Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > एरिका पाम नेहमीच सुकतो? चांगला वाढतच नाही? ४ टिप्स - पाम होईल हिरवागार

एरिका पाम नेहमीच सुकतो? चांगला वाढतच नाही? ४ टिप्स - पाम होईल हिरवागार

4 Tips For the Fast Growth of Areca Palm: आपण हौशीने एरिका पाम लावतो, पण तो चांगला वाढतच नसेल तर काय करावं? (gardening tips for areca palm plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2026 17:50 IST2026-04-18T17:49:17+5:302026-04-18T17:50:08+5:30

4 Tips For the Fast Growth of Areca Palm: आपण हौशीने एरिका पाम लावतो, पण तो चांगला वाढतच नसेल तर काय करावं? (gardening tips for areca palm plant)

4 tips for the fast growth of areca palm, how to keep areca palm always fresh and green, gardening tips for erica palm plant | एरिका पाम नेहमीच सुकतो? चांगला वाढतच नाही? ४ टिप्स - पाम होईल हिरवागार

एरिका पाम नेहमीच सुकतो? चांगला वाढतच नाही? ४ टिप्स - पाम होईल हिरवागार

घराचा लूक बदलून टाकणारं एक हिरवंगार रोप म्हणजे एरिका पाम. हे रोप नुसतं पाहिलं तरी मन प्रसन्न वाटू लागतं. हिरव्यागार एरिका पामची कुंडी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात आणून ठेवली तरी घराचा लूक पूर्णपणे बदलून जातो. साधच घर अधिक प्रसन्न, फ्रेश वाटायला लागतं. पण नेमकी अशी अडचण होते की आपण हौशीने लावलेले एरिका पाम सुकून जाते. किंवा त्याची म्हणावी तशी वाढ होत नाही. ते सुकायला लागतं. किंवा पानं सुकून कोरडी होऊन जातात. असं झालं की नेमकं काय चुकतं ते कळत नाही. म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा (gardening tips for arica palm plant). काही दिवसांतच एरिका पाम छान हिरवंगार होऊन जाईल.(4 tips for the fast growth of arica palm)

एरिका पाम नेहमीच हिरवेगार ठेवण्यासाठी कशी काळजी घ्यावी?

 

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एरिका पाम नेहमी अशा ठिकाणी ठेवावं जिथे त्याच्यावर कडक ऊन पडणार नाही. उन्हात ठेवायचं असेल तरी अशी जागा ठेवावी जिथे त्याच्यावर फक्त सकाळचं काेवळं ऊन पडेल. कारण या रोपाला खूप उन्हाची गरज नसते. तुमच्या घरातल्या एखाद्या खिडकीत हे रोप ठेवलं तरी चालेल.

आठवड्यातून २ वेळा चेहऱ्याला लावा 'हा' लेप, सुरकुत्या न येता पन्नाशीतही त्वचा राहील टाईट, सुंदर

२. एरिका पामला खूप पाण्याची गरज नसते. त्यामुळे त्याला खूप पाणी घालू नका. उन्हाळ्यात रोज पाणी घाला, पण प्रमाण मर्यादित ठेवा. मातीचा वरचा थर सुकला तरच त्याला पाणी द्या. नाहीतर पानं पिवळी पडायला सुरुवात होते.

 

३. एरिका पामला महिन्यातून एकदा खत घालणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही बोन मील, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा विचार करू शकता. 

करिअर करताना मुलांकडे दुर्लक्ष होतं असं सतत वाटतं? मनातली अपराधीपणाची भावना कमी करण्यासाठी ३ उपाय

४. दमट वातावरणात एरिका पाम चांगलं वाढतं. तसं वातावरण जर त्याला द्यायचं असेल तर दोन ते तीन दिवसांतून एकदा त्याची पानं स्वच्छ धुवा. किंवा स्पंजने पुसून घ्या. यामुळे पानं छान स्वच्छ हिरवीगार, चमकदार दिसायला लागतात. आणि त्याला हवं तसं दमट वातावरण मिळतं. 

 

Web Title : एरेका पाम को हरा-भरा रखें: स्वस्थ विकास के लिए सरल उपाय।

Web Summary : एरेका पाम घर की सुंदरता बढ़ाते हैं पर अक्सर मुरझा जाते हैं। अप्रत्यक्ष प्रकाश, मध्यम पानी, मासिक खाद और नियमित सफाई से हरा-भरा विकास सुनिश्चित करें।

Web Title : Keep your Areca Palm green: Simple tips for healthy growth.

Web Summary : Erica Palms enhance home aesthetics but often wither. Ensure bright, indirect light, moderate watering, monthly fertilizing, and regular cleaning for lush, green growth.