यासुद्धा आलेल्या दिसून येतील.

या उपायामुळे रोपाला नैसर्गिकरित्या पोषण मिळेल. मातीत मॉईश्चर टिकून राहील. रोपाची मुळं मजबूत होतील तसंच फुलांची संख्या आणि क्वालिटी चांगली राहण्यास मदत होईल. गुलाबाचे रोप जास्त उन्हाच्या ठिकाणी ठेवू नका. या रोपाला सौम्य सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते.

Web Title : गर्मी में गुलाब को पुनर्जीवित करें: भरपूर फूलों के लिए आलू उर्वरक।

Web Summary : गर्मी में गुलाब मुरझा रहे हैं? आलू उर्वरक का प्रयोग करें! आलू में स्टार्च और पोटेशियम होता है, जो गुलाब के विकास के लिए महत्वपूर्ण है। एक आलू कद्दूकस करें, पानी में भिगोएँ, छानें और मिट्टी में डालें। यह पोषक तत्व और नमी प्रदान करता है, जड़ों को मजबूत करता है और फूल उत्पादन को बढ़ाता है।

Web Title : Revive roses in summer: Potato fertilizer for abundant blooms.

Web Summary : Roses wilting in summer? Use potato fertilizer! Potatoes contain starch and potassium, vital for rose growth. Grate a potato, soak in water, strain, and apply to the soil. This provides nutrients and moisture, strengthening roots and boosting flower production.