Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Mint Lemonade : पचन सुधारेल आणि पोटाला मिळेल थंडावा, घरीच तयार करा कॅफेसारखं पुदिना लिंबाचं सरबत

Mint Lemonade : पचन सुधारेल आणि पोटाला मिळेल थंडावा, घरीच तयार करा कॅफेसारखं पुदिना लिंबाचं सरबत

Mint Lemonade: Improves digestion and cools the stomach, prepare cafe-like mint lemonade at home : पुदिना आणि लिंबाचे सरबत एकदा नक्की पिऊन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2026 08:25 IST2026-05-20T08:20:30+5:302026-05-20T08:25:02+5:30

Mint Lemonade: Improves digestion and cools the stomach, prepare cafe-like mint lemonade at home : पुदिना आणि लिंबाचे सरबत एकदा नक्की पिऊन पाहा.

Mint Lemonade: Improves digestion and cools the stomach, prepare cafe-like mint lemonade at home | Mint Lemonade : पचन सुधारेल आणि पोटाला मिळेल थंडावा, घरीच तयार करा कॅफेसारखं पुदिना लिंबाचं सरबत

Mint Lemonade : पचन सुधारेल आणि पोटाला मिळेल थंडावा, घरीच तयार करा कॅफेसारखं पुदिना लिंबाचं सरबत

उन्हाळ्यात सतत काही तरी थंडगार प्यावेसे वाटते. मात्र भरपूर साखर असलेले विकतचे पदार्थ खामे किंवा पेयं पिणे यापेक्षा घरीच चविष्ट आणि थंडगार पेयं तयार करणं जास्त चांगलं आणि आरोग्यासाठी योग्य ठरतं. त्यामुळे उन्हाळ्यात असे पदार्थ आहारात असतील तर नक्कीच शरीराला थंडावा मिळतो. अशीच एक मस्त रेसिपी म्हणजे पुदिना आणि लिंबाचे सरबत. करायला सोपे आणि चवीला छान .

मिंट लेमनेड बनवण्यासाठी फार काही करायचे नाही अगदी कमी कष्टात होते. ताज्या पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. (Mint Lemonade: Improves digestion and cools the stomach, prepare cafe-like mint lemonade at home)मिक्सरमध्ये पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, थोडी साखर किंवा मध आणि चिमूटभर काळे मीठ घालून मिश्रण तयार करावे. त्यानंतर त्यात थंड पाणी मिसळावे. आवडत असल्यास काही बर्फाचे तुकडे घालावेत. मिक्सरमधू फिरवून घ्या आणि नंतर गाळूनही घ्या. तयार झालेले हे थंडगार मिंट लेमनेड ग्लासमध्ये ओतून वरून काही पुदिन्याची पाने ठेवल्यास ते आणखी आकर्षक दिसते.

लिंबामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला ताजेतवाने वाटण्यास मदत होते. उन्हामुळे येणारा थकवा कमी करण्यासाठीही हे पेय उपयोगी ठरू शकते. पुदिना शरीराला गारवा देण्यास मदत करतो. त्यामुळे उष्णतेमध्ये फ्रेश वाटते आणि तोंडाची चवही सुधारते. हे पेय शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. सतत घाम येत असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी असे नैसर्गिक पेय फायदेशीर ठरू शकते. काही लोकांना पुदिन्यामुळे पचन सुधारल्यासारखेही वाटते.

घरच्या घरी तयार केलेले मिंट लेमनेड बाजारातील जास्त साखर असलेल्या पेयांपेक्षा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र साखर मर्यादित प्रमाणात वापरणे आणि कोणतेही पेय अति प्रमाणात न पिणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर एखाद्या कॅफेमध्ये गेलात तर असेच पदार्थ फार महाग विकले जातात. त्यामुळे लहान मुलांनाही असे फॅन्सी ड्रिंक घरीच करुन द्या. त्यांनाही मजा वाटेल. 
 

Web Title : ठंडा पुदीना नींबू पानी: पाचन और ताजगी के लिए आसान घरेलू नुस्खा।

Web Summary : घर पर बने पुदीना नींबू पानी से गर्मी को मात दें! यह सरल नुस्खा ताज़ा, स्वस्थ और हाइड्रेटिंग गर्मी के पेय के लिए ताज़ी सामग्री का उपयोग करता है जो पाचन में सहायता करता है। यह शर्करा युक्त दुकानों से बेहतर है।

Web Title : Cooling Mint Lemonade: Easy homemade recipe for digestion and refreshment.

Web Summary : Beat the heat with homemade mint lemonade! This simple recipe uses fresh ingredients for a refreshing, healthy, and hydrating summer drink that aids digestion. It's better than sugary store-bought options.