lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी करणं कठीण वाटतं? हळद आणि आल्याचा करा जबरदस्त उपाय; डाएट-जिमशिवाय घटेल वजन

वजन कमी करणं कठीण वाटतं? हळद आणि आल्याचा करा जबरदस्त उपाय; डाएट-जिमशिवाय घटेल वजन

Turmeric and Ginger Tea for Weight loss and Reduce belly fat!! : मांड्याचे फॅट-थुलथुलीत पोट सपाट करण्यासाठी हळद आणि आल्याचा 'या' पद्धतीने करा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 12:56 PM2024-03-12T12:56:33+5:302024-03-12T12:58:00+5:30

Turmeric and Ginger Tea for Weight loss and Reduce belly fat!! : मांड्याचे फॅट-थुलथुलीत पोट सपाट करण्यासाठी हळद आणि आल्याचा 'या' पद्धतीने करा वापर

Turmeric and Ginger Tea for Weight loss and Reduce belly fat!! | वजन कमी करणं कठीण वाटतं? हळद आणि आल्याचा करा जबरदस्त उपाय; डाएट-जिमशिवाय घटेल वजन

वजन कमी करणं कठीण वाटतं? हळद आणि आल्याचा करा जबरदस्त उपाय; डाएट-जिमशिवाय घटेल वजन

हळद आणि आल्याचे (Turmeric and Ginger) सेवन वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यातील गुणधर्म शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते. याचे एकत्र सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया व्यवस्थित राहते. आल्यामध्ये काही संयुगे आढळतात, जे चरबी जाळण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.

वजन वाढले की, शरीरात अनेक प्रकारचे विषारी पदार्थ जमा होतात (Weight Loss Tea). ही विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी हळद आणि आल्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते (Slim and Fit). असे क्लिनिकल डाइटिशियन डॉ वीडी त्रिपाठी सांगतात(Turmeric and Ginger Tea for Weight loss and Reduce belly fat!!).

त्यांच्या मते, 'पोटाचे विकार यासह वजन कमी करण्यासाठी आलं आणि हळद फायदेशीर ठरू शकते. याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि भूक नियंत्रित राहते. हळद आणि आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात.'

पाठदुखीने हैराण? उठता-बसताही येत नाही? रोज खा चमचाभर 'ही' पावडर; पन्नाशीनंतरही राहतील हाडं मजबूत

वजन कमी करण्यासोबतच हळद आणि आल्याचे सेवन केल्याने शरीराला मिळतील अनेक फायदे

- पचनक्रिया मजबूत करण्यासाठी फायदेशीर.

- उलटी, मळमळ यासारख्या समस्यांवर उपयुक्त.

- किडनी आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर.

- शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत.

जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

- इम्युनिटी बुस्ट करण्यास फायदेशीर. व्हायरल इन्फेक्शनपासून सरंक्षण.

- हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत.

वजन कमी करण्यासाठी हळद आणि आल्याचे सेवन कसे करावे?

आपण हळद आणि आल्याचे पेय तयार करून वजन घटवू शकता. यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक आल्याचा तुकडा, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. २ मिनिटानंतर गॅस बंद करा, व चहाच्या गाळणीने गाळून पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होईल.

Web Title: Turmeric and Ginger Tea for Weight loss and Reduce belly fat!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.