lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

Best Bones Building Foods : ज्याप्रमाणे शरीर आणि हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम गरजेचे असते. त्याचप्रमाणे व्हिटामीन- डी सुद्धा आवश्यक असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:44 PM2024-01-29T12:44:21+5:302024-01-29T16:55:06+5:30

Best Bones Building Foods : ज्याप्रमाणे शरीर आणि हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम गरजेचे असते. त्याचप्रमाणे व्हिटामीन- डी सुद्धा आवश्यक असते.

Best Bones Building Foods : 5 Essential Nutrients Add in Your Diet After 30 Years To Make Your Muscles Bone | ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

 निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी आहाराकडे लक्ष देणं फार महत्वाचे असते. (Healthy Foods) खासकरून तिशीनंतर जर तुम्ही व्यवस्थित खाल्ले  नाही तर म्हातारपणात  हाडं कमकुवत होत जातात. (Best Bones Building Foods) डायबिटीस, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल अशा समस्या उद्भवतात. या वयात जबाबदाऱ्या वाढतात, आरोग्याकडे लक्ष न दिल्यास थकवा आणि कमकुवतपणा येतो. (5 Essential Nutrients Add in Your Diet After 30 Years To Make Your Muscles Bone and Brain)

आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांच्यामते वयाच्या तिशीनंतर शरीराच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. शरीराला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी तुम्ही डाएटकडे विशेष लक्ष द्यायला हवं. आपल्या आहारात पोषक तत्वांची कमतरता भासल्यास तुम्ही कोणत्याही स्थितीत फिट राहू शकणार नाही. (5 Natural Ways To Build Healthy Bones)

१) कॅल्शियम

कॅल्शियम  शरीराच्या आणि हाडांच्या मजबूतीसाठी महत्वाचे असते ज्यामुळे शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व मिळतात. कॅल्शियमयुक्त पदार्थांच्या सेवनाने  हाडं कमकुवत झाल्यानंतर होणारे ऑस्टयोपोरोसिस यांसारखे आजार उद्भवत नाहीत. आहारात डेअरी उत्पादनं, हिरव्या पालेभाज्या, फोर्टिफाईड फुट्सचा समावेश करा.

२) व्हिटामीन डी

ज्याप्रमाणे शरीर आणि हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम गरजेचे असते. त्याचप्रमाणे व्हिटामीन- डी सुद्धा आवश्यक असते. यातील पोषक तत्व कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त इम्यून सिस्टिम चांगली  राहण्यासही मदत होते.  यासाठी तुम्ही कोवळ्या उन्हात जाऊ शकता. फॅटी फिश, फोर्टिफाईड डेअरी प्रोडक्ट्सचे सेवन केल्यानेही हाडं चांगली राहतात.

राग आला की जीभेवरचा ताबाच सुटतो? सद्गुरू सांगतात १ गोष्ट करा; राग येणारच नाही-आनंदी राहाल


२) मॅग्नेशियम

मॅग्नेशियम एक असं तत्व आहे ज्यामुळे मसल्स फंक्शनबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यासाठी तुम्ही नट्स, सिड्स हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. 

कोण म्हणतं प्रोटीन खायला खर्च येतो? १० रूपयांत मिळणारे ५ व्हेज पदार्थ खा; हाडं मजबूत-खच्चून प्रोटीन मिळेल

३) ओमेगा-३ फॅटी एसिड्स-व्हिटामीन बी-12

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ओमेगा ३ फॅटी एसिड्स महत्वाचे असतात. यातील पोषक तत्व सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे ब्रेन पॉवर वाढण्यास मदत होते.  याव्यतिरिक्त तुम्ही फ्लेक्स सिड्स, सेलमन फिश, अक्रोड या पदार्थांचे सेवन  करू शकता.  नर्व्ह सिस्टीम चांगली राहण्यासाठी आणि रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी पोषक तत्वांचे असणे गरजेचे असते. यातील मांसपेशी हाडांमधये ताकद भरतात. यासाठी  तुम्ही फोर्टिफाईड फूड्सचा आहारात समावेश करू शकता.  

४) पोटॅशियम

वाढत्या वयात ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या अनेकांना उद्भवते.  ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. तुम्ही पालक, केल, बिन्स यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. 

हट्ट पूर्ण केला नाही की मुलं चिडतात-उलटं बोलतात? ३ गोष्टी करा, राग शांत होईल-गुणी होतील मुलं

५) फायबर्स आणि प्रोटीन्स

पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी ब्लड शुगर लेव्हल मॅनेज करण्यासाठी फायबर्सचे सेवन गरजेचे असते. फळं, भाज्या, डाळी,  बीन्स यांसारख्या पदार्थांच्या सेवन केल्यानं शरीरातील प्रोटीन्सचे प्रमाण वाढण्यास मदत होते. 

Web Title: Best Bones Building Foods : 5 Essential Nutrients Add in Your Diet After 30 Years To Make Your Muscles Bone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.