Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > आशा भोसलेंनी सांगितलेली सोलकढीची रेसिपी एकदा व्हायरल झाली आणि..! डिजिटल जगातली सुंदर आठवण

आशा भोसलेंनी सांगितलेली सोलकढीची रेसिपी एकदा व्हायरल झाली आणि..! डिजिटल जगातली सुंदर आठवण

Asha Bhosle’s Favourite Solkadhi Recipe : अगदी १० मिनिटात सोलकढी करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 14:10 IST2024-07-25T18:22:17+5:302026-04-13T14:10:05+5:30

Asha Bhosle’s Favourite Solkadhi Recipe : अगदी १० मिनिटात सोलकढी करा..

Asha Bhosle’s Favourite Solkadhi Recipe | आशा भोसलेंनी सांगितलेली सोलकढीची रेसिपी एकदा व्हायरल झाली आणि..! डिजिटल जगातली सुंदर आठवण

आशा भोसलेंनी सांगितलेली सोलकढीची रेसिपी एकदा व्हायरल झाली आणि..! डिजिटल जगातली सुंदर आठवण

आशा भोसलेंचं गाण्याइतकंच प्रेम स्वयंपाकावर होतं. अत्यंत सुगरण. प्रत्येक पदार्थ उत्तम झाला पाहिजे या कटाक्षानं त्या स्वयंपाकाचंही नियोजन करत. त्यांनी जगभरात अनेक रेस्टॉरण्ट्सही काढली. त्यांनी सांगितलेली सोलकढीची रेसिपी दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियात फार व्हायरल झाली होती. 
त्या करत तशी प्रमाण -कृतीसह सोलकढी कशी करायची हे त्यांनी आपण स्वत: करतो त्या प्रमाण कृतीसह सगळे तपशिलानं सांगितले होते. त्या सांगण्यातही एक मिश्किलपणा होता आणि पारंपरिक सोलकढीची रसरशीत चवही!

खाण्याखिलवण्यावरचं त्यांचं प्रेम आणि पदार्थालाही मायेनं एक खास चव देण्याची त्यांची रीत ही खरी तर त्या व्हायरल गोष्टीतली सगळ्यात सुंदर आठवण.

त्यांनी सांगितलेल्या कृतीचा हा व्हिडिओही पाहा..




सोलकढी कशी करायची?

किसलेलं खोबरं

हिरव्या मिरच्या

लसूण

आलं

साखर

मीठ

पांढऱ्या शर्टाच्या कॉलरवरचे हट्टी डाग घासूनही निघत नाही? फक्त २ उपाय; कपडे दिसतील चकाचक

कोथिंबीर

हिंग

कृती

सर्वात आधी ओला नारळ किसून घ्या. मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबरं, ३ हिरव्या मिरच्या, ४ लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि पाणी घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार केल्यानंतर एका बाऊलवर चाळण ठेवा. त्यात पेस्ट ओतून खोबऱ्याचं दूध गाळून घ्या.

वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

एका बाऊलमध्ये २ ते ३ कोकम घ्या. त्यात पाणी घालून कोकमचं पाणी तयार करा. कोकमचं पाणी खोबऱ्याच्या दुधात घालून मिक्स करा. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर आणि चिमुटभर हिंग घालून मिक्स करा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे गोवन स्टाईल सोलकढी पिण्यासाठी रेडी.

Web Title: Asha Bhosle’s Favourite Solkadhi Recipe