Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Celebrity Corner > 'प्रिती..तूच PBKS ची खरी ट्रॉफी!’ हे वाचून प्रिती झिंटा चिडली, म्हणाली.. असल्या उपमा नको कारण..

'प्रिती..तूच PBKS ची खरी ट्रॉफी!’ हे वाचून प्रिती झिंटा चिडली, म्हणाली.. असल्या उपमा नको कारण..

People compared Priti Zinta with trophy, what she said will amaze you : या ट्विटवर प्रितीचे उत्तर कौतुकास्पदच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2026 14:10 IST2026-04-28T14:08:25+5:302026-04-28T14:10:08+5:30

People compared Priti Zinta with trophy, what she said will amaze you : या ट्विटवर प्रितीचे उत्तर कौतुकास्पदच.

People compared Priti Zinta with trophy, what she said will amaze you | 'प्रिती..तूच PBKS ची खरी ट्रॉफी!’ हे वाचून प्रिती झिंटा चिडली, म्हणाली.. असल्या उपमा नको कारण..

'प्रिती..तूच PBKS ची खरी ट्रॉफी!’ हे वाचून प्रिती झिंटा चिडली, म्हणाली.. असल्या उपमा नको कारण..

भारतात क्रिकेट फक्त एक खेळ नाही, तर लोकांच्या भावनेचा विषय आहे. गेली १८ वर्षे IPL (Indian Premier League) त्याच उत्साहाने संपन्न होत आहे. लोकं या सिरिजमध्ये पार बुडून जातात. अनेक वाद अनेक घटना घडतात तरी IPL क्रेझ काही कमी होत नाही. याच लिग मधील एक लोकप्रिय टिम म्हणजे पंजाब किंग्स (PBKS) संघात खेळाडू तर फार चांगले आहेत मात्र संघाने एकदाही IPL ट्रॉफी जिंकलेली नाही. तरी दर वर्षी त्याच उत्साहात ते मैदानात उरतात यामागचं एक कारण म्हणजे त्यांच्या मागे ठामपणे उभी असणारी टिमची को - ओनर प्रिती झिंटा. (People compared Priti Zinta with trophy, what she said will amaze you  )मैदानावर तिचा उत्साह, खेळाडूंना दिलेला पाठिंबा आणि संघाशी असलेली भावनिक नाळ यामुळे ती नेहमी चर्चेत असते. कधी अति आरडाओरडा नाही किंवा दिखावा नाही फक्त चेहऱ्यावर हास्य घेऊन ती स्टेडियममध्ये उभी असते. 

सध्या एक ट्विट फार व्हायरल होत आहे ते म्हणजे असे की , "पंजाबने कधीच ट्रॉफी जिंकली नाही कारण त्यांची खरी ट्रॉफी तर प्रिती झिंटा आहे." आता वाचायला फार गोड आणि प्रेमळ वाटणारे हे ट्विट प्रितीला ट्रोल करण्यासाठी नव्हते तर तिचे कौतुक करणारेच होते. मात्र त्या वाक्याचा बदलणारा अर्थ आणि त्यावर सोप्या आणि नर्म भाषेत प्रितीने दिलेले उत्तर फार समाधानकारक आहे. प्रत्येकालाच तिचं म्हणणं समजून घेणं गरजेचं आहे मात्र महिलांना तो मुद्दा समजणं जास्त गरजेचं आहे. 

किया नावाच्या ट्विटर आकाऊंटवरुन केली गेलेली ही कमेंट वाचून त्यावर प्रितीने रिप्लाय दिला आणि म्हणाली," थॅक्यू आणि फार गोड गोष्ट आहे की तुम्हाला असं वाटतं. पण खरं सांगू का स्वतःला ट्रॉफी म्हणून घेणं कोणत्याही स्त्रीसाठी चांगलं नाही. एक स्त्री कधीच कोणासाठीच ट्रॉफी असू शकत नाही. ट्रॉफी कुणीतरी जिंकलेली असते , हक्काची असते . एका स्त्रीवर कोणाचाही हक्क नसतो. ट्रॉफी फक्त कपाटात ठेवण्यासाठी असते. शेवटी ती शोभा वाढवण्यासाठीही वापरतातच पण एक स्त्री ही शोभेची वस्तू नाही. तिची जागा फक्त हृदयात असते." प्रितीचे हे ट्विट कोणालाही टोमणा मारणारे नव्हते तर तिला या उपमेबद्दल काय वाटतं हे सांगायचा प्रयत्न करताना तिने तो गोड शब्दांचा वापर केला. कोणालाही दुखावलं नाही. 

अनेकदा स्त्रियांना ट्रॉफी, लॉटरी किंवा विन अशा उपमा दिल्या जातात. त्या ऐकायला जरी कौतुकास्पद वाटल्या तरी त्यांच्या मागे मोठा अर्थ दडलेला आहे. आणि मनात पाप नसलं तरी अशा नावांनी महिलांना संबोधणं फार चुकीचे आहे. प्रितीच्या ट्विटचं लोकं कौतुक करत आहेत तर काही त्याला फुकटचं एक्सप्लेनेशन म्हणत आहेत. मात्र प्रिती तिच्या मतावर ठाम आहे. 

Web Title : प्रीति जिंटा ने ट्रॉफी तुलना का विरोध किया, कहा महिलाओं का सम्मान होना चाहिए।

Web Summary : प्रीति जिंटा ने एक ट्वीट पर प्रतिक्रिया दी जिसमें उनकी तुलना पीबीकेएस की ट्रॉफी से की गई थी। उन्होंने स्पष्ट किया कि महिलाओं को ट्रॉफी के रूप में नहीं माना जाना चाहिए, उन्होंने सम्मान और सतही तुलनाओं से परे निहित मूल्य पर जोर दिया। उनके बयान ने ऑनलाइन बहस छेड़ दी।

Web Title : Priti Zinta opposes trophy comparison, asserts women deserve respect.

Web Summary : Priti Zinta reacted to a tweet comparing her to PBKS's trophy. She clarified that women shouldn't be treated as trophies, emphasizing respect and inherent worth beyond superficial comparisons. Her statement sparked debate online.