Lokmat Sakhi >Fitness > जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

Does Lemon Water Help You Lose Weight : वजन घटेल-पचनही सुधारेल; फक्त नियमित कोमट पाण्यात एक रस मिसळून प्याच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 12:54 PM2024-02-22T12:54:34+5:302024-02-22T12:55:23+5:30

Does Lemon Water Help You Lose Weight : वजन घटेल-पचनही सुधारेल; फक्त नियमित कोमट पाण्यात एक रस मिसळून प्याच..

Does Lemon Water Help You Lose Weight? | जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

वजन वाढीची समस्या सध्या जागतिक समस्या बनत चालली आहे. वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मुख्य म्हणजे बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वजन झपाट्याने वाढत जाते (Fitness Tips). व्यायामाचा अभाव, डाएटकडे दुर्लक्ष करणे, यासह उलट-सुलट पदार्थ खाणे, यामुळे वजन वाढतेच (Lemon For Weight Loss).

वजन कमी करण्यासाठी आपण जिम, डाएट, योग, यासह इतर उपाय अवलंबून पाहतो. पण नकळत घडणाऱ्या चुकांमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते (Weight Loss). काही लोकं रिकाम्या पोटी लिंबू पाणी पितात. पण वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिण्याची देखील एक योग्य पद्धत आहे(Does Lemon Water Help You Lose Weight?).

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिण्याची योग्य पद्धत

- लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. यासह नियमित याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. आपण रिकाम्या पोटी दररोज कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून पिऊ शकता. या पाण्यातील गुणधर्मामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

हा १ आयुर्वेदिक काढा प्या, सुटलेलं पोट कमी करण्यासाठी रामदेवबाबांचा खास उपाय

कोमट पाण्यातच लिंबाचा रस घालून का प्यावे?

- सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने चयापचय क्रिया बुस्ट होते. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रोसेसला गती मिळते. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. शिवाय शरीर ताजेतवाने-फ्रेश राहते.

पचनक्रिया सुधारते

पचनक्रियेत अडथळे येत असतील तर, आपण कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिक्स करून पिऊ शकता. या पेयातील अॅसिड अन्न पचण्यास मदत करतात. ज्यामुळे पोट निरोगी राहते. यासह पोटाचे विकार आपल्याला छळत नाही. परिणामी वजन नियंत्रित राहते.

थुलथुलीत पोट-बेढप शरीरामुळे त्रस्त? जीवनशैलीत करा ५ छोटेसे बदल-मिळेल परफेक्ट मनासरखी फिगर

या गोष्टींची विशेष काळजी घ्या..

बिघडलेली जीवनशैली, व्यायाम न करणे, जास्त जंक फूड आणि तळलेले अन्न खाणे. यासारख्या खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे फक्त लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होणार नाही हे लक्षात ठेवा. त्यापेक्षा दैनंदिन व्यायाम आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Does Lemon Water Help You Lose Weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.