Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > टोमॅटोच्या स्क्रबने पेडीक्युअर! महागड्या उपायांपेक्षा असरदार उपाय-घरच्याघरी पाय होतील स्वच्छ मऊ

टोमॅटोच्या स्क्रबने पेडीक्युअर! महागड्या उपायांपेक्षा असरदार उपाय-घरच्याघरी पाय होतील स्वच्छ मऊ

Natural foot exfoliation at home Marathi: Remedy for dark spots on feet: महागड्या क्रीम्सऐवजी टोमॅटोचा हा सोपा घरगुती उपाय एकदा नक्की करून पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 14:03 IST2026-04-27T14:02:28+5:302026-04-27T14:03:21+5:30

Natural foot exfoliation at home Marathi: Remedy for dark spots on feet: महागड्या क्रीम्सऐवजी टोमॅटोचा हा सोपा घरगुती उपाय एकदा नक्की करून पाहा.

Tomato Scrub for feet whitening How to remove sun tan from feet naturally Home pedicure with tomato and sugar soft and glowing feet | टोमॅटोच्या स्क्रबने पेडीक्युअर! महागड्या उपायांपेक्षा असरदार उपाय-घरच्याघरी पाय होतील स्वच्छ मऊ

टोमॅटोच्या स्क्रबने पेडीक्युअर! महागड्या उपायांपेक्षा असरदार उपाय-घरच्याघरी पाय होतील स्वच्छ मऊ

कडाक्याच्या उन्हात बाहेर पडताना आपण चेहऱ्याची आणि हातांची काळजी घेतो, सनस्क्रीन लावतो, पण पायांकडे मात्र आपले अनेकदा दुर्लक्ष होते. कडक उन्हामुळे पाय काळवंडणे, चपलांच्या पट्ट्यांचे व्रण उमटणे आणि त्वचा कोरडी होणे या समस्या सामान्य आहेत.(Natural foot exfoliation at home Marathi) अनेकजण पायांचा हा काळेपणा घालवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे पेडीक्युअर करतात. पण,प्रत्येक वेळी पार्लरला जाणे खिशाला परवडणारे नसते आणि रासायनिक उत्पादनांमुळे त्वचेला नुकसान पोहोचण्याची भीतीही असते. (Remedy for dark spots on feet)
अशा वेळी आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा टोमॅटो हा घटक पायांचे सौंदर्य परत मिळवण्यासाठी वरदान ठरू शकतो. टोमॅटोमध्ये असणारे नैसर्गिक 'ब्लिचिंग एजंट्स' आणि 'अँटी-ऑक्सिडंट्स' त्वचेवरील सन टॅन काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत.(Benefits of tomato for skin brightening Marathi) टोमॅटोच्या साह्याने घरच्या घरी केलेले पेडीक्युअर केवळ पायांचा काळेपणाच दूर करत नाही, तर पायांना मऊ आणि मुलायम बनवते. जर आपल्याही पाय दुधासारखे उजळ आणि सुंदर दिसावे असे वाटत असेल, तर महागड्या क्रीम्सऐवजी टोमॅटोचा हा सोपा घरगुती उपाय एकदा नक्की करून पाहा. 

ऑफिस- डेली वेअर वुमन्ससाठी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन- ८ नवख्या डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल देखणा दागिना

टोमॅटोचा स्क्रब बनवण्यासाठी त्यावर एक चमचा पिठीसाखर किंवा साखर घाला. या तुकड्याने पायांच्या काळवंडलेल्या भागावर ५ ते १० मिनिटे वर्तुळाकार पद्धतीने मसाज करा. साखर एक्सफोलिएटर म्हणून काम करते, तर टोमॅटो काळवंडलेली त्वचा उजळवतो. जर आपले पाय खूपच जास्त टॅन झाले असतील, तर टोमॅटोच्या पल्पमध्ये थोडे तांदळाचे पीठ आणि चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण पायांना १५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चोळून धुवा. तांदळाच्या पिठामुळे पायांवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. 

लिंबू आणि टोमॅटो या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस मिसळून ते पायांवर लावा. हे मिश्रण नैसर्गिक ब्लिचिंगचे काम करते, ज्यामुळे नखांच्या बाजूचा काळपटपणा आणि बोटांवरील डाग वेगाने कमी होतात. टोमॅटो स्क्रबने पाय धुतल्यानंतर ते कोरडे करा आणि त्यावर एखादे चांगले मॉइश्चरायझर किंवा खोबऱ्याचे तेल लावा. 

टोमॅटो स्क्रबमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. तसेच उन्हामुळे पाय काळवडले असतील तर हा उपाय करु बघा. पार्लरच्या हजारो रुपयांच्या तुलनेत हा उपाय अत्यंत स्वस्त आणि सुरक्षित आहे.
 


Web Title : टमाटर स्क्रब से पेडीक्योर: मुलायम पैरों के लिए असरदार घरेलू उपाय।

Web Summary : टमाटर के ब्लीचिंग एजेंट और एंटीऑक्सीडेंट टैन हटाकर मुलायम पैर दिखाते हैं। स्क्रबिंग के लिए टमाटर को चीनी के साथ या टैन हटाने के लिए चावल के आटे और हल्दी के साथ मिलाएं। नींबू का रस मिलाने से कालापन कम होता है। महंगे पेडीक्योर का सस्ता और सुरक्षित विकल्प।

Web Title : Tomato scrub for pedicure: Effective home remedy for soft feet.

Web Summary : Tomato's bleaching agents and antioxidants remove tan, revealing soft feet. Mix tomato with sugar for scrubbing or rice flour and turmeric for tan removal. Lemon juice added to tomato juice reduces darkness. A cheap and safe alternative to expensive pedicures.