लहान मुलं उन्हातान्हांत खेळतात, इकडे तिकडे धडपडतात यामुळे मुलांची पायाची ढोपरं हाताचं कोपरं काळीकुट्ट होतात. लहान वयात मुलांची ढोपरं - कोपरं काळी पडणं एक कॉमन समस्या असते. त्वचेच्या मृत पेशी आणि सततची धूळ यामुळे हे भाग हळूहळू खूपच काळेकुट्ट दिसू लागतात. आंघोळीच्या वेळी कितीही घासून काढलं तरी हा काळेपणा सहजासहजी काही जात नाही. सतत खेळणं, घास लागणं, धूळ-मातीचा संपर्क किंवा त्वचेची योग्य काळजी न घेणं यामुळे ही समस्या वाढू शकते. त्यामुळे मुलांच्या त्वचेचा रंग असमान दिसतो आणि पालकांची चिंता वाढते(simple home remedies to remove tanning from kids knees and elbows).
अनेकदा पालक या समस्येकडे दुर्लक्ष करतात, पण वेळीच लक्ष दिल्यास घरगुती नैसर्गिक पदार्थांच्या साह्याने आपण मुलांची त्वचा पूर्वीसारखीच स्वच्छ करू शकतो. पण घाबरण्याचं कारण नाही! मुलांची त्वचा पुन्हा (easy remedies for dark skin on kids knees and elbows) मऊ आणि उजळ बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने हा काळेपणा अगदी सहज निघू शकतो. मुलांच्या नाजूक त्वचेला कोणतीही इजा न पोहचवता, ढोपरांचा तसेच कोपरांचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती नॅचरल स्क्रब कसा तयार करायचा ते पाहूयात. कमी वेळात आणि शून्य खर्चात नैसर्गिक पद्धतीने मुलांचे ढोपरं आणि कोपरं स्वच्छ करण्याचा 'हा' जादुई उपाय नेमकं (how to lighten dark knees and elbows in children safely) कोणता तो कसा करायचा ते पाहा.
मुलांचे काळेकुट्ट ढोपरं - कोपरं होतील झटपट स्वच्छ...
मुलांचे काळेकुट्ट ढोपरं - कोपरं स्वच्छ करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून तांदळाचं पीठ, १ टेबलस्पून बेसन, १/२ टेबलस्पून कॉफी पावडर, १ टेबलस्पून दही इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
नेमका उपाय काय करायचा ?
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये तांदळाचं पीठ, बेसन, कॉफी पावडर, दही असे सगळे जिन्नस एकत्रित करून चमच्याने कालवून त्याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट मुलांच्या काळ्याकुट्ट ढोपरं आणि कोपरांवर बोटांच्या मदतीने लावून हलकेच चोळून मसाज करून घ्यावा. १० ते २० मिनिटे ही पेस्ट तशीच राहू द्यावी मग वाईप्सने पुसून थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. हा घरगुती उपाय आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केल्यास महिन्याभरात फरक दिसून येईल.
हा घरगुती उपाय करण्याचे फायदे...
१. तांदळाचं पीठ :- तांदळाचं पीठ हे एक उत्तम नैसर्गिक 'एक्सफोलिएटर' म्हणून काम करतं, जे त्वचेवरील साचलेल्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतं. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. हे त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ शोषून घेते, ज्यामुळे ढोपरं स्वच्छ दिसू लागतात.
२. बेसन :- बेसन त्वचेचा काळेपणा दूर करण्यास आणि त्वचेचा मूळ रंग परत मिळवून देण्यास मदत करतं. बेसनामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.
३. कॉफी पावडर :- कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत करतात. कॉफी पावडर रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे कोपर आणि ढोपरांचा काळेपणा हळूहळू कमी होतो. कॉफी पावडर त्वचेला एकसारखा रंग देण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करते.
४. दही :- दह्यामध्ये 'लॅक्टिक ॲसिड' असते, जे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते आणि त्वचा उजळवते. दही मुलांच्या नाजूक त्वचेला खोलवर हायड्रेट करते, ज्यामुळे घास लागून खरखरीत झालेली ढोपरं - कोपरं मऊ होतात. यातील गुणधर्मांमुळे त्वचेवर होणारी जळजळ किंवा खाज कमी होण्यास मदत मिळते.
