Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > हॉटेलात ४०० रुपयांत मिळणारा पास्ता घरीच करा १० मिनिटांत, खा पोटभर-चव हॉटेलपेक्षा उत्तम

हॉटेलात ४०० रुपयांत मिळणारा पास्ता घरीच करा १० मिनिटांत, खा पोटभर-चव हॉटेलपेक्षा उत्तम

Make white sause pasta at home in just 10 minutes , must try recipe , children will love it : विकतपेक्षा मस्त पास्ता करा घरीच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 15:51 IST2026-04-23T15:48:22+5:302026-04-23T15:51:43+5:30

Make white sause pasta at home in just 10 minutes , must try recipe , children will love it : विकतपेक्षा मस्त पास्ता करा घरीच.

Make white sause pasta at home in just 10 minutes , must try recipe , children will love it | हॉटेलात ४०० रुपयांत मिळणारा पास्ता घरीच करा १० मिनिटांत, खा पोटभर-चव हॉटेलपेक्षा उत्तम

हॉटेलात ४०० रुपयांत मिळणारा पास्ता घरीच करा १० मिनिटांत, खा पोटभर-चव हॉटेलपेक्षा उत्तम

इटालीयन पदार्थ भारतात तसे फार लोकप्रिय आहेत. त्यापैकी एक म्हणजे पास्ता. करायला सोपा आणि चवीला भारी. मात्र चांगल्या कॅफेमध्ये पास्ता ४०० ते ५०० रुपयांना मिळतो. खरंच चविष्ट आणि दर्जेदार पास्ता खाण्यासाठी खर्च जास्त करावा लागतो. (Make white sause pasta at home in just 10 minutes , must try recipe , children will love it)पण घरी अगदी कमी सामानातही विकतपेक्षा भारी आणि क्रिमी पास्ता करता येतो. पाहा सोपी रेसिपी.

साहित्य 
पास्ता, दूध, हिरवी मिरची, लसूण, बटर, कांदा, सिमला मिरची, ओरेगॅनो, चिलीफ्लेक्स, पाणी, मीठ, काळीमिरी पूड, मैदा, चीज, तेल

कृती
१.तुम्हाला आवडेल तो पास्ता घ्या, पाण्यात मीठ घालायचे. त्यात थोडे तेल घालायचे. पाणी उकळून घ्यायचे. मग त्यात पास्ता घालायचा.  पास्ता मस्त उकळायचा. तो शिजला की गॅस बंद करायचा. चमच्याने चिकटलेला पास्ता सोडवायचा आणि गार पाण्यात ओतायचा. गाळून घ्यायचा. पाणी निथळत ठेवायचे.

२. हिरवी मिरची बारीक चिरायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि त्याची पेस्ट तयार करायची. लसूण जास्त वापरा. कांदा चौकोनी आकारात चिरुन घ्यायचा. सिमला मिरचीही चौकोनी चिरायची. पॅनमध्ये थोडं बटर घ्यायचं आणि त्यावर कांदा, सिमला मिरची परतून घ्यायची. भाजी जरा छान परतली की काढून घ्यायची.

३. पॅनमध्ये बटर घालायचे. त्यावर लसूण परतायची मग बटर वर चार लहान चमचे मैदा परतायचा. जास्त मैदा नको. मैदा जरा परतला की त्यात हळूहळू दूध घालून ढवळत राहायचे. त्यात गुठळ्या होणार नाहीत. भांडं भर दूध तर आरामात लागेल. मग त्यात आवडीनुसार किसलेले चीज घालायचे. घट्ट सॉस तयार होतो. दुधाचे प्रमाण किती हवी ते ठरवा आणि मध्यम घट्ट असा सॉस तयार करा. 

४. त्यात ओरेगॅनो घाला. तसेच चिली फ्लेक्स घाला. थोडी काळिमीरी पूड घाला आणि मग परतलेल्या भाज्या घाला. सगळं मिक्स करुन घ्या.  त्यात शिजवलेला पास्ता घाला. गरजेनुसार थोडं दूध घाला आणि झाकण ठेवा. एक उकळी काढून घ्यायची. मग दोन मिनिटे पास्ता परतायचा. गरमागरम खायचा. 

Web Title : 10 मिनट में घर पर बनाएं रेस्टोरेंट जैसा पास्ता, कम खर्च में!

Web Summary : अब घर पर ही बनाएं क्रीमी और स्वादिष्ट पास्ता, वो भी रेस्टोरेंट से कम दाम में! इस आसान रेसिपी में पास्ता, दूध, सब्जियां और पनीर जैसे साधारण सामग्री का उपयोग करके कुछ ही मिनटों में स्वादिष्ट व्यंजन तैयार किया जा सकता है। झटपट और तृप्तिदायक भोजन के लिए बिल्कुल सही।

Web Title : Make restaurant-style pasta at home in 10 minutes for less!

Web Summary : Enjoy creamy, delicious pasta at home without the restaurant price! This easy recipe uses simple ingredients like pasta, milk, vegetables, and cheese to create a flavorful dish in just minutes. Perfect for a quick and satisfying meal.