Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उष्णतेमुळे गुळाला पाणी सुटले- चिकट लगदा झाला? ‘असा’ ठेवा गूळ- पावसाळ्यातही राहील चांगला

उष्णतेमुळे गुळाला पाणी सुटले- चिकट लगदा झाला? ‘असा’ ठेवा गूळ- पावसाळ्यातही राहील चांगला

How to Keep Jaggery Fresh in Summer?: उन्हाळ्याच्या दिवसांत गूळ साठवून ठेवताना खूप वेळा ही अडचण येतेच. हे टाळण्यासाठी बघा काही साध्या सोप्या ट्रिक्स...(why do jaggery or gud becomes so sticky in summer?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 17:31 IST2026-04-27T17:30:46+5:302026-04-27T17:31:20+5:30

How to Keep Jaggery Fresh in Summer?: उन्हाळ्याच्या दिवसांत गूळ साठवून ठेवताना खूप वेळा ही अडचण येतेच. हे टाळण्यासाठी बघा काही साध्या सोप्या ट्रिक्स...(why do jaggery or gud becomes so sticky in summer?)

how to keep jaggery fresh in summer, why do jaggery or gud becomes so sticky in summer | उष्णतेमुळे गुळाला पाणी सुटले- चिकट लगदा झाला? ‘असा’ ठेवा गूळ- पावसाळ्यातही राहील चांगला

उष्णतेमुळे गुळाला पाणी सुटले- चिकट लगदा झाला? ‘असा’ ठेवा गूळ- पावसाळ्यातही राहील चांगला

Highlights अगदी ५- ६ महिने गूळ चांगला राहील. अजिबात खराब होणार नाही.

सध्या उष्णता भयंकर वाढलेली आहे. त्याचा परिणाम अन्न पदार्थांवरही होतो. सकाळच्या स्वयंपाकात केलेले वरण, भाजी असे पदार्थ रात्रीपर्यंत खराब झालेले असतात. ऊन वाढल्याचा परिणाम गुळावरही होतोच. काही वेळेस गूळ पातळ, चिकट व्हायला लागतो. त्याला तारा सुटायला लागतात. तर कधी कधी त्याला पांढरट बुरशी येऊन आंबूस वास यायला लागतो. हे सगळं टाळायचं असेल तर उन्हाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूमध्ये गूळ साठवून ठेवताना थोडी काळजी घ्यायला हवी. त्यामुळे अगदी ५- ६ महिने गूळ चांगला राहील. अजिबात खराब होणार नाही.(How to Keep Jaggery Fresh in Summer?) 

गुळाला पाणी सुटून तो चिकट होऊ नये म्हणून काय करावं?

 

१. या दिवसांत गूळ साठविण्यासाठी काचेच्या किंवा एअर टाईट बरण्यांचा वापर करा. या बरण्यांमध्ये साठवलेला गूळ अधिककाळ चांगला राहातो.

न्यासाशी रोज व्हायचं भांडण, ३ वर्षे डोक्याला ताप!’- काजोल सांगते घरातलं वादळ कसं शांत झालं..

२. रोजच्या स्वयंपाकात लागणारा गूळ एका छोट्या डब्यात काढून ठेवावा. जेणेकरून स्वयंपाक करताना ओलसर हात लागून गूळ खराब आणि चिकट होत नाही.

३. गूळ जर टिश्यू पेपर किंवा पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळून मग एअर टाईट डब्यात ठेवला तर त्याला पाणी सुटत नाही. पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळलेला गूळ तुम्ही स्टीलच्या डब्यातही ठेवू शकता.

 

४. गूळाचा डबा अशा ठिकाणी ठेवा जिथली जागा जास्त गरम होत नाही. किंवा त्या ठिकाणी थेट ऊन पडत नाही. काही वेळा अगदी गॅस शेगडीच्या वरच्या किंवा बाजुच्याच कप्प्यांमध्ये गूळ ठेवलेला दिसतो. उष्णतेमुळे त्या गुळाला लवकर पाणी सुटून तो खराब होतो. 

तुम्हाला प्रचंड स्ट्रेस आलाय,ओव्हर थिंकिंग करुन डोकं फुटेल-हे सांगणारी ५ लक्षणं, दुर्लक्ष पडेल महागात

५. गुळाचे लहान लहान तुकडे करून तो डब्यात भरून फ्रिजमध्येही ठेवू शकता. अशा पद्धतीने ठेवलेला गूळ महिनोंमहिने अगदी फ्रेश राहातो.

 

Web Title : गुड़ को पिघलने से बचाएं: गर्मियों में ताजा रखने के आसान उपाय

Web Summary : अधिक गर्मी के कारण गुड़ पिघलने लगता है या उसमें फफूंद लग जाती है। इसे एयरटाइट कंटेनर में रखें, पेपर नैपकिन का उपयोग करें और गर्म स्थानों से बचें। रेफ्रिजरेशन भी गुड़ को महीनों तक ताजा रखने, खराब होने से बचाने और गुणवत्ता बनाए रखने में मदद करता है।

Web Title : Keep Jaggery Fresh: Simple Tips to Prevent Melting in Summer

Web Summary : High heat causes jaggery to melt or develop mold. Store it in airtight containers, use paper napkins, and avoid warm places. Refrigeration also helps keep jaggery fresh for months, preventing spoilage and maintaining quality.