Lokmat Sakhi >Health >Pregnancy > प्रसूतीनंतर वाढलेलं वजन-ओटीपोट कमीच होईना? 'या' फुलांच्या पाण्याने अंग शेका; वेट लॉससाठी उत्तम

प्रसूतीनंतर वाढलेलं वजन-ओटीपोट कमीच होईना? 'या' फुलांच्या पाण्याने अंग शेका; वेट लॉससाठी उत्तम

Losing weight after pregnancy : प्रेग्नन्सीनंतर ओटीपोट कमी करणं कठीण वाटतं, पण आपण हिट बाथ ट्रिटमेण्ट घेऊन वजन कमी करू शकता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 10:32 PM2024-03-12T22:32:13+5:302024-03-13T11:31:29+5:30

Losing weight after pregnancy : प्रेग्नन्सीनंतर ओटीपोट कमी करणं कठीण वाटतं, पण आपण हिट बाथ ट्रिटमेण्ट घेऊन वजन कमी करू शकता..

Losing weight after pregnancy | प्रसूतीनंतर वाढलेलं वजन-ओटीपोट कमीच होईना? 'या' फुलांच्या पाण्याने अंग शेका; वेट लॉससाठी उत्तम

प्रसूतीनंतर वाढलेलं वजन-ओटीपोट कमीच होईना? 'या' फुलांच्या पाण्याने अंग शेका; वेट लॉससाठी उत्तम

गर्भधारणेदरम्यान आणि मुलाला जन्म दिल्यानंतर अनेक महिलांचे वजन वाढते (Pregnancy Weight Gain). प्रसूतीनंतर, विशेषत: ओटीपोटाचा भाग वाढू लागतो. ज्यामुळे शरीर सामान्यापेक्षा जाड दिसू लागते. अशा स्थितीत वाढलेल्या वजनामुळे महिला चिंतेत राहतात (Weight Loss). दैनंदिन व्यायाम किंवा योग्य आहाराचे पालन करणे बहुतांश स्त्रियांना टास्क वाटते (Fitness Tips). पण जिद्द न सोडता आपण प्रसूतीनंतरचे वाढलेलं वजन आणि सुटलेलं ओटीपोट कमी करू शकता.

यासंदर्भात नॅच्युरोपॅथी स्पेशलिस्ट डॉक्टर निताशा गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रसूतीनंतर वाढलेलं अवाढव्य वजन, आणि सुटलेलं ओटीपोट कमी करण्यास कोणत्या टिप्स उपयुक्त ठरतील याची माहिती दिली आहे(Losing weight after pregnancy).

डिलिव्हरीनंतर वजन कसे कमी करावे?

डॉक्टर निताशा सांगतात, 'प्रसूतीनंतर बऱ्याचदा पोटाचा खालचा भाग वाढतो. शिवाय काही महिलांना मासिक पाळीची समस्याही येऊ लागते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपचार घेणं केव्हाही उत्तम. आपण वजन कमी करण्यासाठी पळसाच्या फुलांचा देखील वापर करू शकता.'

वजन कमी करणं कठीण वाटतं? हळद आणि आल्याचा करा जबरदस्त उपाय; डाएट-जिमशिवाय घटेल वजन

वेट लॉससाठी पळसाच्या फुलांचा वापर कसा करावा?

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. उत्तर भारतात वसंत ऋतुत याच्या झाडास सुंदर गर्द केशरी रंगाची फुले येतात. तर, महाराष्ट्रात हिवाळ्यात फुले येतात. पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-ट्युमर गुणधर्म असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. याने वेटलॉससाठीही मदत होते.

- यासाठी मुठभर पळसाची फुलं एका बंडलमध्ये बांधून घ्या. एका मोठ्या भांड्यात एक लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात फुलांची पोटली ठेवा. १० ते १५ मिनिटानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर पोटली बाहेर काढून गॅस बंद करा.

- उकळलेले पाणी एका टबमध्ये काढून घ्या. कोमट झाल्यानंतर त्या पाण्यात बसा. मुख्य म्हणजे ओटीपोट आणि मांड्या पाण्यात शेकून घ्यायला हवे. आपण साधारण या पाण्यात १५ मिनिटांसाठी बसू शकता.

- या पाण्याने शेक घेतल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. मासिक पाळीची समस्या दूर होऊ शकते. आपण याचा वापर आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.

या टिप्स उपयुक्त ठरू शकतात

सामान्यतः प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी, काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जसे की,

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना, कोणत्याही वेळचं जेवण कधीही वगळू नये.

जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

जेवणासोबत हेल्दी स्नॅक्स घेत राहा.

दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या.

आहारातून साखर आणि सोडा वगळा.

फळांचे रस पिण्याऐवजी साधी फळे खाण्याचा प्रयत्न करा. यातून शरीराला पोषण मिळते.

तळलेले अन्न, मैदायुक्त, पॅकेज्ड फूड खाणे टाळा.

Web Title: Losing weight after pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.