Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कैरी नु रस.. खाऊन पाहा गुजराथी पारंपरिक पदार्थ- आंबट गोड तिखट चव-तोंडाला पाणीच सुटेल

कैरी नु रस.. खाऊन पाहा गुजराथी पारंपरिक पदार्थ- आंबट गोड तिखट चव-तोंडाला पाणीच सुटेल

Gujarati 'Keri Nu Ras' Recipe: गुजराथी स्टाईलचा कैरी नु रस हा एक खास पदार्थ आता कसा करायचा ते पाहुया... उन्हाळा संपण्याचा आधी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा..(how to make 'keri nu ras recipe' in gujarathi style?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 17:53 IST2026-05-18T17:52:33+5:302026-05-18T17:53:41+5:30

Gujarati 'Keri Nu Ras' Recipe: गुजराथी स्टाईलचा कैरी नु रस हा एक खास पदार्थ आता कसा करायचा ते पाहुया... उन्हाळा संपण्याचा आधी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा..(how to make 'keri nu ras recipe' in gujarathi style?)

Gujarati Keri Nu Ras recipe, how to make keri nu ras recipe in gujarathi style, raw mango recipe  | कैरी नु रस.. खाऊन पाहा गुजराथी पारंपरिक पदार्थ- आंबट गोड तिखट चव-तोंडाला पाणीच सुटेल

कैरी नु रस.. खाऊन पाहा गुजराथी पारंपरिक पदार्थ- आंबट गोड तिखट चव-तोंडाला पाणीच सुटेल

Highlights साध्या भातासोबत किंवा खिचडीसोबत खायला हा पदार्थ अतिशय उत्तम लागतो. तो नेमका कसा करायचा ते पाहाच..

मे महिना आता मध्यावर आला आहे. पुढच्या काही दिवसांतच कैरीचा सिझन आता संपणार आहे. एकदा कैरीचा हंगाम संपला की मग पुन्हा ८ ते १० महिन्यानंतरच कैरी खायला मिळते. त्यामुळे सध्या कैरी अगदी मुबलक प्रमाणात मिळते आहे तर ती भरभरून घ्या आणि तिचे वेगवेगळे पदार्थ करा. याच पदार्थांच्या यादीतला एक चटपटीत पदार्थ म्हणजे गुजरातचा कैरी नु रस. यालाच आपल्याकडे कोकणात मोहरीचा आंबा किंवा आंब्याचं रायतं असं म्हणतात. मालवण भागात हा पदार्थ जास्त केला जातो. साध्या भातासोबत किंवा खिचडीसोबत खायला हा पदार्थ अतिशय उत्तम लागतो. तो नेमका कसा करायचा ते पाहाच..(how to make 'keri nu ras recipe' in Gujarathi style?)

गुजराथी स्टाईल 'कैरी नु रस' करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ मध्यम आकाराच्या कैरी

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, लाल मिरच्या, जिरे, कडिपत्ता

चमचा मसाज ऐकलाय? 'या' पद्धतीने रोज सकाळी २ चमचे चेहऱ्यावरून फिरवा-इन्स्टंट ग्लो-चेहरा चमकेल

दिड ते २ टेबलस्पून गूळ

चिमूटभर हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार लाल तिखट आणि मीठ

कृती

गुजराथी स्टाईलचा कैरी नू रस करण्यासाठी सगळ्यात आधी कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी घालून कैरी उकडून घ्या.

 

उकडलेली कैरी थंड झाल्यानंतर तिची सालं काढून टाका आणि गर काढून घ्या. आता ब्लेंडर किंवा मिक्सर वापरून कैरीचा गर एकजीव करून घ्या. त्यात थोडं पाणीही घाला. हा रस आपल्याला जेवढा पातळ करायचा असेल तेवढं त्यात पाणी घालावं.

साडीची घडी मोडण्याच्या जुन्या प्रथेचा पाहा खास अर्थ.. तुम्ही मोडलीय का कधी आईच्या-वहिनीच्या साडीची घडी? 

त्यानंतर त्यात गूळ, लाल तिखट, मीठ घालून व्यवस्थित हलवून घ्यावं. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. तिच्यामध्ये तेल, मोहरी, हिंग, जिरे, वाळलेल्या लाल मिरच्या, कडिपत्ता घालून फोडणी करून घ्या. आता त्यामध्ये कैरीचा पाणी घालून कालवून घेतलेला गर घाला. या मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम कैरी नू रस सर्व्ह करा.. 

 

Web Title : गुजराती केरी नु रस: खट्टा, मीठा, तीखा आम का आनंद

Web Summary : आम का मौसम ख़त्म होने से पहले, गुजराती केरी नु रस बनाएँ! यह खट्टा, मीठा और तीखा व्यंजन, कोंकणी मोहरीचा आंबा के समान, चावल या खिचड़ी के साथ परोसने के लिए उत्तम है। कच्चे आम उबालें, गूदा मिलाएं, गुड़ और मसाले डालें, सरसों के बीज और करी पत्ते से तड़का लगाएं, और धनिया से सजाएं। इस अनोखे आम की रेसिपी का आनंद लें!

Web Title : Gujarati Keri Nu Ras: Sweet, Sour, and Spicy Mango Delight

Web Summary : As the mango season nears its end, try Gujarati Keri Nu Ras! This sweet, sour, and spicy dish, similar to Konkani Mohoricha Amba, is perfect with rice or khichdi. Boil raw mangoes, blend the pulp, add jaggery and spices, temper with mustard seeds and curry leaves, and garnish with coriander. Enjoy this unique mango recipe!