lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी करण्यासाठी हिरवे मोड आलेले मूग खाता? पाहा भिजत घालण्याची योग्य पद्धत, खाण्याची योग्य वेळ..

वजन कमी करण्यासाठी हिरवे मोड आलेले मूग खाता? पाहा भिजत घालण्याची योग्य पद्धत, खाण्याची योग्य वेळ..

Sprout moong beans the right way for weight loss : फक्त वेट लॉससाठी नसून, हिरवे मूग बॅड कोलेस्टेरॉल, हेअर लॉस आणि नजर तेज करण्यासही मदत करते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 03:30 PM2024-03-15T15:30:29+5:302024-03-15T15:35:02+5:30

Sprout moong beans the right way for weight loss : फक्त वेट लॉससाठी नसून, हिरवे मूग बॅड कोलेस्टेरॉल, हेअर लॉस आणि नजर तेज करण्यासही मदत करते

Sprout moong beans the right way for weight loss | वजन कमी करण्यासाठी हिरवे मोड आलेले मूग खाता? पाहा भिजत घालण्याची योग्य पद्धत, खाण्याची योग्य वेळ..

वजन कमी करण्यासाठी हिरवे मोड आलेले मूग खाता? पाहा भिजत घालण्याची योग्य पद्धत, खाण्याची योग्य वेळ..

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. पौष्टीक घटकयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते. आपण वेट लॉससाठी मोड आलेले हिरवे मूग खाऊ शकता. अंकुरित मूगामध्ये कॅलरीज कमी आणि दर्जेदार पोषक जास्त प्रमाणात आढळतात. त्यात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते (Fitness). प्रति १०० ग्रॅम मूगामध्ये फक्त ३० कॅलरीज आढळून येतात.

मूगामध्ये असलेले फायबर अन्न पचनास मदत करते (Weight Loss). यासह बॅड कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी होते. पण मोड आलेले हिरवे मूग कधी खावे? याचे इतर आरोग्यदायी फायदे किती?(Sprout moong beans the right way for weight loss).

मोड आलेले हिरवे मूग खाण्याचे फायदे

वेट लॉससाठी उपयुक्त

मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. १०० ग्रॅम मूगामध्ये ३० कॅलरीज आढळून येतात. तसेच अंकुरलेल्या मुगात तांबे, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीर सुदृढ आणि वजन कमी करण्यास मदत होते. मोड आलेल्या मुगामध्ये असलेले फायबर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

पिवळे दात राहतील कायम पांढरेशुभ्र, बाल्कनीत कुंडीत लावा ३ रोपं, करा साेपा उपाय

डोळ्यांसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन ए समृद्ध मोड आलेले हिरवे मूग डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अंकुरलेले मूग व्हिटॅमिन ए चा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि तेज होते.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करते

एक कप स्प्राउट्समध्ये १४ ग्रॅम प्रथिने असतात. एक कप मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये ०. ३८ ग्रॅम चरबी असते. कमी चरबीयुक्त आहार आणि फायबरयुक्त स्प्राउट्स बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

उन्हाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते? रामदेव बाबा सांगतात ६ सोपे बदल; पचेल अन्न-राहाल निरोगी

हेअर ग्रोथसाठी उत्तम

मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. नियमित मोड आलेले मूग खाल्ल्याने केस गळणे कमी होते आणि कोंडापासून आराम मिळतो. शिवाय ब्लड सर्क्युलेशन वाढते. ज्यामुळे नव्या केसांच्या वाढीस मदत होते.

Web Title: Sprout moong beans the right way for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.