Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > तुकतुकीत- डागविरहित त्वचेसाठी तांदळाचा साबण, ३ साहित्य- ५ मिनिटांत मिळेल कोरियन स्किन ग्लो- टॅनिंग कमी करणारा झटपट उपाय

तुकतुकीत- डागविरहित त्वचेसाठी तांदळाचा साबण, ३ साहित्य- ५ मिनिटांत मिळेल कोरियन स्किन ग्लो- टॅनिंग कमी करणारा झटपट उपाय

Natural homemade soap for clear skin: Get Korean skin glow naturally at home: तुकतुकीत आणि डागविरहित त्वचा हवी असेल तर हा घरगुती साबण कसा बनवायचा, याची सोपी पद्धत पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2026 15:50 IST2026-04-20T15:48:52+5:302026-04-20T15:50:04+5:30

Natural homemade soap for clear skin: Get Korean skin glow naturally at home: तुकतुकीत आणि डागविरहित त्वचा हवी असेल तर हा घरगुती साबण कसा बनवायचा, याची सोपी पद्धत पाहूया.

How to make rice soap at Home Korean glass skin Rice soap benefits for skin whitening Home remedies for sun tanning removal 5-minute skincare routine for glowing skin | तुकतुकीत- डागविरहित त्वचेसाठी तांदळाचा साबण, ३ साहित्य- ५ मिनिटांत मिळेल कोरियन स्किन ग्लो- टॅनिंग कमी करणारा झटपट उपाय

तुकतुकीत- डागविरहित त्वचेसाठी तांदळाचा साबण, ३ साहित्य- ५ मिनिटांत मिळेल कोरियन स्किन ग्लो- टॅनिंग कमी करणारा झटपट उपाय

कडाक्याच्या उन्हात आपली त्वचा टॅन होते अशावेळी आपण चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि त्वचेवरील डाग घालवण्यासाठी महागड्या ब्रँड्सचे फेशवॉश आणि साबण वापरतो. पण यात असणारे रासायनिक घटक आपल्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी करतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते.(Skin care tips) पण कोरियन महिलांच्या काचेसारख्या चमकणाऱ्या त्वचेचे रहस्य त्यांच्या स्वयंपाकघरात दडलेले असते, ते म्हणजे तांदूळ. तांदळात त्वचा उजळवण्याचे आणि घट्ट करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. (Natural homemade soap for clear skin)
पण रोजच तांदळाचे पीठ किंवा पाणी वापरणं शक्य नसतं. अशावेळी आपण घरातील गोष्टींपासून तांदळाचा साबण तयार करु शकतो. हा फक्त साबण नाही तर नैसर्गिक सौंदर्य उपचार आहे.(Get Korean skin glow naturally at home) यात असणारे घटक काळे डाग घालवण्यास मदत करतात. त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करतात. जर आपल्यालाही केमिकलशिवाय तुकतुकीत आणि डागविरहित त्वचा हवी असेल तर हा घरगुती साबण कसा बनवायचा, याची सोपी पद्धत पाहूया. 

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

साहित्य 

तांदूळ - ४ चमचे
बटाटा - १ 
कच्चे दूध - १ चमचा
कोरफड जेल - अर्धा चमचा
बदाम तेल - अर्धा चमचा
व्हिटॅमिन ई कॅप्सूल - २ 
सोप बेस - ६० ते ७० ग्रॅम

1. सगळ्यात आधी तांदूळ ४ ते ५ तास भिजत घाला. नंतर त्यात थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट गाळून घ्या, ज्यातून आपल्याला तांदळाचे दूध मिळेल. 

2. आता बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात जे टॅनिंग काढण्यास मदत करतात.

3. एका बाऊलमध्ये तांदळाची पेस्ट, बटाट्याचा रस, १ चमचा कच्चे दूध, कोरफड जेल आणि बदाम तेल एकत्र करा. त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे ऑईल टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करा.

4. सोप बेसचे छोटे तुकडे करा आणि 'डबल बॉयलर' पद्धतीने विरघळवून घ्या. सोप बेस पूर्णपणे विरघळला की गॅस बंद करा आणि त्यात तयार केलेले तांदळाचे मिश्रण ओता. सर्व व्यवस्थित हलवून एका प्लास्टिकच्या मोल्डमध्ये किंवा वाटीमध्ये ओता.

5. हा साबण २-३ तास फ्रिजमध्ये किंवा बाहेर सेट व्हायला ठेवा. नैसर्गिक तांदळाचा साबण तयार आहे. यात असणारे घटक त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतात आणि टॅनिंगही कमी करण्यास मदत करतात. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि पिंपल्सचे डाग देखील कमी होतात. दुधामुळे त्वचेला प्रोटीन मिळते, ज्यामुळे चेहरा तुकतुकीत आणि फ्रेश दिसतो. हा साबण त्वचेवरील सुरकुत्या कमी करुन त्वचा घट्ट ठेवण्यास मदत करतात. 

Web Title : बेदाग त्वचा के लिए चावल का साबुन: पाएं कोरियाई निखार

Web Summary : घर पर बनाएं चावल का साबुन और पाएं निखरी, टैन-मुक्त त्वचा। चावल, आलू और दूध मिलकर त्वचा को मॉइस्चराइज़ करते हैं और काले धब्बे हटाते हैं। आसान, प्राकृतिक स्किनकेयर!

Web Title : Rice soap for flawless skin: Quick Korean glow recipe.

Web Summary : Make rice soap at home for glowing, tan-free skin. Rice, potato, and milk combine to moisturize and lighten dark spots. Easy, natural skincare!