Lokmat Sakhi >Fashion > OMG!! आलिया भटने घातलं तब्बल २० कोटींचं नेकलेस, बघा एवढं खास त्यात आहे तरी काय

OMG!! आलिया भटने घातलं तब्बल २० कोटींचं नेकलेस, बघा एवढं खास त्यात आहे तरी काय

Hope Gala in London: Hope Gala या लंडन येथील सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट हिने घातलेलं अतिमहागडं नेकलेस पाहून सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले... (Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 07:15 PM2024-03-29T19:15:07+5:302024-03-29T19:16:13+5:30

Hope Gala in London: Hope Gala या लंडन येथील सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट हिने घातलेलं अतिमहागडं नेकलेस पाहून सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले... (Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr)

Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr at Hope Gala in London | OMG!! आलिया भटने घातलं तब्बल २० कोटींचं नेकलेस, बघा एवढं खास त्यात आहे तरी काय

OMG!! आलिया भटने घातलं तब्बल २० कोटींचं नेकलेस, बघा एवढं खास त्यात आहे तरी काय

Highlightsआलिया भटने जे नेकलेस घातलं आहे, ते हिरे आणि नीलम या अतिमहागड्या रत्नांपासून तयार केलेलं आहे.

अभिनेत्री आलिया भट हिच्या स्टाईलची, तिच्या कपड्यांची, दागदागिन्यांची नेहमीच चर्चा असते. कारण बॉलीवूडमधल्या ज्या काही महागड्या कपडे किंवा ॲक्सेसरीज घालणाऱ्या अभिनेत्री आहेत, त्यापैकी एक म्हणून आलिया भट ओळखली जाते. आलियाचे महागडे कपडे किंवा दागिने आपण नेहमीच बघत असतो. पण यावेळी मात्र तिने कमालच केली असून तब्बल २० कोटी रुपये किंमत असणारं अतिशय महागडं नेकलेस घालून तिने लंडन येथे झालेल्या Hope Gala सोहळ्यात उपस्थिती लावली. (Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr)

 

सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या माध्यमातून भारतातील गरजू, विविध सुविधांपासून वंचित असणाऱ्या किशोरवयीन मुलांसाठी फंड उभारण्यासाठी आलियाने या सोहळ्यास उपस्थिती लावली होती.

भरपूर खा आणि वजन उतरवा! तुम्हाला माहिती आहे का वेटलॉससाठी 'Volume Eating' चा नवा ट्रेण्ड?

यावेळी तिने वाईन रंगाचा गाऊन घातला होता आणि त्या गाऊनवर तिने इटलीच्या Bulgari या प्रसिद्ध ब्रॅण्डचे नेकलेस आणि अंगठी घातली होती. तिच्या या दागिन्यांची किंमत जवळपास २० कोटी रुपये एवढी असावी असे hindustantimes.com यांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.  

 

आलिया भटने जे नेकलेस घातलं आहे, ते हिरे आणि नीलम या अतिमहागड्या रत्नांपासून तयार केलेलं आहे. सगळ्या बाजुंनी हिरे जडविण्यात आलेल्या त्या नेकलेसवर ठिकठिकाणी बारीक आकाराचे नीलम आहेत.

रोपांना द्या बटाट्याच्या सालींचं सुपरफूड, बघा कसा करायचा वापर- रोपांची होईल भरघोस वाढ

तसेच पेंडंट म्हणूनही मोठ्या आकाराचा नीलम असून त्याभोवती अनेक लहान-लहान हिरे आहेत. पेंडंटप्रमाणेच अंगठीही डिझाईन करण्यात आलेली आहे. 
 

Web Title: Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr at Hope Gala in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.