Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > त्वचा टाइट आणि फ्रेश दिसण्यासाठी सतत बर्फाचा वापर करता? आधी जाणून घ्या काय काळजी घ्याल...

त्वचा टाइट आणि फ्रेश दिसण्यासाठी सतत बर्फाचा वापर करता? आधी जाणून घ्या काय काळजी घ्याल...

Ice for Skin : महिला किंवा तरूणी पूर्ण माहिती न घेताही हा उपाय करतात. जे नुकसानकारक ठरू शकतं. अशात पाहुयात की, बर्फाच्या पाण्याचे काय फायदे होतात आणि हे करत असताना काय काळजी घेतली पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:51 IST2026-04-25T09:51:04+5:302026-04-25T09:51:33+5:30

Ice for Skin : महिला किंवा तरूणी पूर्ण माहिती न घेताही हा उपाय करतात. जे नुकसानकारक ठरू शकतं. अशात पाहुयात की, बर्फाच्या पाण्याचे काय फायदे होतात आणि हे करत असताना काय काळजी घेतली पाहिजे.

Why applying ice directly to your face could be harmful for skin | त्वचा टाइट आणि फ्रेश दिसण्यासाठी सतत बर्फाचा वापर करता? आधी जाणून घ्या काय काळजी घ्याल...

त्वचा टाइट आणि फ्रेश दिसण्यासाठी सतत बर्फाचा वापर करता? आधी जाणून घ्या काय काळजी घ्याल...

Ice for Skin : काही महिन्यांआधी बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींचे बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे व्हिडीओ समोर आले होते. हाच ट्रेंड त्यांच्या महिला फॅन्समध्येही लोकप्रिय झाला. त्यांचा मुद्दा असा होता की, थंड पाण्याने चेहरा चांगला राहतो. म्हणजे थंड पाण्याने चेहऱ्याची सूज कमी होते, सैल त्वचा टाईट होते आणि चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येतो. बर्फ किंवा थंड पाण्याने त्वचेतील ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि त्याचे चांगले फायदे त्वचेला मिळतात, असा तो दावा होता. इतकंच नाही तर बर्फाच्या थंड पाण्याने चेहरा धुतल्याने मानसिक शांतताही मिळते असंही त्या सांगत होत्या. यातील काही दावे कदाचित खरेही असतील. पण खरंच याने काय होतं आणि हे करत असताना काय काळजी घ्यावी हे मात्र अजूनही अनेकांना माहीत नाही. महिला किंवा तरूणी पूर्ण माहिती न घेताही हा उपाय करतात. जे नुकसानकारक ठरू शकतं. अशात पाहुयात की, बर्फाच्या पाण्याचे काय फायदे होतात आणि हे करत असताना काय काळजी घेतली पाहिजे.

चेहऱ्याचा चिकटपणा कमी होतो

उन्हाचा पारा वाढला की, सतत येणारा घाम, तेलकट त्वचा यामुळे त्वचेवर धूळ-माती चिकटून बसणं कॉमन आहे. ज्यामुळे त्वचा सतत चिकट झाल्याची जाणीव होते. अशात थंड किंवा बर्फाच्या पाण्याने चेहरा धुणं हा एक सोपा उपाय ठरतो. थंड पाण्याने चेहरा धुतल्या धुतल्या त्वचेचं तापमान कमी होतं आणि चेहऱ्यावर फ्रेशनेस जाणवतो. मुळात उन्हाळ्यात त्वचा जास्त तेल प्रोड्यूस करते, ज्यामुळे त्वचा चिकट होते आणि यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अशात थंड पाण्याने चिकटपणा आणि पिंपल्स येण्याचा धोका कमी होतो. तसेच जास्तीच तेलही कंट्रोल राहतं.

वैज्ञानिक कारण

बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याच्या उपायाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिलं तर वेसोकंस्ट्रिक्शनमुळे त्वचेवर थंड पाण्याचा प्रभाव अधिक पडतो. थंड पाण्याच्या संपर्कात येताच त्वचेतील रक्तावाहिन्या आकुंचन पावतात आणि यामुळे सूज, जळजळ कमी होऊ लागते. रक्तवाहिन्यांच्या स्नायूं आकुंचन पावल्याने त्यांचा आकार छोटा होण्याच्या प्रक्रियेला वेसोकंस्ट्रिक्शन म्हणतात. हा प्रक्रिया रक्तप्रवाह कमी करून शरीराचं तापमान नियंत्रित करते. 

कशात अधिक फायदेशीर

उन्हाळ्यात त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. जसे की, सनबर्न, हीट रॅशेज, ओपन पोर्स, तेलकट त्वचा या समस्यां दूर करण्यासाठी बर्फाचं थंड पाणी फायदेशीर ठरतं. जर डोळ्यांखाली सूज असेल, चेहऱ्यावरील थकवा दूर करायचा असेल, चेहरा फ्रेश, टवटवीत करायचा असेल तर हा उपाय नक्कीच प्रभावी ठरतो.

काय काळजी घ्याल?

- बर्फ थेट त्वचेवर घासल्याने फ्रास्ट बाइटसारखी समस्या होऊ शकते. त्यामुळे तो नेहमी मुलायम कापडात गुंडाळून किंवा आइस रोलरमध्ये गुंडाळूनच त्वचेवर फिरवावा.

- थंड पाण्याने दिवसातून केवळ दोन ते तीन वेळा चेहरा धुणं पुरेसं आहे. जास्तवेळा बर्फ वापराल तर त्वचेचा नॅचरल ओलावा कमी होऊ शकतो.

- एक ते दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थंड पाण्यासाठी त्वचेवर वापर करू नये.

- ज्या लोकांची त्वचा फार संवेदनशील आहे किंवा ज्यांना रोजेसिया आहे, त्यांनी बर्फाचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे.  

- जास्त वेळ बर्फ थेट त्वचेवर ठेवल्यास आइस बर्न होऊ शकतो. यामुळे त्वचा लाल, जळजळीत किंवा सोलणारी होऊ शकते.  

- थंड तापमानामुळे त्वचेखालील लहान रक्तवाहिन्या फुटू शकतात, ज्यामुळे लालसर डाग दिसू शकतात.    

- बर्फामुळे नैसर्गिक तेल कमी होऊन त्वचा जास्त कोरडी आणि रफ वाटू शकते.  

- काही वेळा बर्फ लावल्याने पोर्स अचानक आकुंचन पावतात आणि मळ आत अडकू शकतो, ज्यामुळे पिंपल्स वाढू शकतात.

Web Title : त्वचा के लिए बर्फ: कसाव और ताजगी के लिए फायदे, सावधानियां

Web Summary : बर्फ का उपयोग तेल कम करता है, सूजन कम करता है, और त्वचा को कसता है। कपड़े का उपयोग करें, उपयोग सीमित करें, और लंबे समय तक उपयोग से बचें। संवेदनशील त्वचा वाले सूखेपन, लालिमा और ब्रेकआउट से बचने के लिए सावधानी बरतें।

Web Title : Ice for Skin: Benefits, Precautions for a Tight, Fresh Look

Web Summary : Using ice can reduce oiliness, inflammation and tighten skin. Use a cloth barrier, limit applications, and avoid prolonged use. Sensitive skin types should exercise caution to prevent dryness, redness, and breakouts.