lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > हट्ट पूर्ण केला नाही की मुलं चिडतात-उलटं बोलतात? ३ गोष्टी करा, राग शांत होईल-गुणी होतील मुलं

हट्ट पूर्ण केला नाही की मुलं चिडतात-उलटं बोलतात? ३ गोष्टी करा, राग शांत होईल-गुणी होतील मुलं

3 Ways To Teach Your Child Anger Management Skills :

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 03:06 PM2024-01-26T15:06:19+5:302024-01-26T15:34:59+5:30

3 Ways To Teach Your Child Anger Management Skills :

3 Ways To Teach Your Child Anger Management Skills : How to Control Your Anger With Kids | हट्ट पूर्ण केला नाही की मुलं चिडतात-उलटं बोलतात? ३ गोष्टी करा, राग शांत होईल-गुणी होतील मुलं

हट्ट पूर्ण केला नाही की मुलं चिडतात-उलटं बोलतात? ३ गोष्टी करा, राग शांत होईल-गुणी होतील मुलं

राग (Anger) हे भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे.  पण अनेकांना राग इतका वाढतो की यामुळे नात्यावर चुकीचा परिणाम होतो. राग शांत करण्यात बराच वेळ जातो. (Easy Way To Handle Kids Anger) रागाने उलट बोलल्यानंतर अनेकांना समजतं की आपली हट्ट करण्याची पद्धत चुकीची होती. रागवणाऱ्या मुलांना वेळीच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला  शिकवलं तर पुढे जास्त त्रास होत  नाही. (How to Control Your Anger With Kids) अशावेळी पालकांची जबाबदारी असते की मुलांच्या रागावर त्यांना नियंत्रण ठेवता यायला हवं. चाईल्ड थेरेपिस्ट आणि पेरेंटीग एक्सपर्ट रीरी त्रिवेदी यांनी मुलांच्या रागाववर नियंत्रण मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत. (Parenting Tips) 

मुलांचा राग कसा हॅण्डल करावा? (How To Handle Kids Anger)

१) मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू नका

आई वडील मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. तुम्ही अशी चूक करू नका. मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या तर त्यांना सवय लागते आणि इच्छा पूर्ण न झाल्यास ते राग राग करतात. म्हणून त्यांना सुरूवातीपासूनच आवश्यक असतील त्याच गोष्टी घेऊन द्या.

२) मुलांना रागात काहीही बोलू नका

रागात तुम्ही मुलांना काहीही बोलाल तर ते तेच लक्षात ठेवतील. मुलांचा राग  शांत करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांच्याशी प्रेमाने बोला. मुलांना शांततेने बोलायला शिकवा. जर तुम्ही त्यांच्यावर रागावलात तर ते स्वत:ही तशीच प्रतिक्रिया देतील.  त्यांचे एग्रेशन लेव्हल जास्त वाढू शकते. 

३) एग्रेसिव्ह मुलांना एकटे सोडू नका

जर तुमचे मुल लहान असेल आणि कोणतीही जिद्द करत असेल तर त्याला शांत करण्यासाठी तुम्ही प्रेमाने स्पर्श करू शकता.  मिठी  मारणं, मुलांचा हात हातात घेणं, त्यांना प्रेमाने समजावणं. पण जर मुलं मोठी झाली असतील तर  राग कंट्रोल करण्यासाठी त्यांना वेळ दया आणि शांत होण्यासाठी वेळ द्या.

Web Title: 3 Ways To Teach Your Child Anger Management Skills : How to Control Your Anger With Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.