Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > कमी वयात आलेल्या सुरकुत्या खोबऱ्याचं तेल करते कमी, पण माहीत पाहिजे वापरण्याची योग्य पद्धत

कमी वयात आलेल्या सुरकुत्या खोबऱ्याचं तेल करते कमी, पण माहीत पाहिजे वापरण्याची योग्य पद्धत

How to use coconut oil for wrinkles : काही योग्य नॅचरल उपाय योग्य पद्धतीने केले तर सुरकुत्या दूर करता येतात. खोबऱ्याचं तेल यासाठी खूप फायदेशीर ठरतं. खोबऱ्याच्या तेलाचा चेहऱ्यासाठी कसा वापर करावा हे आज आपण पाहणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:05 IST2025-11-29T11:29:31+5:302025-11-29T18:05:04+5:30

How to use coconut oil for wrinkles : काही योग्य नॅचरल उपाय योग्य पद्धतीने केले तर सुरकुत्या दूर करता येतात. खोबऱ्याचं तेल यासाठी खूप फायदेशीर ठरतं. खोबऱ्याच्या तेलाचा चेहऱ्यासाठी कसा वापर करावा हे आज आपण पाहणार आहोत. 

How to reduce wrinkles on face naturally know how to use coconut oil for it | कमी वयात आलेल्या सुरकुत्या खोबऱ्याचं तेल करते कमी, पण माहीत पाहिजे वापरण्याची योग्य पद्धत

कमी वयात आलेल्या सुरकुत्या खोबऱ्याचं तेल करते कमी, पण माहीत पाहिजे वापरण्याची योग्य पद्धत

How to use coconut oil for wrinkles : कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची समस्या आजकाल बऱ्याच लोकांना होते. प्रदूषण, धूळ-माती, त्वचेची योग्य काळजी न घेणे, स्मोकिंग, मद्यसेवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ही याची कारणे सांगितली जातात. अर्थातच कुणालाही कमी वयात म्हातारं दिसणं आवडणार नाही. पण ही समस्या दूर करण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केला जातो. ज्यांचे साइड इफेक्ट्स भरपूर असतात. जर काही नॅचरल उपाय योग्य पद्धतीने केले तर सुरकुत्या दूर करता येतात. खोबऱ्याचं तेल यासाठी खूप फायदेशीर ठरतं. अशात खोबऱ्याच्या तेलाचा चेहऱ्यासाठी कसा वापर करावा हे आज आपण पाहणार आहोत. 

खोबऱ्याचं तेल त्वचेसाठी वरदान कसं?

खोबऱ्याच्या तेलामध्ये अ‍ॅंटी-एजिंग गुण असतात. त्यामुळे हे तेल लावल्यानं त्वचेला हेल्दी फॅट्स आणि व्हिटामिन्स मिळतात. अशात त्वचा तरूण दिसण्यास मदत मिळते. या तेलात असलेल्या लॉरिक अ‍ॅसिडनं त्वचेला मॉइश्चर मिळतं आणि त्वचेतील सेल्स रिपेअरही होतात. व्हिटामिन ई भरपूर असल्याने खोबऱ्याच्या तेलानं त्वचा मुलायम होते आणि यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स वेळेआधीच येणाऱ्या सुरकुत्या दूर करतात.

कसा कराल वापर?

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही खोबऱ्याचं तेल असंच चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी आधी चेहरा पाण्यानं धुवा, हातावर तेल घ्या आणि चेहऱ्यावर सर्कलर मोशनमध्ये लावा. जर त्वचा ड्राय असेल तर खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर रात्रभर लावून ठेवा. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी तेल लावल्यावर अर्धा तास ठेवून नंतर चेहरा धुवून घ्यावा.

खोबऱ्याचं तेल आणि एरंडीचं तेल

खोबऱ्याच्या तेलात थोडं एरंडीचं तेल मिक्स करूनही वापरू शकता. सुरकुत्या कमी करण्यासाठी एरंडीचं तेल खूप प्रभावी मानलं जातं. २ ते ३ थेंब एरंडीचं तेल घ्या आणि अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल मिक्स करा. हे तेल नंतर चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा धुवून घ्याल.

खोबऱ्याचं तेल आणि हळद

सुरकुत्या दूर करायच्या असतील तर हळद आणि खोबऱ्याचं तेलही चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी अर्धा चमचा खोबऱ्याच्या तेलात २ चिमुट हळद टाका आणि मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. याने त्वचेला हायड्रेशन मिळतं, अ‍ॅंटी-एजिंग गुण मिळतात, त्वचेवरील डाग दूर होतात आणि त्वचा चमकदारही दिसते.

Web Title : नारियल तेल झुर्रियों को दूर करे: उपयोग करने का सही तरीका जानें।

Web Summary : नारियल तेल, एंटीऑक्सिडेंट और फैटी एसिड से भरपूर, झुर्रियों को कम कर सकता है। सीधे लगाएं, अरंडी के तेल या हल्दी के साथ मिलाएं। नियमित उपयोग त्वचा को हाइड्रेट करता है, कोशिकाओं की मरम्मत करता है और एक युवा चमक को बढ़ावा देता है, जो एक प्राकृतिक एंटी-एजिंग समाधान प्रदान करता है।

Web Title : Coconut oil combats wrinkles: Know the right way to use it.

Web Summary : Coconut oil, rich in antioxidants and fatty acids, can reduce wrinkles. Apply directly, mix with castor oil, or turmeric. Regular use hydrates skin, repairs cells, and promotes a youthful glow, offering a natural anti-aging solution.