Lokmat Sakhi >Fitness > कोरोनातून बरं झाल्यावर फुप्फुसाची ताकद वाढवण्यासाठी करावेत असे आवश्यक व्यायाम !

कोरोनातून बरं झाल्यावर फुप्फुसाची ताकद वाढवण्यासाठी करावेत असे आवश्यक व्यायाम !

व्यायामांनी गुडघेदुखी, पाठदुखी अगदी पॅरालीसीस बरा होत असलेला तुम्ही ऐकलं असेल. पण कोविडनंतर व्यायामांनी पूर्ववत होता येते हे तुम्हाला माहित आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 PM2021-05-10T16:19:31+5:302021-05-11T12:30:47+5:30

व्यायामांनी गुडघेदुखी, पाठदुखी अगदी पॅरालीसीस बरा होत असलेला तुम्ही ऐकलं असेल. पण कोविडनंतर व्यायामांनी पूर्ववत होता येते हे तुम्हाला माहित आहे का?

Necessary Exercises to Increase Lung Strength After corona infection & treatment. | कोरोनातून बरं झाल्यावर फुप्फुसाची ताकद वाढवण्यासाठी करावेत असे आवश्यक व्यायाम !

कोरोनातून बरं झाल्यावर फुप्फुसाची ताकद वाढवण्यासाठी करावेत असे आवश्यक व्यायाम !

डॉ. देविका गद्रे

व्यायामांनी गुडघेदुखी, पाठदुखी अगदी पॅरालीसीस बरा होत असलेला तुम्ही ऐकलं असेल. पण कोविडनंतर
व्यायामांनी पूर्ववत होता येते हे तुम्हाला माहित आहे का? कोरोनामुळे रुग्णाच्या फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर
परिणाम होतो. ह्यात तुम्हाला कार्डीओपल्मोनरी फिजिओथेरपी नक्कीच मदत करू शकते.
कार्डीओपल्मोनरी फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय? कार्डिओ म्हणजे हृदय आणि पल्मोनरी म्हणजे फुप्फुसे.
आपल्या हृदय आणि फुप्फुसांची क्षमता वाढवण्याचे काम हे विशिष्ट प्रकारचे व्यायाम करतात.


कोविडमधून बरे होताना कोणती लक्षणे दिसून येतात?


१) दिवसभर शारिरीक थकवा जाणवणे २) शारिरीक श्रमांनंतर धाप लागणे ३) श्वास प्रभावीपणे घेण्याची क्षमता
कमी होणे. ४) वजन कमी होणे ५) शरीराची एकंदरीत कार्यक्षमता कमी होणे ६) स्नायूंमधील ताकद कमी होणे ७) स्नायूमध्ये ताठरता येणे ८) सांधेदुखी ९) दैनंदिन जीवनाची गुणवत्ता खालावणे १०) मानसिक आरोग्यावर
परिणाम होणे
यासारख्या तक्रारींमद्धे कोणत्या रुग्णांना व्यायामाचा उपयोग होऊ शकतो?
अशा रुग्णांचे ३ टप्प्यात वर्गीकरण करता येईल.
१) रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेले रुग्ण 
२) रुग्णालयात स्थिरावलेली तब्येत/ ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 
३) घरातच विलगीकरणात असलेले रुग्ण


या रुग्णांनी कुठले व्यायाम करावेत?


१) व्हेंटिलेटरवरील रुग्ण: शरीराची हालचाल मंदावल्यामुळे येणाऱ्या समस्या जसे की बेडसोर्स किंवा प्रेशर
अल्सर्स यांचा धोका कमी करण्यासाठी फिजिओथेरपीची मदत होते. रुग्ण व्हेंटिलेटरवर असतांना फुप्फुसे
श्वास सामावून घेण्यासाठी असमर्थ असतात. तसेच फुप्फुसातील स्नायूंची ताकदही खालावते. ह्याचमुळे
फुप्फुसात कफ जमा होणे स्वाभाविक असते. रुग्ण स्वतः हा कफ बाहेर काढू शकत नसल्यामुळे
फिजिओथेरपीमधल्या उपायांनी हा कफ बाहेर काढले जाणे अत्यावश्यक ठरते.
२) ऑक्सिजनवर असलेले रुग्ण: ह्या टप्प्यात रुग्णाची एकूणच कार्यक्षमता वाढवण्याचे काम
फिजिओथेरपिस्ट करतात. योग्य सल्ल्यानुसार हळूहळू थोड्या प्रमाणात चलनवलन चालू केले जाऊ शकते.
रुग्णाच्या त्यावेळच्या प्रकृतीनुसार त्याला श्वसनाचे व्यायाम व फुप्फुसातील साठलेला कफ बाहेर
काढण्यासाठीचे व्यायाम शिकवणे महत्वाचे असते.
३) विलगीकरणात असलेले /रुग्णालयातून घरी आलेले रुग्ण: रुग्णालयातून घरी आलात म्हणजे तुम्ही
पूर्णपणे तंदुरुस्त झालात का? नाही. अजूनही रुग्णाला श्वास घेण्याची ताकद वाढवणे गरजेचे असते.
काही रुग्णांना बेडवर उठून बसतांना किंवा उभं राहतांनासुद्धा त्रास होऊ शकतो. दम लागणे, हातापायातील
शक्ती नाहीशी होणे इत्यादी समस्या दिसून येतात. असे झाल्यामुळे शारिरीक हालचाल मात्र आपोआपच
मंदावते आणि इथे व्यायामाची सर्वात जास्त मदत होते.

 


दम/धाप कमी करण्यासाठी...


१) योग्य शारिरीक स्थितीचा वापर

(सौजन्य: गुगल फोटो)

रुग्णाने दोन्ही हात मांड्यांवर, टेबलवर, खुर्चीवर किंवा उशीवर ठेवावेत.
यामुळे अगदी त्या क्षणाला लागलेला दम थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. आपल्या छातीच्या
स्नायूंची योग्य प्रकारे हालचाल झाल्यामुळे प्राणवायू शरीरात अधिक प्रभावीपणे घेता येऊ शकतो आणि
साहजिकच प्राणवायूची शरीरातील पातळीही वाढते. अजून एक नेहमी सांगितला जाणारा उपाय म्हणजे
पोटावर झोपणे. मात्र पोटावर झोपल्यावर एक उशी पोटाखाली घ्यावी आणि दुसरी उशी पायांखाली ठेवावी.
डोके एका बाजूला करून पडून राहावे. यामुळे छातीच्या व पोटाच्या बाकीच्या स्नायूंना आधार मिळतो
आणि त्यामुळेच श्वास घेण्यासाठी लागणारे योग्य स्नायू काम करतात.

(सौजन्य: गुगल फोटो)

२) दर अर्ध्या ते पाऊण तासाने स्थिती बदलणे. समजा पहिल्यांदा रुग्ण पोटावर झोपला असेल तर अर्ध्या
तासाने एका कुशीवर वळणे. पुढील अर्ध्या तासाने भिंतीला टेकून किंवा बेडला थोडे वर करून झोपणे.
आणि पुढच्या अर्ध्या तासाने दुसऱ्या कुशीवर वळून झोपणे. हे असे सतत केल्यामुळे रुग्ण दिवसभर एकाच
स्थितीत राहण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे रक्तप्रवाह आणि श्वास सुरळीत व्हायला मदत होते. तसेच
शरीराची ऊर्जासुद्धा वाढते.

(सौजन्य: गुगल फोटो)


३) सेमी फाउलर्स पोसिशन: म्हणजे ४५-६० अंशाच्या कोनात बेडला टेकून बसणे. रुग्णालयात ह्यासाठी
बेडला खाली-वर करण्याची सोय असते. घरी तुम्ही उशांचा वापरही करू शकता. हयामुळे मानेच्या आणि
खांद्याच्या स्नायूंना आधार मिळतो आणि रुग्ण जास्तीत जास्त श्वास आत घेऊ शकतो.


(सौजन्य: गुगल फोटो)


शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी तसेच मानसिक आरोग्य
सुधारण्यासाठी काय उपाय व व्यायाम असतात हे पुढच्या लेखात बघू.

(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत.)
devikagadre99@gmail.com

Web Title: Necessary Exercises to Increase Lung Strength After corona infection & treatment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.