उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी बरेच लोक नारळ पाणी पितात. नारळ पाणी हे कोणत्याही अमृतापेक्षा कमी नसते. नारळपाणी फक्त तहान भागवत नाही तर शरीराला त्वरीत एनर्जी देण्यासाठीही गुणकारी ठरते. लोक अनेकदा नारळ विकत घेताना फसतात बरेच नारळ हे आतून सुकलेले असतात आणि इतके पैसे देऊन नारळातून काहीच पाणी निघत नाही. (How To Choose Coconut With More Water)
नारळपाणी विकणाऱ्या दादांनी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकमुळे तुम्हालाही खूप पाणी असलेलं नारळ शोधणं सोपं होईल. नारळपाण्याची क्वालिटी ओळखण्याची ही ट्रिक आवाजाशी जोडलेली आहे ३ ग्लास पाणी असलेलं नारळपाणी कसं निवडावं ते समजून घ्या. (How To Identify Dry And Watery Coconut Before Buy It)
नारळ पाण्याचा आकार
लोक हा विचार करून मोठं नारळ उचलतात की यात जास्त पाणी असेल पण हा एक चुकीचा समज आहे. विक्रेते सांगतात की नेहमीच मध्यम आकाराच्या नारळाची निवड करावी. मोठ्या नारळांमध्ये मलई जास्त असते आणि पाण्याचे प्रमाण कमी असते. मध्यम आकाराचे नारळ कच्चे नसतात जास्त पिकलेलेही नसतात म्हणून यात पाण्याचं संतुलन चांगले राहते.
नारळाचा आवाज
नारळ कानाजवळ घेऊन दोन्ही हातांनी हलवून पाहा. ही खूप जुनी ट्रिक आहे. नारळ हलवल्यानंतर त्यातून खूप आवाज येत असेल तर यात पाणी नाही असं समजा. नारळाच्या आत हवा जास्त आणि पाणी कमी असते. जे नारळ हलवल्यावर त्यातून आवाज येत नाही अशा नारळात पाणी भरपूर असते. म्हणून हे नारळ हलवल्यावर आवाज येत नाही किंवा खूप कमी आवाज येतो. जास्त आवाज येणारं नारळ सुकलेलं किंवा खराबही असू शकतं.
त्रिकोण आकार तयार होत असलेले नारळ बनावट असतात. अशा नारळांच्या वरच्या बाजूला २ कोण दिसतात. असे नारळ रिकामे आणि सुकलेले असतात. पूर्णपणे अंडाकृती किंवा गोल असलेल्या नारळाची निवड करा. गोल नारळात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते.
वरून सुकलेलं दिसणारं नारळ
बरेच लोक चमकणारे नारळ शोधतात पण जास्त पाणी हे सुकलेल्या नारळात नसते. विक्रेत्यानं दावा केला आहे की ज्या नारळाचे बाहेरील साल थोडे सुकलेले दिसते ते पूर्णपणे पिकलेले असते. अशा नारळातून जवळपास ३ ग्लास पाणी निघते. नारळ विकत घेताना जर जास्त वजनदार वाटत असेल तर बिंधास्त घ्या. जड नारळाचा संबंध जास्त पाण्याशी असतो. पण जर नारळ हलकं वाटत असेल तर त्यातील पाणी सुकलेलं असू शकतं.
