Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > तुपाच्या बेरीची करा बेसन बर्फी, १० मिनिटांत मऊ लुसलुशीत गोड पदार्थ - तोंडात टाकताच विरघळेल, पाहा रेसिपी

तुपाच्या बेरीची करा बेसन बर्फी, १० मिनिटांत मऊ लुसलुशीत गोड पदार्थ - तोंडात टाकताच विरघळेल, पाहा रेसिपी

Best way to use leftover ghee residue waste: Easy Besan Ki Barfi recipe in Marathi: जिभेवर रेंगाळणारी आणि कमी साहित्यात होणारी मऊसुत बेसन बर्फी कशी बनवायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 09:30 IST2026-05-19T09:30:00+5:302026-05-19T09:30:02+5:30

Best way to use leftover ghee residue waste: Easy Besan Ki Barfi recipe in Marathi: जिभेवर रेंगाळणारी आणि कमी साहित्यात होणारी मऊसुत बेसन बर्फी कशी बनवायची पाहूया.

Tupachya berichi besan barfi recipe Soft and mouth melting Besan Barfi at Home Homemade besan burfi with left over ghee beri | तुपाच्या बेरीची करा बेसन बर्फी, १० मिनिटांत मऊ लुसलुशीत गोड पदार्थ - तोंडात टाकताच विरघळेल, पाहा रेसिपी

तुपाच्या बेरीची करा बेसन बर्फी, १० मिनिटांत मऊ लुसलुशीत गोड पदार्थ - तोंडात टाकताच विरघळेल, पाहा रेसिपी

घरगुती तूप बनवल्यानंतर पातेल्याच्या तळाशी उरणाऱ्या बेरीच काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. बरेचदा ती फेकून दिली जाते किंवा त्यात साखर मिसळून खाल्ली जाते.(besan barfi recipe) पण या बेरीमध्ये तुपाच्या अर्कासोबत माव्याची चव देखील लागते. जेवल्यानंतर बरेचदा आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी अगदी १० ते १५ मिनिटांत तयार होणारी बेरीची बेसन बर्फी खाऊ शकतो. (Easy Besan Ki Barfi recipe in Marathi)
तुपाच्या बेरीमुळे या बर्फीला एक नॅचरल चव आणि चांगला टेक्सचर मिळतो. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा पदार्थ आवडीने खातील. जिभेवर रेंगाळणारी आणि कमी साहित्यात होणारी मऊसुत बेसन बर्फी कशी बनवायची पाहूया. (Gram flour and beri burfi recipe)

ना ओव्हन, ना स्टीमर! कुकरमध्ये २० मिनिटांत करा मऊ- जाळीदार ढोकळा, विकतपेक्षा हलका ढोकळा घरच्याघरी

साहित्य 

बेसन पीठ - १ कप 
रवा - १ कप 
तूप - १/४ कप 
बेरी - १ छोटी वाटी 
गूळ - १ वाटी 
ड्राय फ्रूट्सचे काप - गरजेनुसार 
वेलची पूड- १ छोटा चमचा


कृती 

1. सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात १ ते २ चमचे तूप घालून बेसनाचे पीठ आणि रवा मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. बेसनाचा छान सुवास सुटेपर्यंत त्याचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत ते सतत ढवळत राहा. बेसन जितके छान भाजले जाईल, तितकी बर्फी चवदार होईल. 

2. बेसन भाजून झाल्यावर कढईत उरलेल्या तुपाची बेरी घाला. बेरी आणि बेसन एकजीव करुन २ ते ३ मिनिटे मंद आचेवर चांगले परतवून घ्या.

3. आता या मिश्रणामध्ये गूळ आणि वेलची पूड घाला. सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर हवं असल्यास दूध मिक्स करा. दूध घातल्यामुळे बेसन आणि बेरी छान मऊ होते आणि तिला अगदी माव्यासारखा मऊपणा (Soft Texture) येतो.

4. जर दूध घातले असेल तर तूप सुटेपर्यंत सतत हलवत राहा. घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. आता एका ताटाला तेलाने किंवा तूपाने ग्रीस करा. कढईतले मिश्रण ताटात पसरवून घ्या. चमच्याने किंवा वाटीने सपाट पसरवा. वरुन बदामाचे किंवा पिस्त्याचे काप पसरवून हलके दाबून घ्या. 

5. मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर त्याचे चौकोनी आकारात तुकडे करा. नंतर बर्फी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एअर टाईट डब्यात भरा बेसन बेरी बर्फी. 

 


Web Title : घी के अवशेष से बेसन बर्फी: एक त्वरित और स्वादिष्ट रेसिपी

Web Summary : घी के अवशेष को फेंके नहीं! मिनटों में बेसन बर्फी बनाएं। यह रेसिपी प्राकृतिक स्वाद और मुलायम बनावट के लिए घी के अवशेष का उपयोग करती है। यह एक मीठा व्यंजन है जो सभी को पसंद आएगा। बेसन, सूजी, घी, गुड़ और इलायची प्रमुख सामग्री हैं।

Web Title : Besan Barfi from Ghee Residue: A Quick & Delicious Recipe

Web Summary : Don't throw away ghee residue! Make Besan Barfi in minutes. This recipe uses ghee residue for a natural flavor and soft texture. It's a sweet treat everyone will love. Gram flour, semolina, ghee, jaggery, and cardamom are key ingredients.