lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पिवळे दात राहतील कायम पांढरेशुभ्र, बाल्कनीत कुंडीत लावा ३ रोपं, करा साेपा उपाय

पिवळे दात राहतील कायम पांढरेशुभ्र, बाल्कनीत कुंडीत लावा ३ रोपं, करा साेपा उपाय

3 Plants That Help Whiten Teeth : घरी लावलेल्या झाडांमुळे दात, कीड आणि कॅव्हिटी कशी दूर होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 04:13 PM2024-03-13T16:13:04+5:302024-03-13T17:46:08+5:30

3 Plants That Help Whiten Teeth : घरी लावलेल्या झाडांमुळे दात, कीड आणि कॅव्हिटी कशी दूर होईल?

3 Plants That Help Whiten Teeth | पिवळे दात राहतील कायम पांढरेशुभ्र, बाल्कनीत कुंडीत लावा ३ रोपं, करा साेपा उपाय

पिवळे दात राहतील कायम पांढरेशुभ्र, बाल्कनीत कुंडीत लावा ३ रोपं, करा साेपा उपाय

दात स्वच्छ तर, आरोग्य उत्तम. पण दात जर अस्वच्छ असतील तर, दातामधील पिवळेपणा, कीड आणि कॅव्हिटीमुळे आपण चारचौघात हसणं देखील टाळतो. शिवाय आरोग्यही बिघडते ते वेगळंच. दात पिवळे होणे, कॅव्हिटी, दाढेमध्ये कीड लागणे यामुळे दात बऱ्याचदा कमकुवतही होतात (Oral Health). दात निरोगी राहावे यासाठी आपण डेण्टिस्टकडे जातो. पण तिथे जाऊन बराच खर्च होतो. जर दात कायम स्वच्छ, दातांचे दुखणे, हिरड्या निरोगी, श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आपण आयुर्वेदिक उपाय फॉलो करू शकता (Teeth Whitening).

दंतवैद्याकडे जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा घरातच आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची झाडे लावा. यामुळे ओरल हेल्थ निरोगी राहील. शिवाय दात कायम चमकतील(3 Plants That Help Whiten Teeth).

घराच्या बाल्कनीत लावा ३ झाडं, दातांच्या आरोग्यासाठी उत्तम

बाभूळ

बाभूळ हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बाभूळ हे दातांसाठी प्रभावी ठरते. ज्यामुळे दात चमकदार दिसतात. आयुर्वेदात बाभळीच्या डहाळ्यांचा वापर डिस्पोजेबल टूथब्रश म्हणून करण्यात येते. बाभूळमध्ये आढळणारे टॅनिन दात एका झटक्यात पांढरे करतात. त्यामुळे पूर्वीच्या लोकांचे दात अजूनही मजबूत आहेत. जर आपल्याही दातांच्या मागे दुखणे लागू नये असे वाटत असेल तर, बाभळीच्या डहाळ्यांनी दात घासा.

उन्हाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते? स्वामी रामदेव बाबा सांगतात ६ सोपे बदल; पचेल अन्न-राहाल निरोगी

तुळशीचे रोप

भारतीय घरांमध्ये तुळशीला विशेष महत्व आहे. याचा वापर आयुर्वेदिक गोष्टींसाठी करण्यात येते, शिवाय आपण याचा वापर दात चमकवण्यासाठी करू शकता. यासाठी आधी तुळशीची पाने वाळवून घ्या. त्याची पावडर तयार करा, व या पावडरने नियमित दात घासा. तुळशीची हिरवी पाने दात मजबूत करतात. शिवाय त्यातील आयुर्वेदिक घटकांमुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत नाही.

कडूनिंब

आजही अनेक भारतीय लोकं कडुनिंबाच्या फांद्या टूथब्रश म्हणून याचा वापर करतात. यात अँटीसॅप्टिक गुणधर्म असतात. कडूलिंबाच्या तेलामध्ये तोंड व श्वासातून येणारा दुर्गंध दूर करणारे गुणधर्म आढळतात. शिवाय याच्या फांद्यांनी दात घासल्याने डोळ्यांना न दिसणारे सुक्ष्मजीव देखील नष्ट होतात. त्यामुळे नियमित कडूनिंबाने दात घासावेत.

प्रसूतीनंतर वाढलेलं वजन-ओटीपोट कमीच होईना? 'या' फुलांच्या पाण्याने अंग शेका; वेट लॉससाठी उत्तम

इतर उपाय

- दात आणि ओरल हेल्थ निरोगी राखण्यासाठी दिवसातून दोनदा दात घासा.

- तीळ किंवा खोबरेल तेलाने ऑईलं पुलिंग करा.

- टंग क्लीनरच्या वापराने नियमित जीभ स्वच्छ करा.

- खाल्ल्यानंतर नेहमी तोंड आणि दात स्वच्छ करायला विसरू नका.

- व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे अधिक सेवन करा. कारण व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ दातांवरील प्लेक साफ करतात.

Web Title: 3 Plants That Help Whiten Teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.