Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > काकडीचे ‘पहाडी रायते’ खाऊन तर पाहा, शेफ कुणाल कपूरची रेसिपी- कोशिंबिरीपेक्षा भारी तोंडीलावणं

काकडीचे ‘पहाडी रायते’ खाऊन तर पाहा, शेफ कुणाल कपूरची रेसिपी- कोशिंबिरीपेक्षा भारी तोंडीलावणं

Pahadi Raita Recipe By Chef Kunal Kapoor: काकडीच्या कोशिंबीरीपेक्षा काहीतरी वेगळं खायचं असेल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेला पहाडी रायता नक्की ट्राय करून पाहा..(how to make cucumber pahadi raita?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 18:01 IST2025-06-06T12:28:35+5:302025-06-06T18:01:47+5:30

Pahadi Raita Recipe By Chef Kunal Kapoor: काकडीच्या कोशिंबीरीपेक्षा काहीतरी वेगळं खायचं असेल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेला पहाडी रायता नक्की ट्राय करून पाहा..(how to make cucumber pahadi raita?)

pahadi raita recipe by chef kunal Kapoor, how to make cucumber pahadi raita, pahadi raita recipe in Marathi  | काकडीचे ‘पहाडी रायते’ खाऊन तर पाहा, शेफ कुणाल कपूरची रेसिपी- कोशिंबिरीपेक्षा भारी तोंडीलावणं

काकडीचे ‘पहाडी रायते’ खाऊन तर पाहा, शेफ कुणाल कपूरची रेसिपी- कोशिंबिरीपेक्षा भारी तोंडीलावणं

Highlightsपहाडी रायता तुम्ही जसा कोशिंबीरीप्रमाणे तोंंडी लावायला घेऊ शकता तसाच तो पराठे, धपाटे, थालिपीठ, मसाले भात, बिर्याणी यासोबतही खाऊ शकता. 

त्याच त्याच चवीची काकडीची कोशिंबीर खाऊन कधीतरी कंटाळा येतोच. काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. किंवा घरी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी एखादी वेगळी रेसिपी ट्राय करून पाहावी वाटते. अशावेळी टिपिकल कोशिंबीरीच्या ऐवजी पहाडी रायता हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही रेसिपी अतिशय सोपी आहे. ती करण्यासाठी खूप काही वेगळी तयारी करण्याचीही गरज नाही (pahadi raita recipe by chef kunal Kapoor). शिवाय चवीला अतिशय उत्तम (how to make cucumber pahadi raita?). त्यामुळे सुटीच्या दिवशी कधीतरी जेवणात बदल म्हणून पहाडी रायता नक्की करून पाहा.(pahadi raita recipe in Marathi)

पहाडी रायता करण्याची रेसिपी 

 

साहित्य 

३ लसूण पाकळ्या

२ हिरव्या मिरच्या

२ ते ३ टेबलस्पून पुदिना आणि तेवढीच कोथिंबीर

जावई माझा भला! विराट कोहली म्हणतो, अनुष्काच्या आईबाबांनीही मला समजून घेतलंच ना, कारण..

१ टीस्पून हळद

१ टीस्पून लाल तिखट 

चवीनुसार मीठ

१ कप दही

अर्धी काकडी

 

कृती

ही रेसिपी करण्यासाठी तुमच्याकडे दगडी पाटा वरवंटा असेल तर खूपच छान. नसेल तर तुम्ही मिक्सरमधूनही वाटून ही रेसिपी करू शकता.

सगळ्यात आधी तर पाटा वरंवटा घेऊन त्यावर लसूण आणि मिरच्या अगदी बारीक वाटून घ्या.

गडबडीत भाजीमध्ये खूपच तेल घातलं? तवंग काढून भाजीतलं तेल कमी करण्यासाठी २ खास उपाय

यानंतर पुदिना, कोथिंबीर घ्या. त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट घाला आणि ते ही वरवंट्याने वाटून घ्या. 

आता लसूण- मिरची आणि पुदिना- कोथिंबीर पेस्ट एका भांड्यामध्ये काढा. त्यात वाटीभर दही घाला. दही घालण्यापुर्वी ते फेटून एकसारखं करून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये किसलेली काकडी घालावी.

सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून दह्यासोबत छान एकजीव करून घेतले की चवदार पहाडी रायता झाला तयार. पहाडी रायता तुम्ही जसा कोशिंबीरीप्रमाणे तोंंडी लावायला घेऊ शकता तसाच तो पराठे, धपाटे, थालिपीठ, मसाले भात, बिर्याणी यासोबतही खाऊ शकता. 


 

 

Web Title: pahadi raita recipe by chef kunal Kapoor, how to make cucumber pahadi raita, pahadi raita recipe in Marathi